टॉप बातम्या

संजय खाडे यांनी रंगनाथ स्वामी मंदिरात साकडे घालून प्रचाराला प्रारंभ : कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीत निघाली रॅली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील आघाडी चे बंडखोर, काँग्रेसचे नेते तथा अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या जाहीर प्रचाराला आज (ता. 6) बुधवारी शहरातील दिपक चौपाटी येथील रंगनाथ स्वामी मंदिरातून प्रचार नारळ फोडण्यात आले. यावेळी काँग्रेस, शिवसेना समर्थक व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. 

शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या रंगनाथ स्वामींना साकडे घालून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली भगतसिंग चौकातून खाती चौकात आली. तेथून टिळक चौकात पोहोचली. यावेळी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. संत गाडगेबाबा चौक, गांधी चौक, अशी ही रॅली नागरिकांना अभिवादन करत पोहोचली जैताई मंदिर येथे या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर भांदेवाडा, वनोजा देवी, घुगलधरा, वेगाव, वरझडी असा प्रचार दौरा असणार आहे. या दरम्यान, विश्वकर्मा चौक येथील महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. संजय खाडे यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात असताना स्वतःहून नागरिक त्यांच्या स्वागतासाठी पुढे येताना दिसत होते. त्यामुळे कृतिशील नवीन चेहरा आणि परिवर्तनाची नांदी म्हणून संजय खाडे यांच्याकडे "शिट्टी" या चिन्हा कडे आकर्षित होत असल्याचे दिसून आले.

या रॅलीत माजी आमदार विश्वास नांदेकर, काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, जनहित कल्याण चे अध्यक्ष गौरीशंकर खुराना, पुरुषोत्तम आवारी, संजय आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथरडकर यांच्यासह आघाडीतील बंडखोर सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने महिलां मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post