टॉप बातम्या

अशी कोणतीही घटना घडली नसल्याची जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेतून दिली माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील भाजप कार्यालयात आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचे वृत्त मंगळवारी समाज माध्यमावर प्रसारित झाले. त्यांनंतर या व्यक्तव्याचा निषेध म्हणून सर्व समाजांनी बांधवानी एकत्र येण्याचे आवाहन ही करण्यात आलं. मात्र,अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे भाजप च्या वतीने काल रात्री पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली आहे. 

दि. 5 नोव्हेंबर रोज मंगळवार ला समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह वृत्तांने चांगलीच खळबळ माजली. कुणबी समाजामध्ये संतापाची लाट उसरली. कार्यकर्ते वणी पोलिसात धडकले. गुन्हे दाखल करा व तत्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली. मात्र, हा खोडसाळ पणाचा प्रकार असून अस काहीही घडलं नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रसार माध्यमातून खंडन केले आहे. तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा राजकीय षडयंत्र असल्याचे आ. बोदकुरवार यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केलं. 

यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, संतोष डंभारे व कुणबी समाजाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post