शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढीला जबाबदार असणाऱ्या सरकारला पाळा : कॉ. अनिल हेपट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
  
वणी : दिवसा गणिक शेतकरी, शेंतमजूर आत्महत्या वाळीला जबाबदार सरकारला पाळा, पळत्याच्या बाजूने उभे राष्टनेतृत्व करणाऱ्या सि पी आयच्या राष्टधोरण समजून इळा ऊंबई चिन्हावर फुलीचा शिक्का मारून कॉ. अनिल हेपट यांना विजय करणे गरजेचे कसे काय? मतदात्याच्या फायदयाचे राहतील हे त्यानी मतदार संवाद चर्चातुन सांगते केले.
   
कृषी संकट गंभीर आहे आणि भारतात दर तासाला दोन शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते. त्याचे कारण असे की, कीपायची रमी भाव न मिळाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेती करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या अव्यवहार्य झाले आहे. 86 टक्के शेतकरी कुटुंबाकडे दोन एकर पेक्षा कमी जमीन आहे आणि त्यांचे बाजारात प्रचंड शोषण होत आहे. शेती सोडून त्यांना स्थलांतरित कामगाराच्या श्रेणीत सामील व्हावे लागत आहे.
  
सी 2+50 टक्के हमी भाव लागू करण्याच्या आश्वासन दिले होते. त्या कृतीत जर सरकार आपले अभिवचन पूर्ण करीत नसेल तर महाराष्टातील त्याची पोषक पाठीराखे हे शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करणारे नेतृत्व समजणे म्हणजे आपलीच कुराड आपलेच पाय फोळून घेण्याची कूट नीती समजून मतदात्यांनी मत देणे गरजेचे आहे.असे संवाद चर्चा वेळी कॉ. अनिल हेपट यांनी सूचक बोधिक आकलन पर विचार मथन केले.

संजय खाडे यांनी रंगनाथ स्वामी मंदिरात साकडे घालून प्रचाराला प्रारंभ : कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीत निघाली रॅली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील आघाडी चे बंडखोर, काँग्रेसचे नेते तथा अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या जाहीर प्रचाराला आज (ता. 6) बुधवारी शहरातील दिपक चौपाटी येथील रंगनाथ स्वामी मंदिरातून प्रचार नारळ फोडण्यात आले. यावेळी काँग्रेस, शिवसेना समर्थक व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. 

शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या रंगनाथ स्वामींना साकडे घालून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली भगतसिंग चौकातून खाती चौकात आली. तेथून टिळक चौकात पोहोचली. यावेळी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. संत गाडगेबाबा चौक, गांधी चौक, अशी ही रॅली नागरिकांना अभिवादन करत पोहोचली जैताई मंदिर येथे या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर भांदेवाडा, वनोजा देवी, घुगलधरा, वेगाव, वरझडी असा प्रचार दौरा असणार आहे. या दरम्यान, विश्वकर्मा चौक येथील महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. संजय खाडे यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात असताना स्वतःहून नागरिक त्यांच्या स्वागतासाठी पुढे येताना दिसत होते. त्यामुळे कृतिशील नवीन चेहरा आणि परिवर्तनाची नांदी म्हणून संजय खाडे यांच्याकडे "शिट्टी" या चिन्हा कडे आकर्षित होत असल्याचे दिसून आले.

या रॅलीत माजी आमदार विश्वास नांदेकर, काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, जनहित कल्याण चे अध्यक्ष गौरीशंकर खुराना, पुरुषोत्तम आवारी, संजय आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथरडकर यांच्यासह आघाडीतील बंडखोर सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने महिलां मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

अशी कोणतीही घटना घडली नसल्याची जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेतून दिली माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील भाजप कार्यालयात आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचे वृत्त मंगळवारी समाज माध्यमावर प्रसारित झाले. त्यांनंतर या व्यक्तव्याचा निषेध म्हणून सर्व समाजांनी बांधवानी एकत्र येण्याचे आवाहन ही करण्यात आलं. मात्र,अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे भाजप च्या वतीने काल रात्री पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली आहे. 

दि. 5 नोव्हेंबर रोज मंगळवार ला समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह वृत्तांने चांगलीच खळबळ माजली. कुणबी समाजामध्ये संतापाची लाट उसरली. कार्यकर्ते वणी पोलिसात धडकले. गुन्हे दाखल करा व तत्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली. मात्र, हा खोडसाळ पणाचा प्रकार असून अस काहीही घडलं नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रसार माध्यमातून खंडन केले आहे. तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा राजकीय षडयंत्र असल्याचे आ. बोदकुरवार यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केलं. 

यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, संतोष डंभारे व कुणबी समाजाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मी असल्या फुकट च्या योजना देणार नाही, मी हाताला काम आणि महिलांना सक्षम करणार - राज ठाकरे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : उद्या येतील, तोंडावर फेकून पैसे मारतील तुमच्या. कारण त्यांना माहितीये की,समोर बसलेले चिडत नाही, चिडू शकत नाही, हे आमचे गुलाम आहे. निवडणुकीच्या दिवशी फरफटत येतील. उन्हातान्हात रांगेत उभे राहतील, मतदान आम्हालाच करतील. जो पर्यंत यांची जागा, लायकी तुम्ही दाखवणार नाही तो पर्यंत आकडे वाढत राहतील, जर पुन्हा तुम्हाला असल्या लोकांना मतदान करायचं असेल तर तुमचं आयुष्य तुम्हाला लखलाभ असो. असे राज ठाकरे यांनी वणी येथील राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित करताना म्हणाले. 
राज ठाकरेंनी वणी (ता.5 नोव्हेंबर) येथील शासकीय मैदान पाण्याच्या टाकी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले. आत्महत्या ही यवतमाळ जिल्हाची ओळख; तरी देखील ह्यांना आपण मत देतो. हिच वेळ आहे या असल्या लोकांना घरी बसवण्याची. निवडणुकीच्या दिवशी जिवंत राहा, मतदान केल्या नंतर मेलात तरी चालेल, असे राज ठाकरे भर सभेत कडाडले. मी असल्या फुकट च्या योजना देणार नाही, मी हाताला काम आणि महिलांना सक्षम करणार असेही ते म्हणाले. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवारी सायंकाळी मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्यासह गजानन वैरागडे वासिम विधानसभा, सागर दुधाने, बेंजराम किनकर, प्रवीण सूर, गणेश बरबडे, अश्विन जयस्वाल, सतीश चौधरी, संदीप कोरू, घनश्याम निखाडे, आदित्य दुरुतकर सचिन भोयर आणि सचिन चौधरी या उमेदवारांसाठी वणीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. 
यावेळी त्यांनी जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्या सर्वाना रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले. शेवटी या सभेची सांगता पक्षाचे पदाधिकारी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने करण्यात आली. 

हे आहेत अंतिम उमेदवार, यांची माघारी, तर 'हे' झाले बाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 76-वणी विधानसभा निवडणुकीच्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मनसेचे राजू मधुकरराव उंबरकर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय निळकंठ देरकर, भाजपाचे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अनिल घनश्याम हेपट, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र कवडुजी निमसटकर, बहुजन समाज पार्टीचे अरुणकुमार रामदास खैरे, संजय रामचंद्र खाडे, तसेच केतन नत्थुजी पारखी, नारायण शाहू गोडे, हरिष दिगांबर पाते, निखिल धर्मा ढुरके आणि राहुल नारायण आत्राम हे उमेदवार आहेत.

दरम्यान, यशवंत शिवराम बोंडे, अजय पांडुरंग धोबे, आसिम हुसैन मंजूर हुसैन आणि प्रवीण रामाजी आत्राम यांनी आज आपले अर्ज मागे घेतले. तसेच छाणणीच्या वेळी देवराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव भादीकर यांचे अर्ज अवैध ठरवले गेले होते. यामुळे रिंगणात आता 12 उमेदवार कायम आहेत.