सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा शहरात भरदिवसा दरोडा पडला होता. त्यात मारेगाव तालुक्यातील एका महिलेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व दारव्हा पोलिसांनी सापळा रचून मारेगावातून सकाळी सदर महिला आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मंदा कमलेश पासवान (वय 41) रा. मारेगाव ता. मारेगाव असे अटकेतील महिला आरोपीचे नाव असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपीची संख्या आठ वर पोहचली आहे. त्यात नांदेड सह मारेगाव जि. यवतमाळ येथील एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार मागील महिन्यात 25 मार्च रोजी दारव्हा शहरात भरदिवसा पडला होता. या दरोडयातील मास्टर माईंड रविंद्र मोतीराम पोकळे वय 55 वर्षे, रा. बारीपुरा,ता. दारव्हा याचे संपर्कात असलेली महीला आरोपी मंदा पासवान यांना पोलीसांनी अटक केली आहे. दरोडयाच्या तपासात दारव्हा पोलीसांना आणखी मोठे यश मिळाले आहे.
या दरोडयाच्या तपासादरम्यान सुरवातीलाच अतिशय वेगाने सुत्रे हलवुन अवघ्या दोन तासात सहा आरोपीतांना अटक करुन गुन्हयातील संपूर्ण मुद्देमालासह एकुण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असुन सर्व आरोपी नांदेड जिल्हयातील आहेत. नांदेड जिल्हयातील आरोपीतांनी दारव्हा शहरात येवून भरदिवसा दरोडा टाकला कसा? हा प्रश्न पोलीसांना सतावत होता. दारव्हा पोलीसांनी सायबर पोलीस स्टेशनचे मदतीने तांत्रिक तपासावर भर दिला. नांदेड येथील टोळीस दारव्हा येथे दरोडयासाठी आणणाऱ्या एक फरार आरोपीस तसेच स्थानिक सुत्रधार आरोपी रविंद्र मोतीराम पोकळे रा. बारीपुरा, दारव्हा यांचे सतत संपर्कात असल्याचे तांत्रिक तपासावरुन निष्पन्न झाले. यावरुन दारव्हा पोलीसांनी महीला आरोपी मंदा कमलेश पासवान वय 41, रा. मारेगाव ता. मारेगाव यांना आज दिनांक 13/04/2025 रोजी मारेगाव येथुन ताब्यात घेवुन तपास केला असता, त्यांनी गुन्हयाबाबत माहीती दिली आहे. त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई कुमार चिंता, पोलीस अधिक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ, चिलुमुला रजनीकांत, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहा. पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, महेंद्र भुते, बबुल चव्हाण, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी, स्नेहल गिरी, अंजली कवचट यांनी पार पाडली आहे.