डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना भ्रम आणि वास्तव या पुस्तिकेची द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आज दिनांक १३/६/२०२५ शुक्रवारला संग्रामयुग या कवितासंग्रहाचे व वणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना भ्रम आणि वास्तव या पुस्तिकेची द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अॅड.मनोहर पाटिल (आनंदवनातील बाबाशाहीचे लेखक) यांचे हस्ते संग्रामयुग कवितासंग्रह व वणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना भ्रम आणि वास्तव या पुस्तिकेची द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन पार पाडताना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.घनश्याम धाबर्डें सर तर, या पुस्तकाचे भाष्यकार म्हणून प्रा.डाॅ. भिमराव गोटे सर व प्रा.राम घोडेस्वार लाभले..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल तेलंग आणि सुत्रसंचालन विजय भगत यांनी केले. तसेच पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार अशोक ऊईके यांनी मानले.
       
या प्रकाशन सोहळ्याचे दुसरे सत्र दुपारी तीन वाजता सुरू झाले.दुसर्या सत्रात वर्तमान परिस्थितीतील औद्योगिक करण आणि दलित, आदिवासी,ओ.बी.सी व अल्पसंख्याक समाजातील प्रश्न आणि उपाय यावर सखोल मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.घनश्याम धाबर्डें सर तर वक्ते अनिल तेलंग व प्रा भिमराव गोटे सर होते.चर्चासत्राचे संचालन विजय भगत सर तर प्रास्ताविक मिलिंद कांबळे यांनी तसेच आभार विकास खामणकर यांनी मानले.
  
या प्रकाशन सोहळा व चर्चा सत्रात वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर समुहातील वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजत सातपुते, गौरव जवादे, कृपाशील तेलंग, विकास खामणकर, अशोक ऊईके, सुभाष भगत यांनी प्रयत्न केले.

महिला ग्रामपंचायत सदस्यावर फावड्याने हल्ला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महिला ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळ करीत फावड्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि.11 जून रोजी सायंकाळी 6 वाजता वांजरी येथे घडली. याबाबत महिलेने वणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वर्षा हनुमान परचाके (47) असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य महिलेचे नाव आहे. वणी तालुक्यातील वांजरी ग्रामपंचायत सदस्य असलेली ही महिला वार्डात रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने त्याची पाहणी करण्यास गेली असता गावातीलच बंडू बन्सी सिडाम हा देखील तेथे आला. रस्त्याच्या बांधकामावरून बंडू सिडाम याचा ग्रा.प. सदस्य महिलेशी जोरदार वाद झाला. तसेच तो सरपंच, उपसरपंच व सदस्यांनाही शिवीगाळ करू लागला. बंडू सिडाम हा शिवीगाळ करीत असतांना महिलेने त्याला शिव्या कशाला देतो, असे म्हटले. त्यावर बंडू सिडाम सदस्य महिलेवर चांगलाच भडकला. रागाच्या भरात त्याच्या तोंडून अश्लील शब्द बाहेर पडले. महिलेला अश्लील शिवीगाळ करतांनाच त्याने महिलेवर फावड्याने हल्ला चढविला. महिलेच्या डोक्यावर त्याने फावड्याचा वार केला.

फावड्याचा पहिला वार केल्यानंतर परत दुसऱ्यांदा तो महिलेवर फावड्याने वार करणार तेवढ्यात महिलेच्या पतीने त्याला पकडले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बंडू सिडामने डोक्यावर फावडे मारल्याने महिला खाली पडली. तेंव्हा बंडू सिडामच्या पत्नीनेही वर्षा यांना केस पकडून मारहाण केली. जमिनीवर आपटले त्यामुळे वर्षा यांना चक्कर आली. त्यांच्या पतीने तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 

दरम्यान त्यांनी झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. वर्षा परचाके यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी बंडू सिडाम व त्याच्या पत्नीवर बीएनएस कलम 109, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

नवी दिल्ली : करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, इंग्लंडमध्ये पोलो खेळताना मधमाशी गिळल्यामुळे संजयचा मृत्यू झाला.

