क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य गणेशपूर (वणी) येथे सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती गणेशपुर यांचे संयुक्त विद्यमाने दि.३ जाने. २०२५ ला  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गणेशपुर येथील ग्रामपंचायत समोरील पटांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यक्रम खालीलप्रमाणे :
 
भव्य मिरवणुक
सकाळी (प्रारंभ छत्रपती स्मारक येथून व गावातील प्रमुख मार्गानी वाद्यवृंदा सह) श्री गुणवंत पचारे सर, संत गाडगेबाबा यांच्या प्रमुख भुमिकेत

वेशभुषा स्पर्धा
  
महिला व लहान मुले मुलीकरीता
सकाळी 11 वाजता प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत 
 सौ. किरणताई देरकर, संस्थापिका, सन्मान स्त्री शक्ती फॉऊंडेशन, वणी
विशेषअतिथी : मा.डॉ. राणा नुर सिद्दिकी, सचिव, मुरजहाँ बेगम चॅरीटेबल ट्रस्ट, वणी,
प्रमुख पाहुणे :
मा. कर्माताई तेलंग, चेअरमन, सक्षम बहुउद्देशिय संस्था, वणी, मा. सौ. आशाताई जुनगरी, सरपंचा, ग्रा.पं. गणेशपुर,
मा. सौ. रुपालीताई सु. कातकडे, सरपंचा, ग्रा.पं. चिखलगांव, मा. सौ. संध्याताई बोबडे, जिल्हाध्यक्षा, महिला काँग्रेस
मा. श्रीमती. श्यामाताई तोटावार, अध्यक्षा, वणी शहर, काँग्रेस, मा. सौ. विणाताई पावडे, मुख्याध्यापिका, जि. प. शाळा, गणेशपुर मा. श्रीमती. विजयाताई ठाकरे, मा. सौ. सुनिताताई बोढे, मा. सौ. रुपालीताई आवारी, कोतवाल,
मा. श्रीमती मनिषाताई घोटकर अंगणवाडी सेविका, मा. सौ. विद्याताई विधाते, सदस्या, ग्रा.पं. मा. सौ. सुरेखाताई बलकी,
मा. सौ. विद्याताई भगत, मा. सौ. करिश्मा आसुटकर, मा. सौ. वर्षाताई घाटे, सदस्या, ग्रा.पं. 

सायंकाळी 6 वाजता जाहीर कीर्तन

उ‌द्घाटक :
मा. श्री. संजयभाऊ देरकर
आमदार, वणी विधानत्तभा क्षेत्र
प्रमुख पाहुणे :
प्रशांत खारकर, उपसरपंच, ग्रा.पं. गणेशपुर,
तेजराज बोढे, माजी सरपंच, ग्रा. पं. गणेशपुर,
दिलीप भोयर, गुरुदेव सेना, वणी. बबन पा. कवरासे, पोलीस पाटील, गणेशपुर दगडू नि. पवार, ग्रामसेवक, गणेशपुर

सायं. ७.०० वा.
समाज प्रबोधनपर जाहिर किर्तन
डॉ. रामपाल महाराज धारकर प्रबोधनकार व सप्तखंजेरी वादक (सत्यपाल महाराज व संदीपपाल महाराज यांचे शिष्य) रा. तूरखेड ता. अंजनगांव (सुर्जी), जि. अमरावती
ह्या सर्व कार्यक्रमला उपस्थिती राहण्याचे आवाहन केले आहेत. क्रां. सावित्रीबाई फुले जयंती महिला समारोह समिती, सन्मान स्त्रीशक्ती फाऊंडेशन, गणेशपुर सौ. वृषालीताई प्रविण खानझोडे, सौ. मिनाक्षी मोहिते, सौ. दर्शना पाटील, सौ. प्रणाली चिडे. सौ. नंदा वांदरे, सौ. प्रिती भेंडाळे, सौ. गुड्डीताई तुरकर, सौ. रंजना भेंडाळे, सौ. मनिषा येसेकार यांनी आवाहन केले आहेत

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय नृत्य स्पर्धा "नाट्य नर्तन" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील कु. भार्गवी विरेंद्र महाजण, कु. उर्वी प्रणित बांगडे, कु. सिया सचिन डोर्लीकर, कु. त्रिशा भावेश हरपलवार, चि. आरुश सुधीर पांडे, कु. सान्वी शिंदे, कु. धृविया रासेकर, कु. युक्ता साहारकर, कु. सानिध्या झाडे, कु. राजेश्वरी तुषार कोंडावार यांनी विविध नृत्य स्पर्धेमध्ये नाट्य नर्तन या स्पर्धेमध्ये एकल, युगल आणि समुह नृत्य अशा विविध स्पर्धेत सहभाग घेवुन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवत वणीतील स्पर्धकांनी बाजी मारली.
      
