बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय् हक्कासाठी संविधनात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतीकारी संघटना म्हणजे बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून दिनांक 14ऑक्टोंबर रोजी नागपुर येथील टिळक भवन येथे दलीत आदिवासी भूमिहीन ओबीसी जमिन हक्क परिषद संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असुन उद्घघाटक म्हणून लोर्ड बुद्धा टीव्ही चे संपादक भैयाजी खैरकर तर प्रमुख मार्गदर्शक नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पुरण मेश्राम, टिळक भवन चे व्यवस्थापक प्रभाकर दुपारे व प्रमुख उपस्थिती आर पी आय नेते महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त अनील गांगुर्डे भारतीय दलीत पँथर चे औंरंगाबाद येथील लक्ष्मण भुतकर सहीत विविध संघटनेचे विचारवंत या परिषदेला उपस्थित राहणार असुन यवतमाळ जिल्ह्यातून बिगर सातबारा शेतकऱ्याने सहभागी व्हावे याकरीता बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा ओबीसी नेते देवराव वाटगुरे यांच्या अध्यक्षतेखाली मांरेगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डा सुखदेव कांबळे, शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे उपस्थित होत्या.

अ‍ॅड. पूजा मत्ते सुवर्णपदक (Gold Medalist) पुरस्काराने सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा 11 वा आणि 12 वा दीक्षांत समारंभ 2 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन हे होते.

या समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, प्रमाणपत्रे, पीएचडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थीनी कु. पूजा देवराव मत्ते रा. वनोजा देवी (ता. मारेगाव) यांनी (LL. M) मास्टर ऑफ लॉ मध्ये सर्वांधिक मार्क्स घेऊन मेरिट मध्ये आल्याबद्दल दिनांक 2/10/2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झालेल्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक (गोल्ड मेडलिस्ट) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या समारंभात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे डीन आणि विद्यार्थी उपस्थित होते. 


संजय सोळंके मारेगावचे नवे ठाणेदार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची जागा आता उमरखेडचे ठाणेदार संजय सोळंके यांनी घेतली. 

प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली करण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा पोलीस अधिकारी चिंता यांचे मारेगाव कार्यालयाला प्राप्त झाले. त्यांच्या जागी आता उमरखेडचे ठाणेदार यांची मारेगाव पोलीस स्टेशनला बदली झाली असून पोलीस निरीक्षक संजय दगडू सोळंके यांनी येथील ठाण्याची सूत्रे हाती घेतली. 

अचानक झालेल्या अदला बदलीने मारेगाव तालुक्यातील जनता अवाक झाली असून नव्याने रुजू झालेल्या साहेबांची "एन्ट्री" ही तालुक्यातील अवैध "कन्ट्री" बंद करतील का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पांढरकवडा येथील तरुणाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी 5 ऑक्टोंबरला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. 

आशिष दिंगबर आस्वले (वय 33) रा. पांढरकवडा असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील आशिष आस्वले यांनी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. मृतकाकडे दोन हेक्टर शेती असल्याचे कळते.

आशिषने विष ग्रहण केल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दखल केले,प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला हलविण्यात आले. मात्र रस्त्यात त्याचे निधन झाले असे समजते. मृतकाच्या पाठीमागे आईवडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. 

सिध्दार्थ वसतीगृहात पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 4 आक्टोंबर रोजी सिध्दार्थ वसतीगृहात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.पुरुषोत्तम पाटील तर प्रमुख, पाहुणे म्हणून पणन महासंघाचे संचालक तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय खाडे, प्राचार्य डॉ.शंकरराव वह्राटे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.एस.एस.सोनारखण, सचिव नवनाथ नगराळे, सहसचिव प्रा.बा.ग.राजूरकर, कोषाध्यक्ष जगदिश भगत, संचालक डि.एन.कांबळे, भाऊराव मजगवळी व दाधिकारी उपस्थित होते.

सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सत्कारमुर्ती संजय खाडे यांना शाल व श्रीफळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व द्वितिय महायुद्ध हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना संजय खाडे म्हणाले की, 'माझा तुम्हाला अंतिम संदेश एकच आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे'. आपण हे अंगीकरलं पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वसतिगृहातील मुलांना 24 बेड भेट देण्याचे वचन दिले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.शंकर व-हाटे यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे उपाध्यक्ष एस.एम.सोनारखन यांनी वसतिगृहाला दहा हजार रुपये तर, सहसचिव प्रा.बा.ग. राजूरकर यांनी अकरा हजार रुपये मदत दिली. त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे दिवंगत सदस्य ॲड.अशोक मानकर यांनी सुद्धा आर्थिक मदत केल्यामुळे छब्बूताई मानकर यांना साडीचोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा.पुरूषोत्तम पाटील यांनी वसतिगृह हे खानावळ नसुन ते मुलांवर संस्कार घडविण्याचे केंद्र आहे,असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नवनाथ नगराळे यांनी तर, संचालन व आभार प्रदर्शन अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवक कैलास वडस्कर व गुलाब भोयर यांनी सहकार्य केले. यावेळी पालक वर्ग व विद्यार्थी गण उपस्थित होते.