कारण मधमाशी त्याच्या घशात अडकली आणि घाबरल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. करिश्माने २००३ मध्ये संजय कपूरशी लग्न केले. त्यांना २ मुलेही झाली. पण लग्नाच्या काही काळानंतर दोघेही वेगळे झाले.

पहापळ येथील उडाले शाळेचे छप्पर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : तालुक्यातील पहापळ येथील शाळेवरील छप्पर उडालेले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वादळ वाऱ्याच्या तडाख्याने दोन वर्ग खोल्यांचे छत जमीनदोस्त झाल्याने येथील विद्यार्थ्यांचा वर्ग कुठे भरवावा असा प्रश्न गावातील पालक तसेच शिक्षकात निर्माण झालेला असून अवघ्या काही दिवसानंतर शाळेची घंटा वाजणार आहे.
         

9 जूनला मारेगाव तालुक्यात वादळाने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान केले. यात तालुक्यातील चनोडा, कुंभा, वरुड, मार्डी, गाडेगाव तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुद्धा वादळाने होत्याचे नव्हते केले. अनेकांची घरे जमीनदोस्त केली.तर काही नागरिकांच्या घरावरील छप्पर उडाले. जनावरांचे गोठेसुद्धा उडाले तर मोठ मोठी वृक्ष उन्मळून पडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील छप्पर उडाले. यामुळे वर्गखोलीमध्ये असणारे साहित्य ओले झाले.
        

काही दिवसानंतर शाळा सुरु होणार असून आता विद्यार्थ्यांना कुठे बसवावे असा प्रश्न पालक तसेच शिक्षकांना पडलेला आहे. कारण आधीच कमी वर्गखोल्या अशी जी. प. शाळेची अवस्था असते. त्यात दोन वर्गखोल्यावरील छप्परच उडून गेल्याने आणि समोर पावसाळा असल्याने या वर्गखोल्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

"पहापळ येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाल्याची माहिती मला मिळाली. याबाबतचा अहवाल तहसीलदार मारेगाव यांना पाठविण्यात आलेला आहे. पावसाळा येऊन ठेपलेला आहेत आणि शाळा सुद्धा लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कसलीही गैरसमोर गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न करून त्वरित या शाळांची दुरुस्ती केल्या जाईल."

~भीमराव व्हनखंडे 
गटविकास अधिकारी, पं. स. मारेगाव

इलेक्ट्रेशनची स्प्लेंडर प्लस नेली चोरून

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी शहरात छोटे मोठ्या घटना नित्याचेच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. घटनेमागे घटना अशी मालिका जणू सुरूच झालीय का? असा प्रश्न आपसूकच उपस्थित होत आहे. मागील मे महिन्यातील 28/29 या तारखेत एका गरीब होतकरू कामगाराची चाळीस हजार रूपयाची दुचाकी चोरीला गेली, अशी तक्रार काल 10 जून रोजी वणी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

वणी शहराच्या उत्तरेस 8 किमी अंतरावर असलेल्या एका नामांकित कंपनीत इलेक्ट्रेशन म्हणून काम करणाऱ्या नामे स्वप्नील अशोक टेकाम (27) रा. गणेशपूर (ता. वणी) या होतकरू तरुणाची दुचाकी चोरून नेली. वणी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनेत दिवासेंदिवस वाढ होत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी हा ड्युटी करिता रॉकवेल मिनर्लस कंपनी भालर रोड ता. वणी येथे गेला असता सदर स्पेलंडर प्लस क्रमांक (MH-29, BW-6382) ही मोटारसायकल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेली असून तिची किंमत अंदाजे 40,000/- रु. ची आहे. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा बीएन एस प्रमाणे नोंद केला असुन पुढील तपास वणी पोलीस करत आहे.