सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका व संघटीत व्हा’ या बाबासाहेबांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. 
बाबासाहेबांची जयंती म्हणजे प्रेरणादायी विचारांचा आणि क्रांतीकारी परिवर्तनाच्या संकल्पाचा दिवस. त्यांच्या विचारांचे स्मरण करताना संविधानिक मुल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नशील राहुया.

सर्व भारतीयांना विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐
जय भीम, जय संविधान!

शुभेच्छुक,अभिवादनकर्ते : विजय नगराळे 
प्रदेश संघटक, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

'त्या' दरोडयातील महिला आरोपी गजाआड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा शहरात भरदिवसा दरोडा पडला होता. त्यात मारेगाव तालुक्यातील एका महिलेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व दारव्हा पोलिसांनी सापळा रचून मारेगावातून सकाळी सदर महिला आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

मंदा कमलेश पासवान (वय 41) रा. मारेगाव ता. मारेगाव असे अटकेतील महिला आरोपीचे नाव असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपीची संख्या आठ वर पोहचली आहे. त्यात नांदेड सह मारेगाव जि. यवतमाळ येथील एका महिलेचा समावेश आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार मागील महिन्यात 25 मार्च रोजी दारव्हा शहरात भरदिवसा पडला होता. या दरोडयातील मास्टर माईंड रविंद्र मोतीराम पोकळे वय 55 वर्षे, रा. बारीपुरा,ता. दारव्हा याचे संपर्कात असलेली महीला आरोपी मंदा पासवान यांना पोलीसांनी अटक केली आहे. दरोडयाच्या तपासात दारव्हा पोलीसांना आणखी मोठे यश मिळाले आहे. 
या दरोडयाच्या तपासादरम्यान सुरवातीलाच अतिशय वेगाने सुत्रे हलवुन अवघ्या दोन तासात सहा आरोपीतांना अटक करुन गुन्हयातील संपूर्ण मुद्देमालासह एकुण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असुन सर्व आरोपी नांदेड जिल्हयातील आहेत. नांदेड जिल्हयातील आरोपीतांनी दारव्हा शहरात येवून भरदिवसा दरोडा टाकला कसा? हा प्रश्न पोलीसांना सतावत होता. दारव्हा पोलीसांनी सायबर पोलीस स्टेशनचे मदतीने तांत्रिक तपासावर भर दिला. नांदेड येथील टोळीस दारव्हा येथे दरोडयासाठी आणणाऱ्या एक फरार आरोपीस तसेच स्थानिक सुत्रधार आरोपी रविंद्र मोतीराम पोकळे रा. बारीपुरा, दारव्हा यांचे सतत संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासावरुन निष्पन्न झाले. यावरुन दारव्हा पोलीसांनी महीला आरोपी मंदा कमलेश पासवान वय 41, रा. मारेगाव ता. मारेगाव यांना आज दिनांक 13/04/2025 रोजी मारेगाव येथुन ताब्यात घेवुन तपास केला असता, त्यांनी गुन्हयाबाबत माहीती दिली आहे. त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई कुमार चिंता, पोलीस अधिक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ, चिलुमुला रजनीकांत, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहा. पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, महेंद्र भुते, बबुल चव्हाण, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी, स्नेहल गिरी, अंजली कवचट यांनी पार पाडली आहे.