वरिल आयोजित अखिल भारतीय नृत्य स्पधेमध्ये नाट्य नर्तन या स्पर्धेमध्ये एकल, युगल आणि समुह नृत्य या नृत्याकरीता कु. भार्गवी विरेंद्र महाजण हिने चार प्रथम पारितोषीक पटकावले तर कु. उर्वी बांगडे हिने एकल व युगल, समूह या दोन्हीही नृत्याकरीता तीन प्रथम पारितोषीक पटकावित वणीची शान राष्ट्रीय पातळीवर उंचावली. या शिवाय एकल नृत्य स्पर्धेमध्ये कु. त्रिशा हरपलवार हिने द्वितीय पारितोषीक तसेच चि. आरूश पांडे याने प्रथम, कु. सान्वी शिंदे हिने द्वितीय, कु. युक्ता साहारकर हिने द्वितीय, कु. सानिध्या झाडे हिने द्वितीय तर राजेश्वरी कोंडावार हिने तृतीय पारितोषीक मिळवत वणीतील नृत्य चमुनी वणीकरांची मान उंचावली.नृत्य गुरुरत्न कु. पुजा धनवटे यांनी मोलाची कामगिरी केल्यामुळे त्यांना सुध्दा उत्कृष्ट नृत्य गुरुरत्न म्हणुन या प्रसंगी गौरविण्यात आले.
या बाबत असे की, अशा नृत्य स्पर्धा दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असुन या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक भाग घेत असतात.याआधी हिच स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील नांदेड व गोवा येथील पणजी येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सुद्धा याच स्पर्धाकांनी पारितोषिक पटकविले होते. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये वणीतील चमूंनी बाजी मारणे, हे वणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. वणीतील चमुंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विजय मिळवत प्रथम पारितोषीक पटकाविल्याने स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. स्पर्धकांनी या विजयाचे श्रेय त्यांचे आई वडील व गुरूजनांना दिले आहे.




वणी वकील संघातर्फे वकिलांचे टेनिस बॉल चे सामने संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वकील क्रिकेट संघा द्वारा दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2024 ला शासकीय मैदान वणी येथे तीन दिवसीय वकिलांचे टेनिस बॉल क्रिकेट चे सामने आयोजित केले होते.. या सामन्यामध्ये चंद्रपूर, राळेगाव, माहूर, किनवट, मारेगाव, यवतमाळ, झरी जामनी येथील वकिलाच्या टीम आल्या होत्या. या सामान्यांचे उद्घाटन दिनांक 27/12/2024 रोजी अध्यक्ष मा ॲड वसंतराव कावडे, उद्घाटक वणी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश मा शेख साहेब, प्रमुख अतिथी ॲड कुणाल चोरडिया, ॲड निलेश चौधरी, ॲड ज्ञानेश्वर लोडे, ॲड घनश्याम निखाडे, ॲड भास्कर ढवस, ॲड विनोद चोपणे, ॲड मिलिंद निमजे, ॲड विनायक काकडे, ॲड डी के कातकडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या सामन्यात प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 31000/- वणी अर्बन निधी लि. द्वारा ॲड कुनालभाऊ चोरडिया यांच्या कडून ए के 47 क्रिकेट संघ चंद्रपूर यांना देण्यात आले, दुसरे पारितोषिक रक्कम रुपये 21000/- श्री. रंगनाथ स्वामी सह.पत.संस्था मर्यादित वणी द्वारा ॲड देविदासजी काळे यांच्या कडून वणी न्यायालय संघ यांना देण्यात आले व तृतीय पारितोषिक रक्कम रुपये 15000/- ओम बिल्डर्स अँड डेवलोपर्स द्वारा संजयभाऊ निमकर यांच्या कडून राळेगाव वकील संघ यांना देण्यात आले. प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या संघांना रॉयल फाउंडेशन हेल्पींग हँड्स द्वारा ॲड नीलेशभाऊ चौधरी यांच्या कडून चषक देण्यात आले. मॅन ऑफ दी सिरीज ए के 47 चंद्रपूर संघाचे ॲड विकास, बेस्ट बॅट्स मॅन रवी राठोड, बेस्ट कॅचर ॲड सुधीर पेन्दोर, बेस्ट विकेट किपर ॲड अमोल गौरकार, बेस्ट बॉलर ॲड अजित पांडे यांना ॲड वसंतराव कावडे यांच्या कडून देण्यात आले. तसेच मॅन ऑफ दि मॅच स्व. ॲड अनंतराव देशपांडे सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲड आनंद जोशी यांच्या कडून देण्यात आले.
या सामन्यात वणी वकील संघाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन तीन दिवसीय सामने यशस्वीरीत्या पार पडले.

