वणी : वणी शहरात जबरी चोऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या चोरी व घरफोडीच्या विविध घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे 2 लाख 33000 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वणी शहरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद घरे,दुकाने, दुचाकी वाहन चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. रविवार ते सोमवार या दिवसात एक किरायेदार (नाव सुरेंद्र मुडय्या कल्लुरी वय 29 वर्ष व्यवसाय WCL नौकरी) यांचे घर चोरट्यांनी फोडले. याप्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 30 जून रात्री ते 1 जुलै सकाळी सहा च्या सुमारास घडली. याप्रकरणी जैन ले आऊट, वणी येथील गुरुनाथ सखाराम पिदूरकर (68) यांनी वणी पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे किरायेदार यांचे घराचा कडी-कोंडा तोडुन घरात असलेल्या कपाटाचा कडी-कोंडा तोडुन कपाटातील 17.8 ग्रॅम सोण्याची काळे मणी असलेली पोत किंमत अंदाजे 1,35,000/- रु.ची व नगदी 65,000/- रुपये चा मुद्देमाल नेला.
तसेच फिर्यादीचेही घराचा कडी-कोंडा तोडुन घरात असलेल्या कपाटातील चांदीची अत्तर दानी 20 ग्रॅम किंमत 10,000/- रुपये, चांदीची वाटी 25 ग्रॅम किंमत 12,500/- रु, चांदीचा चंमच 7 ग्रॅम किंमत 3,500 /- रुपये व नगदी 7,000/- रुपये असा एकुण 2,33,000 /- रुपये चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेला आहे. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करून पुढील वणी पोलीस स्टेशन करत आहे.
वेल्डिंग चालवणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानातून साहित्याची चोरी:
वणी येथील एम आय डी सी (MIDC) -प्लॉट न ए 17,वणी येथील 25 वर्षीय तरुणाची वणी पोलिस स्टेशन मध्ये चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी याच्या दुकानातील वेल्डिंग मशीन, इलेट्रिक बोर्ड, ग्राइंडर, स्क्रू फिटिंग मशीन 18500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्याने फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठले.