मानवी हक्क सुरक्षा परीषेदेच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी विनोद माहुरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राळेगाव : मानवी हक्क सुरक्षा परीषेदेची महिला व पुरुष कार्यकारिणीची निवड राळेगाव येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक ३ एप्रिल रोज गुरुवारी करण्यात आली आहे.
 
राळेगाव तालुका अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके, रमेश आसुटकर कोषाध्यक्षपदी, रविंद्र निवल सचिवपदी, अमृत पाझारे संपर्क प्रमुखपदी, शंकर मांदाडे कोषाध्यक्षपदी तर सुधाकर दांडेकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच राळेगाव तालुका महिला अध्यक्षपदी सौ.संतोषी वर्मा तर उपाध्यक्षपदी सौ.दुर्गाताई मेघरे तर सचिवपदी सौ. अ‍ॅड. रोशनीताई कामडी (वानोडे) यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे, नानासाहेब बोनगिरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश, अमोल कुमरे अध्यक्ष मारेगाव तालुका, हुसकुले यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन व आभार शंकराव मांदाडे यांनी केले.
मानवी हक्क सुरक्षा परीषेदेच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी विनोद माहुरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके यांची निवड मानवी हक्क सुरक्षा परीषेदेच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी विनोद माहुरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on April 03, 2025 Rating: 5
Powered by Blogger.