सह्याद्री न्यूज | विवेक आवारी
वणी, (ता.२२) : नुकतीच तालुक्यातील पळसोनी (मुरधोनी) येथील ऐका बारा वर्षाच्या मुलाचा पुला खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने गावात शोक कळा पसरली आहे.
प्रज्वल दिनेश गुरनुले (१२) असे मृतक झालेल्या मुलाचे नाव असून तो पुला खाली पडून मरण पावला असे निकटवरतीयांनी सांगितले आहे.
सविस्तर असे की, नेहमी प्रमाणे तो सायकल घेऊन फिरायला गेला असता, सायकल वरून पाय पुलाच्या कडेला असलेल्या डिव्हायडर ठेवायला गेला आणि पाय घसरला. त्याचा तोल गेला व प्रज्वल सहा ते सात फूट पुलाच्या खाली मानेवर पडला. त्यामध्ये प्रज्वलच्या मानेला जबर मार लागल्याने त्याला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जात असतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
गावा जवळच असलेल्या पुलावर आतापर्यंत पाळीव जनावरे सुद्धा पडल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले असून या पुला ला कडघरे नसल्याने हा अपघात झाला अन्यथा झाला नसता, असे अनेकांनी बोलून दाखवले.
पुला खाली पडून बालकाचा मृत्यू, पळसोनी येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 22, 2021
Rating:
