तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पांढरकवडा येथील तरुणाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी 5 ऑक्टोंबरला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. 

आशिष दिंगबर आस्वले (वय 33) रा. पांढरकवडा असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील आशिष आस्वले यांनी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. मृतकाकडे दोन हेक्टर शेती असल्याचे कळते.

आशिषने विष ग्रहण केल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दखल केले,प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला हलविण्यात आले. मात्र रस्त्यात त्याचे निधन झाले असे समजते. मृतकाच्या पाठीमागे आईवडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. 
तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.