कॅनल वर काम करणाऱ्या मजुराची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील नवरगाव धरण येथे कॅनल च्या कामावरील एका मजूर तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज बुधवार ला दुपारी 1 वाजता उघडकीस आली आहे.
शेख समीर शेख जाफर (22) रा.दाईतना ता जि. परभणी असं कॅनल बाजूला असलेल्या झाडाला पॅन्ट व टी शर्ट सहाय्याने गळफास घेऊन मृतवस्थेत आढळून आलेल्याचे नाव आहे. तो मागील दिवसापासून कॅनल च्या कामावर मजुरी करीत होता. 
आज त्याचा मृतदेह आढळून आल्याने या मृतकास पाहुण ही आत्महत्या की घातपात, अशी साशंकतेला वाव ? येत असून घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे. 

बुधवार, गुरुवार आणि लास्ट शुक्रवार...आजच भेट द्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : संपूर्ण नवीन स्टॉक तेही एकाच छताखाली भरपूर व्हेरायटी,आजच भेट द्या आणि खरेदी करा! तुम्ही वाट पाहत असलेल्या ताज्या आणि प्युअर कलेक्शनची अनुभूती घ्या. संधी दवडू नका, आजच भेट द्या आणि आपल्या आवडते खादी कॉटनचे कपडे खरेदी करा !

कारण आता "खादी कॉटन महोत्सव" हा आता फक्त 20 जून 2025 पर्यंतच आपल्या शहरात असणार आहे. सेल नाही संस्कृती खरेदी करा! नवीन आकर्षक खादी कॉटन डिजाईन खास सवलत. फक्त याच खादी कॉटन महोत्सव मध्येच. आजच भेट द्या आपल्या जवळच्या जैताई मंदिर, वणी येथील सेलला आणि स्वस्तात दर्जेदार खादी चे कपडे खरेदी करा!



वारंवार विजेच्या खेळखंडोबाने शेतकरी संकटात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव तालुक्यात विजेचा लपंडाव होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संबंधित कनिष्ठ अभियंता ग्रामीण काकडे यांच्या कडून होत असलेल्या त्रासाबाबत नागरिक कंटाळली अशा आशयचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव चे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या उपस्थितीत उपकार्यकारी अभियंता, मारेगाव यांना देण्यात आले आहे. 
वरून राजाने आठ दिवसापासून हुलकावणी दिल्याने पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. मात्र तालुक्यातील विजपुरवठा लपंडाव करत असल्याने पिकांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.

मे महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी जुनच्या पहिल्या आठवडयात कापूस, तूर खरीप पिकांची पेरणी केली. परंतु अचानकपणे पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सिंचनाची सुविधा असताना कनिष्ठ अभियंता ग्रामीण काकडे हे ग्राहकांना अपमानाची वागणूक देत असल्याचा आरोप तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी निवेदनातून केला आहे. 
पुढे निवेदनात असंही म्हटलं आहे की, त्यांचा फोन बंद असतो,आणि फोन उचलला तर तुमच्याने जे होते ते करून घ्या नाहीतर माझी तक्रार करा अशी उत्तरे ते देतात. अनेकदा 10/10 दिवस विजपुरवठा खंडित होत असतो असंही म्हटलं आहे. पगारी कर्मचारी असल्यामुळे आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे, वरिष्ठानी त्यांच्यात सुधारणा करावी अशी मागणी काँग्रेस चे पदाधिकारी वं कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, आकाश बदकी, समीर सय्यद, अंकुश माफूर, विनोद आत्राम यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

भालर वसाहत लाठी रस्ता रोको आंदोलन यशस्वी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : १६ जून २०२५ ला भालर वसाहत ते लाठी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर लाठी भालर वसाहत ग्रामपंचायत सदस्य ॲड.राहुल खारकर यांच्या नेतृत्वात स्थानिक लाठी गावातील नागरिकांनी घेतलेल्या रस्ता रोको आंदोलनाला लेखी आश्वासनानंतर यश मिळाले. 

वेल्हाळा बाजार रोड चौक येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.हा रस्ता रोको जवळपास 4 तास चालला परंतु रोड संदर्भात कोणताही मार्ग निघत नसताना आंदोलनाला आमदार श्री. संजय देरकर यांनी आंदोलन स्थळी भेट घेतली व वेकोली प्रशासनाशी चर्चेअंती वेकोली प्रशासनाकडून लाठी भालर वसाहत रोड करिता WBM रोडची तरतूद करून भविष्यात रोडचे नूतनीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
   

या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य रिना लाडे, अल्का बोरकुटे,ललिता गुंडुकवार यासह असंख्य महिलांचा, युवकांचा, ग्रामस्थांचा,युवा शक्ती क्रांतिकारी संघटना,संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांचा सहभाग दिसून आला. मागील अनेक महिन्यांपासून वेकोली प्रशासनाकडे रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी केली होती, परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करण्यात आले.
     

आंदोलनादरम्यान वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर रस्त्याचे काम 3 ते 4 महिन्यात करण्यात येईल असे लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यामुळे आंदोलन थांबले.यावेळी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी पोलीस प्रशासनासह कायदा सुव्यवस्था राखण्याचे विशेष प्रयत्न केले.