चिखलगाव येथे चंद्रकांत दादासाहेब यांचा भव्य हितगुज व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेञ त्र्यंबकेश्वर, जिल्हा-नाशिक च्या वतीने परमपूज्य गुरुमाऊली यांच्या सानिध्यात चिखलगाव (वणी) येथे 17 एप्रिलला होणाऱ्या एक दिवशीय २० मे २०२५ रोजी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी शिंदखेडराजा येथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग सोहळ्या निमित्त प. पू. गुरुमाऊली यांचे सगुण स्वरुप गुरुपुञ आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या अमृततुल्य हितगुज तसेच विविध समस्यांवर योग्य उपाय याकरिता अमृतमय सत्संग व मार्गदर्शन सोहळा श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालविकास सेवा केंद्र श्री स्वामी समर्थ नगर, चिखलगाव येथे 17 एप्रिल गुरुवारला सकाळी 11 वा. आयोजित केलेला आहे. तरी वणी मारेगाव झरी तालुक्यातील सर्व सेवेकरी तथा संपूर्ण भाविक जनतेला विनंती करण्यात येते की, या अमृतमय सोहळ्यास उपस्थित राहून आदरणीय दादा साहेबांचे अमृतवाणीतून होणाऱ्या अमृत विचारांचा अवश्य लाभ घेवून आपले जीवन आनंदमय सुखमय करावे हे कळकळीचे व आग्रहाचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखलगाव च्या वतीने करण्यात येत आहे.

वांजरी येथे राम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार

पांढरकवडा : वांजरी येथे राम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त दि.12 एप्रिल शनिवार रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बोडेवार मा.उपसभापती पंचायत समिती पांढरकवडा, कार्यक्रमाचे उद्घाटक विनोद बोडेवार उपसरपंच ग्रामपंचायत वांजरी,प्रमुख पाहुणे मारोतराव बोडेवार,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सिडाम सर,बुरेवार सर,महांकाली आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मनकवडे सर,गुलाब मडावी ग्रामपंचायत सदस्य शिंदे भाऊ,विलास मडावी, आनंदरावजी मिसेवार व प्रोपेश्वर डोळसकर,तांनबाजी पालकटे,अरुण भोयर,मानिक गोरे,महादेव कावडे,विजय पवार,वांजरी येथील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला,या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 35 खेळाडूंनी सहभाग घेतला होता सकाळी 8 वाजता आनंदमय वातावरणात वाजरी येथून 8 किलोमीटर अंतरची मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली होती.

प्रथम पारितोषक 10 हजार एक रुपये,द्वितीय पारितोषि प्रथम पारितोषिक,तृतीय पारितोषिक 5 हजार एक रुपये अशी ठेवण्यात आली होते,प्रथम पारितोषक नागपूर येथील राजन यादव यांनी द्वितीय पुरस्कार रितिक पचदुवे नागपूर, तृतीय पुरस्कार पियुष मसाने नागपूर,चतुर्थी पुरस्कार आकाश ठमके,पाचवं पुरस्कार गौरव आडसकर वांजरी यांना देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन विपीन लोंढे,रोहन बुरेवर,अक्षय येडे,राधे किणाके,सुरज पवार,श्रीकांत अप्पनवार

अयोध्येवरून लाडक्या बहिणी निघाल्या मथुरेकडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : येथील श्रद्धालू लाडक्या बहिणी महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश येथील तीर्थयात्रेला निघालेल्या आहे. या सर्व महिलांच्या दौऱ्याची व्यवस्था शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी केली असून हा तीर्थक्षेत्र दौरा 9 दिवस राहणार आहे.

मारेगाव तालुक्यातील शिवसेना तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे मंत्री व्हावे यासाठी त्यांनी मागील वर्षी अयोध्यामध्ये जावून साकडे घातले होते. नोव्हेंबर मधील त्याची आर्तहाक पावली आणि मा. संजय राठोड हे मंत्री झाले. या पार्श्भूमीवर "बोलें तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले". म्हणून किन्हेकर यांनी यावेळी 80 महिलांसाठी ही तीर्थस्थळ यात्रा आयोजित करण्यात आलेली असून 9 दिवस असणाऱ्या या यात्रेमध्ये मयर, चित्रकूट, प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, आग्रा, मथुरा, उ्जैन, ओंकारेश्वर, खांडवा, शेगाव असे तीर्थस्थळचे दर्शन हॊणार आहे. 

आता पर्यत लाडक्या बहिणींनी मयर, चित्रकुट, प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, वरून थोड्या वेळापूर्वी मथुरा साठी सर्व निघाल्या असे शिवसेना तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले. 9 दिवसाचा दौरा यशस्वी करत परत मारेगावला येणार आहे.