सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (ता.२२) : मारेगाव वनपरिक्षेत्रात व
मुकुटबन वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पांढरकवडा वनविभाग व वणी पोलिस उपविभागाने संयुक्तपणे केली आहे. वनविभाग व पोलिसांकडून महिलांना मारहाण केल्याचा आरोप होत असून, वाघ शिकार प्रकरणाची दुसरी बाजू समाेर आली आहे. ही घटना मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वरपाेड येथे घडली.
वाघ शिकार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक गेले असता, महिलांनी कारवाई करण्यात अडचण निर्माण केली. त्यामुळे पाेलीस, वनविभाग कर्मचारी आणि महिला आमने सामने आल्याने दुखापत झाली. यात दोन महीला गंभीर जखमी झाल्या. या बाबत एक व्हीडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधी ने मुकुटबन वरिष्ठ वन अधिकारी यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले की,
"वरपोड येथे आरोपीना पकडण्यासाठी आम्ही गेलो होतो, तेव्हा संपूर्ण गावाकऱ्यांनी व महिलांनी काठ्या व दगडाने आमच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्यांना कोणतीही इजा पोहचवली नाही. होऊ शकते आरोपीना त्यांच्यासोबत आणता आणता हातापाई वा झटापटीत झाली आसेल परंतु आम्ही कोणाला मारहाण केली नाही आणि पाच आरोपी ताब्यात घेतली."
विजय वारे
वरिष्ठ अधिकारी मुकुटबन वनविभाग
वनविभाग व पोलिसांकडून महिलांना मारहाण केल्याचा आरोप : वाघ शिकार प्रकरणाची दुसरी बाजू समाेर
दोषी असेल तर कायदेशीर कारवाही करा,मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला प्रशांत टेकाम यांचा संतप्त सवाल.
अधिकारी कर्मचारी यांनी निरपराध महिलांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी यांची चौकशी करूण ऑट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी प्रशांत टेकाम यांच्यासह गावाकऱ्यांनी केली आहे.
झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल पारिसरात गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी शनिवारी १९ जून रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पोलीस व वनविभागाचे पथकाने वरपोड येथून ५ आरोपींना अटक केली होती. मात्र, प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना निरपराध व्यक्तींना विनाकारण गोवल्याचा,तसेच अटक करतेवेळी कर्मचा-यांनी गावक-यांना मारहाण केल्याचा आरोप करत दिनांक २१ जून २०२१ रोजी शेकडो वरपोड येथील नागरिकांनी मुकुटबन पोलीस स्टेशनवर धडक दिली. यावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारहाण करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर ऍट्रोसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली.
मांगुर्ला व सोनेगाव येथील वाघाच्या हत्येप्रकरणी गावक-यांचा कोणताही संबंध नसून त्यांना विनाकारण गोवण्यात येत असल्याचा आरोप गावक-यांचा आहे. तसेच निरपराध लोकांना मारहाण करण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. वनविभागाच्या अशा गैर कायदेशिर कारवाहीमुळे आदिवासी समाजावर अन्याय झाला असून मानवी हक्का व अधिकार पायदळी तुळवण्याचा प्रकार झाला आहे अश्या सबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर ऍट्रोसिटी अॅक्ट अनुसार कारवाही का करण्यात येउ नये अशी मागणी यावेळी वरपोड येथील नागरीकानी केली आहे. या प्रकरणी त्यांनी लेखी तक्रार जिल्हा अधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलिस अधिकारी यवतमाळ, आदिवासी हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र, प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, मानवी हक्क आयोग महाराष्ट्र, महिला आयोग महाराष्ट्रा प्रतीलीप सादर केले असून मारहाण करणा-या कर्मचा-यांवर एट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल न केल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही स्थानिक नागरिकाणी दिला आहे. यावेळी मुकूटबन पोलिस स्टेशनला निवेदन देतेवेळी पैकु टेकाम, महादेव टेकाम, सुनील टेकाम, आनंद टेकाम, राजेश्वर टेकाम, सुंदर टेकाम, किसन टेकाम, जंगा मडावी, सुरेश आत्राम, लक्ष्मण कोडापे, सीमा टेकाम, भोनू टेकाम, लखमा टेकाम, प्रेमीला टेकाम, मादीबाई टेकाम, लक्ष्मी टेकाम, अनुसया आत्राम, लिलाबाई आत्राम सह शेकडो नागरिक उपस्थित होते.
दोषी असेल तर कायदेशीर कारवाही करा,मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला- प्रशांत टेकाम यांचा संतप्त सवाल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 22, 2021
Rating:
