सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
झरी जामणी : शेतशिवारात काम करतांना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून गतप्राण झाल्याची दुर्देवी घटना आज गुरुवार ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान घडली. या घटनेने बंदी वाढोणा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वसंत नरसिंग चव्हाण (वय 40) असे वीज पडून मृत्यूमूखी पडलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वसंत हा शेतात काम करीत होता. बदलत्या वातावरणाने आज सकाळी बंदी वाढोणा परिसरात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली होती. अशातच विजेचा गडगटात होवून वीज अंगावर कोसळल्याने शेतात काम करणारे शेतकरी चव्हाण हे जागीच ठार झाले.
वसंत यांच्या पाठीमागे आई वडील, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.