सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२१) : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक यांनी किमान वेतन कायद्यानुसार आशांना दरमहा १८००० रुपये मानधन मिळावे, यासह प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेसाठी आशांनी लाक्षणिय संप पुकारला आहे कोविडच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.
आशा व गट प्रवर्तक संघटना कर्मचारी क्रुती समीती व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याशी आशाची बैठक झाली मात्र तोडगा सुटला नाही. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होनार नाही तो पर्यंत हा संप सुरूच राहिल असे दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. यामुळे आशांनी आज दिनांक २१ जून २०२१ रोजी विविध मागण्यासाठी राळेगाव तालुक्यातील आशा व गट प्रवर्तक यांनी राळेगाव तहसीलदार, आरोग्य अधिकारी व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.