गीत घोष हे उपेक्षितांच्या हक्कासाठी लढणारे लढवय्ये सैनिक आहेत - ऊत्तम गेडाम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : गीत घोष हे दलित, आदिवासी, कष्टकरी, शोषित सर्वहारा वर्गाच्या हक्काचे लढाईतील क्रांतिकारी विचारधारेचे नेते असून ते लढवय्ये सैनिक आहे, असे मत माजी शिक्षणाधिकारी मा.उत्तमरावजी गेडाम यांनी गीत घोष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले प्रमुख मार्गदर्शक म्हणून मत व्यक्त केले.

हा वाढदिवसाचा छोटेखांनी कार्यक्रम आदिवासी सोशल फोरम वणी, इतर आदिवासी संघटना यांच्या पुढाकाराने विसावा हाँटेलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गटविस अधिकारी मा.रामदासजी गेडाम सर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक मा.उत्तमरावजी गेडाम सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी सो.फो.चे अध्यक्ष मा.रमेशजी मडावी, मा.श्रीकृष्ण मडावी, मा.कैलाजी मेश्राम, मा.संतोषजी चांदेकर, प्रकाशजी सिडाम, प्रशांत डोणेकर यांनीही गीत घोष यांच्या वाढदिवसानिमित्त गीत घोष यांच्या आजपर्यंतच्या चळवळींचा व संघर्षाचा आडावा घेत त्यांच्या दिर्घ आयुष्याची कामना आपल्या भाषणातून व्यक्त केलीत.

या वाढदिवस सोहळ्याचे प्रास्ताविक मा. अजयजी राजगडकर यांनी केले मा.वसंतराजी चांदेकर सर यांनी संचालन केले.सत्काराला उत्तर देताना मा.गीत घोष यांनी सांगितले की,आपण बॅनर वर झळकणारी लोक नसलो तरी या व्यवस्थेच्या छाताडात धडकी भरवून धडकणारे लोक नक्कीच आहोत हे आपण विसरू नका आपसांत कितीही मतभेद असले तरी आपसांत संवाद असणे काळाची गरज आहे, कारण आपण समाजाचे समजदार चेहरे आहोत आणि समाजाला चेहरा विद्रूप करणारी व्यवस्था आज आपल्या समोर आव्हान बनून उभी आहे, हे आपण विसरता कामा नये. आपण माझा वाढदिवस अशा वैचारिक चिंतनाने साजरा केला आहे त्यामुळे मी आपला नक्कीच ऋणी आहे आणि मी आपला आदिवासी समाज संघटित व एकसंध करण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिल, या शब्दात बोलून आपला वाढदिवस साजरा करणा-या लोकांची गीत घोष यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले. या कार्यक्रमास भगवानभाऊ आत्राम, महेश आत्राम, सुभाष चांदेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

आमदार देरकर यांची भेट घेऊन दिले निवेदन

सह्याद्री चौफेर |ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोटोणी परिसरातील गावामध्ये बारमाही आरोग्यविषयक समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतात. त्यामुळे बोटोणी परिसरातील गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) देण्यात यावे, यासाठी बोटोणी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

चार शाळा, पाच उपकेंद्र छोटया मोठ्या गावांचे बाजारपेठ बोटोणी येथे आहेत. पूर्ण गावे पेसा अंतर्गत गावे आहेत.मात्र, परिसरातील अनेक गावे मार्डी प्राथमिक केंद्राला जोडलेली आहेत. तेथे जाण्यासाठी येथील नागरिकांना तालुका ओलांडून शेवटच्या टोकाला जावे लागत असून बोटोणी परिसरात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने यासाठी सन 2010 पासून प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्षित होत असल्यामुळे परत सोमवार दि. 23 जून रोजी आमदार देरकर यांच्याशी 100 टक्के प्रयत्न करण्यासाठी चर्चा केली. 

यावेळी बोटोणी येथील सरपंच प्रवीण वनकर, ग्राम. सदस्य मंगेश उईके, महादेव सिडाम, दिलीप उईके आदी उपस्थित होते.
 





दिवाकर नामदेवराव सातपुते यांची शिवसेना मारेगाव सचिव पदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : विभाग प्रमुख दिवाकर नामदेवराव सातपुते यांची शिवसेना (उबाठा) मारेगाव तालुका सचिव पदी यांची नियुक्ती झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती जाहिर करण्यात आली. दिवाकर सातपुते हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. ते सन 2002 पासून शिवसेना पक्षामध्ये एकनिष्ठ राहून संघटनेसाठी झटत आहे. 

आमदार संजय देरकर यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील नवीन जुन्या फळीतील कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्याचं मोठं कार्य उचलल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सहज काबीज करण्यात या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मोठा हातखंडा असणार आहे. त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्सहाचे वातावरण असून तालुका सचिव श्री सातपुते यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विभाग प्रमुख ते तालुका सचिव - दिवाकर सातपुते 
2002 पासुन शिवसेनेत, ग्रामपंचायत उपसंरपच, सतत चार वेळा सदस्य, घरकुलसाठी उषोषण, ग्रामपंचायत सचिव भ्रष्टाचार, पाणी टंचाई प्रश्न, बोगस कामे उघड, तसेच गोरगरीबांची कामे, अडल्या नडल्याची शासकीय कामात मदत, व शिवसेना मार्डी -कुभा विभाग प्रमुख, पद सुद्धा भूषविले आहेत.

सचिन पचारे शिवसेना मारेगांव संपर्क प्रमुख पदी नियुक्त

 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : युवा तडफदार, आक्रमक भुमिकेसाठी तालुक्यात परिचित असलेले, तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारे सचिन पचारे यांना शिवसेना मारेगांव संपर्क प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची निवड शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. 

विशेष उल्लेखनीय की, पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, त्याच्या समस्येप्रसंगी हक्काने धावून जाणारा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. नुकतेच त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार वाळू मिळावी यासाठी उपोषण केले होते.त्यांच्या मागणीला यशही मिळाले. अशा अनेकानेक त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती फळास आली असावी बोलल्या जातं.

श्री पचारे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या संपर्कात सुधारणा होईल आणि पक्ष अधिक वाढवता येईल, अशा भावना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे.

नवनिर्वाचित संपर्क प्रमुख सचिन पचारे यांचा सत्कार 
मंगळवार दि. 24 जून रोजी वणी येथील वसंत जिनींग सभागृहात शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित संपर्क प्रमुख सचिन पचारे यांचा आमदार संजय देरकर यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यासत्कार सोहळ्यात वणी मारेगाव झरी तालुक्यातील नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन करण्यात आले.

पुरुषोत्तम बुटे यांची शिवसेना मारेगाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात मारेगाव तालुक्यातील संघटनेत फेरबदल करण्यात आली अशी शिवसेना भवन येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.

यामध्ये शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक पुरुषोत्तम बुटे यांची मारेगाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे श्रेय ते विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर यांना देत असून गेल्या तीस वर्षांपासून बुटे हे शिवसेना पक्षात इमाने इतबारे काम करतहेत. पक्षात किती आले आणि गेले. मात्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही, ते आजही कायम सोबत राहून पक्षासाठी निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून त्यांना मारेगाव तालुक्याची धुरा देण्यात आली आहे असं बोलल्या जातं. 

या निवडीबाबत त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे. तालुका प्रमुख श्री पुरुषोत्तम बुटे यांनी सर्व नवनिर्वाचित शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व तसेच मित्र परिवारांचे आभार मानले. 

पुरुषोत्तम बुटे यांचे मारेगाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करताना आ. संजय देरकर व पदाधिकारी