सर्वसामान्यांसाठी धाऊन येणारी संघटना म्हणजे मा.ह.सु.प - राजु धावंजेवार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

कळंब : राज्यात सामाजिक संघटना खुप आहेत. मात्र, सर्व सामान्यांसाठी धाऊन येणारी संघटना म्हणजे 'मानवी हक्क सुरक्षा परिषद' आहे, असे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केले.

गुरुवारी दिनांक ३ एप्रिल रोजी राळेगाव व कळंब तालुका शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
  
मानवी हक्क सुरक्षा परीषेदेची महिला व पुरुष कार्यकारिणीची निवड ही चिंतामणी देवस्थान कळंब येथे दिनांक ३ एप्रिल रोज गुरुवारी करण्यात आली आहे. कळंब तालुका अध्यक्षपदी कविश्वर गेडाम यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अशोक उमरतकर, गजानन राऊत सचिवपदी, देवानंद भुजाडे कोषाध्यक्षपदी, विरेंद्र चव्हाण प्रवक्तेपदी, ज्ञानेश्वर फूलझेले संपर्क प्रमुखपदी, , विशाल वाघ संघटकपदी, तर बसवेश्वर‌ माहुलकर सह संघटकपदी यांची निवड करण्यात आली आहे.तर कळंब तालुका महिला अध्यक्षपदी स्वाती धवणे तर उपाध्यक्षपदी सौ.दुर्गाताई वाघाडे, तर सचिवपदी सौ. प्रेमिला लोनकर, मनिषा येलकर कोषाध्यक्षपदी, ममता गेडाम सहसचिवपदी, ज्योती नाईक सह कोषाध्यक्षपदी,यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे , नानासाहेब बोनगिरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश, अमोल कुमरे अध्यक्ष मारेगाव तालुका, हुसकुले यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन व आभार अशोक उमरतकर यांनी केले.

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

'शहीद' मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि 'मेरे देश की धरती' सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या 'पुरब और पश्चिम' सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. 'रोटी कपडा और मकान' सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. 

मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

अ‍ॅड.मेहमूद पठाण यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील ख्यातीप्राप्त अ‍ॅड. मेहमूद खान पठाण यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅड. मेहमूद खान हे गेले अनेक वर्षे वकील म्हणून यशस्वीपणे मारेगाव तालुक्यात कार्यरत आहेत. 

मारेगाव येथील उच्चशिक्षित असलेले अ‍ॅड. मेहमूद खान यांचे बि. कॉम, एल.एल.बि, जर्नालिझम अँड मॉस कम्युनिकेशन डिप्लोमा, सिव्हील इंजिनियर डिप्लोमा हे शिक्षण झाले आहे. ते मारेगाव तालुका वकील संघांचे पदाधिकारी आहेत. त्यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड. मेहमूद खान यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य राजूर येथे एक विविध कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी : आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 05 एप्रिल 2025 रोज शनिवारला राजूर येथील बिरसा भूमी येथे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्र्वर शेडमाके व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी 9 वाजता आदिवासी संस्कुती नुसार निसर्ग पूजन म्हणून गोंगो पूजा व आदिवासी ध्वजाचे पूजन होईल. त्यानंतर साय. 7 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन मा. संजयभाऊ देरकर आमदार वणी विधानसभा यांच्या हस्ते व मा. डॉ सुनीलकुमार जुमनाके बालरोग तज्ञ तथा संचालक सुगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होईल. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वणीतील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. महेंद्रसिंग लोढा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. निलेश अपसुंदे सहपोलिस निरीक्षक वणी, मा संघदीप भगत माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, सौ. अश्विनी ताई प्रकाश बल्की उपसरपंच ग्रामपंचायत राजूर, मा. प्रणिता ताई मो. असलम माजी सरपंच ग्रामपंचायत राजूर,
मा सौ. संगीताताई विजय गोबाडे सरपंच ग्रामपंचायत भांदेवाडा, मा. वामन पा. बल्की पोलीस पाटील राजूर, मा. विजयभाऊ पेंदोर सामाजिक कार्यकर्ता यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.

त्यानंतर साय 7.30 वाजता क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर आधारित एकपात्री प्रयोग मा.रामचंद्र आत्राम सर सादर करतील त्यानंतर साय. 8 वाजता गोंडी व भीम गीताचा संगीतमय कार्यक्रम आदिवासी गोंडी ऑर्केस्ट्रा बल्लारपूर व संच सदर करणार आहे. 

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तथा निमंत्रण आदिवासी जनजागृती युवा संघटनेचे ॲड अरविंद सिडाम, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, रोहित किनाके यांनी दिले आहे.

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

झरी जामणी : शेतशिवारात काम करतांना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून गतप्राण झाल्याची दुर्देवी घटना आज गुरुवार ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान घडली. या घटनेने बंदी वाढोणा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वसंत नरसिंग चव्हाण (वय 40) असे वीज पडून मृत्यूमूखी पडलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वसंत हा शेतात काम करीत होता. बदलत्या वातावरणाने आज सकाळी बंदी वाढोणा परिसरात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली होती. अशातच विजेचा गडगटात होवून वीज अंगावर कोसळल्याने शेतात काम करणारे शेतकरी चव्हाण हे जागीच ठार झाले. 

वसंत यांच्या पाठीमागे आई वडील, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.