नवीन वर्षाच्या पर्वावर कोलाम समाजाच्या मूलभूत हक्कासाठी इंदिरा बोंदरे यांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : अन्नूपोड येथे 1जानेवारी 2025 पासून शामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी कोलाम चावडीत आमरण उपोषण सुरू केले असुन याबाबत नागपूर येथे जावून मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणविस उपमुख्यमंत्री ना अजित पवार, ना एकनाथ शिंदे आदिवासी विकास विभागाचे सचिव सहित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यसचिव सौ सुजाता सैनिक यांना निवेदाद्वारे महिती सादर करुन जिल्हाअधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी तथा एकत्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा तहसीलदार केळापूर वन परिक्षेत्र कार्यालय पांढरकवडा सहित वडकी पोलिस स्टेशन यांना माहिती दिलेली असल्याची माहिती इंदिरा बोंदरे यांच्या सोबत उपोषणाला बसलेले कृष्णा मडावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुढे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की,अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाजाने मुंजाला येथील गट क्र १०१/१/ ब ऐकून क्षेत्रफल १२१:३३ आर पैकी कोलाम समाजाच्या लोकांनी सन १९९० पूर्वी पासून शेतीसाठी अतिक्रमण केलेले असुन सन २०२४ /२५ च्या खरीप हंगामा पर्यंत सतत कब्जात आहे. यावर्षी वन विभागाकडून जमिनी निष्कासित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत कोलाम समाज्याच्या कब्जात असलेल्या प्रत्येकी २ हेक्टर ऐकून ७० एकर जमिनी वगळून वन विभागाने काम सुरू करावे तसेच अन्नू पोड ते धाई पोड मार्गे मुंजाला पर्यंत पक्का पोहच रस्ता बनविण्यात यावा, टेंभूर्णी घाट ते अन्नू पोड डांबरीकरन कऱण्यात यावे, कोलाम समाजाला स्वतंत्र दफन भूमी आरक्षित करुन देण्यात यावी, अन्नू पोड वरील बेघर लोकांना घरकुलचा लाभ देण्यात यावा, कोलाम समाजाचा शिक्षक नियुक्त करण्यात यावा, अन्नू पोडावर स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटाकडे देण्यात यावा, अन्नू पोडावरील चावडीचे पुनर्विकास करण्यात यावा विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा अशा विविध समस्या घेवून शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महीला अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे ह्या कोलाम समाजाच्या महीला पुरुषांना सोबत घेवून अन्नू पोड चावडीत नवीन वर्षाचे पर्वावर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. नवीन वर्षाच्या पर्वावर लोक आनंद व्यक्त करतांना दिसतात परंतू कोलाम समाज हा आपल्या मूलभूत अधिकार करिता नवीन वर्षाच्या सुरवातीला संघर्ष करीत आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सौ. बोंदरे यांनी केला असुन राळेगाव मतदार संघाचे आमदार तथा आदिवासी मंत्री प्रा. अशोक उईक उपोषण कर्त्याची भेट घेणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण बेमुदत सुरू राहणार असल्याचं उपोषण कर्ते कृष्णा मडावी, केशव वडदे, चंडकु कडकी, वसंता रामपूरे, अंबादास टेकाम, अविनाश जांभूळकर, मारोती रामपुरे, वामन रामपुरे, किसन रामपुरे, अर्चना अत्राम मनोहर वडदे चंद्रकला रामपुरे गंगाराम अत्राम रामकृष्ण मडावी, विलास खडसे सहित अन्नूपोड वरील महिला पुरुषांनी संकल्प घेतला आहे. 

या नवीन वर्षाच्या पर्वावर सुरू झालेल्या कोलाम समाजाच्या आमरण उपोषणाची आदिवासी मंत्री तथा राळेगाव मतदार संघाचे आमदार प्रा. अशोक उईके कशी दखल घेतात याकडे कोलाम समाजाचे लक्ष लागलेले आहे. 

      

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2025 या नववर्ष कॅलेंडरचे वणी येथे प्रकाशन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्यपक्षाने नववर्षाचे कॅलेंडर काढले आहे.या कॅलेंडरचे राज्यातील सर्व जिल्ह्या जिल्ह्यात प्रकाशन सोहळे झालेत.याच अनुषंगाने काल नववर्षाच्या पुर्वसंध्येला जि.प.काॅलनी येथील कार्यालयात पक्षाच्या नववर्ष कॅलेंडरचे जेष्ठ नेते काॅ.प्रा.धनंजय आंबटकर यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हासचिव अनिल घाटे,राज्य‌ कौंसिल सदस्य सुनिल गेडाम व अ.भा.दलीत अधिकार आंदोलनचे वणी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते.हे कॅलेंडर जिल्ह्यातील सर्व सभासदांना वितरित केल्या जाणार आहेत.या कॅलेंडरची सहयोग राशी 50 रु.ठेवण्यात आली आहे.

ईतरांना हवी असल्यास बुकींग करावे व कार्यालयातुन प्राप्त करुन घ्यावे.कार्यक्रमाचे संचालन अथर्व निवडिंग यांनी तर आभार मारोती काळे यांनी मानले.