महाराष्ट्रातील विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क,परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे. - वंचित बहुजन आघाडीचे पालकमंत्र्यांना दिले निवेदन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
बल्लारपूर, (ता.२२) : देशात कोरोना महामारी मुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे व्यवसाय बुढीला लागले, विद्यार्थ्यांचे बेहाल झाले. विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही, विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही, अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीच्या सामना करावा लागत आहे. कोरोना महामारी मुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार हरपले, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क कसे भरायचे हा प्रश्नच पडला ? यामुळे विद्यार्थी खूप चिंतेत आहे. विद्यार्थी व पालकवर्गात परीक्षा शुल्क ला घेऊन प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क,परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे व ज्या विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क भरले त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्वरित परत करण्यात यावे. अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर तर्फे जनआंदोलन करण्यात येईल. यासाठी राज्याचे इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.विजय भाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर तालुकाध्यक्ष प्रथम दुपारे यांच्या नेतृत्वात सिद्धांत पुणेकर, गुंजन वानखेडे, फारुक शेख व व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क,परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे. - वंचित बहुजन आघाडीचे पालकमंत्र्यांना दिले निवेदन महाराष्ट्रातील विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क,परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे. - वंचित बहुजन आघाडीचे पालकमंत्र्यांना दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.