मारेगावात पार पडली शांतता समितीची बैठक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गणपती उत्सव, ईद ए मिलाद हे सण शांततेत साजरे करावेत असे आवाहन मारेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी केले आहे. मारेगाव ठाण्याच्या वतीने येथील प्रांगणात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

या प्रसंगी माजी माजी गट नेता उदय रायपुरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, माजी सभापती खालिद पटेल, तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, पत्रकार जोतिबा पोटे, काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, राजेश घुमे, विजय मेश्राम, संपादक अजय रायपुरे, कॉ.बंडू गोलर, तसेच शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, तथा मस्जिद कमिटी सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

भोगवटा वर्ग २ ते १ ची सर्व प्रलंबित प्रकरणे येत्या २ महिण्यात निकाली काढा : हंसराज अहीर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यातील भोगवटा वर्ग २ ची वर्ग १ मध्ये वर्गीकरण* करण्यासाठीची प्रलंबित व नव्याने दाखल केलेली प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढावी असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले.

वरोरा, भद्रावती या दोन्ही तालुक्यामध्ये भो. वर्ग २ मधून भो. वर्ग १ मध्ये परिवर्तीत करण्यासाठी मागासवर्गीय व अन्य प्रवर्गातील शेकडो शेतकरी बांधवांची प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तकारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल झाल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता मागासवर्ग आयोगाने दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी वरोरा येथील कटारिया सभागृहात महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वाटप, सिलींग,भूदान, कुळ, औद्योगीक, न.प. क्षेत्र व अन्य जमिनीचे भोगवटा २ ते १ करण्याच्या मागणी अर्जावर ही सुनावणी घेतली. 

मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जनसुनावणीला आयोगाचे सल्लागार व अन्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी कुंभार, वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्रा, वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर व महसुल विभागाचे विविध खातेप्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी इंजि. रमेश राजुरकर, करण देवतळे, बाबा भागडे, डॉ. भगवान गायकवाड, तुळशीराम श्रीरामे, विजय वानखेडे, ओम मांडवकर, राजु घरोटे, अंकुश आगलावे, नरेंन्द्र जिवतोडे, राजु गायकवाड, धनंजय पिंपळशेंडे, राजु गायकवाड, रोहिणीताई देवतळे, अॅड. सुनिल नामोजवार, प्रशांत डाखरे, अर्चना जिवतोडे, वसंता बावणे, पवन एकरे व दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.
 
या जनसुनावणीमध्ये मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी भोगवटा वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याकरिता मालमत्तेच्या ५० टक्के रक्कमेचा भरणा करण्याचा नियम असल्याने ही रक्कम कमी व्हावी याकरिता आयोगाच्या माध्यमातून राज्यशासनाकडे शिफारस केली जाईल असे, उपस्थित शेतकरी बांधवांना आश्वासन दिले. दोन्ही तालुक्यातील सर्व प्रकरणे शेतकऱ्यांच्या हिताशी निगडीत असल्याने ती व्यवस्थित हाताळुन प्रशासनाने या प्रकरणात तातडीने निर्णय घेत आयोगास अहवाल सादर करावा अशा सुचना जनसुनावणीस उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भोगवटा वर्ग २ ते १ संबंधात सविस्तर माहिती दिली.

निर्गुडा नदी (गणेशपूर घाट) पुलाची झालेली दुरावस्था तत्काळ करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरालगत असलेल्या निर्गुडा नदी (गणेशपूर घाट) पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून पुलावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत. त्यामूळे सदर पुलावरून रहदारी करणाऱ्या नागरीकांच्या जिवीतास हानी पोहोचण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अशा आशयचे निवेदन वंचित बहुजन आघाडी वणी च्या वतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी यांना आज शुक्रवारी (ता. ६) देण्यात आले. 

निवेदनात पुढे असेही नमूद की,सदर पुलावरील संरक्षण कठडेसुद्धा चोरीला गेल्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून केव्हाही अपघात घडू शकतो,त्यास संबंधित विभागाला जबाबदार असल्याचा आघाडी च्या वतीने म्हटलं गेलं आहे. 

त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी निर्गुडा नदीच्या (गणेशपूर घाट) पुलाची तातडीने दुरुस्ती करून होणारा पुढील अनर्थ टाळावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. जर दुर्लक्ष टाळाटाळ झाल्यास तर नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीला तीव्र आंदोलन पुकारावे लागेल असा, ईशारा ही निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभागावाला देण्यात आला आहे. 

निवेदन देताना तालुका अध्यक्ष हरीश पाते, अब्दुल गणी, प्रदीप मडावी, अब्दुल हनीफ, किशोर मून, शंकर रामटेके, मारोती पोटेकर, प्रतिभा ठमके, उत्तम मडावी, शारदा मेश्राम, रेष्मा भगत यासह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वणी नगर पथ समितीच्या सदस्य पदी फारुख शेख यांची अविरोध निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील नगर पथ विक्रेता समितीच्या पार पडलेल्या निवडणूकीत शेख फारुख शेख पीरसाहब हे वणी नगर पथ विक्रेता समिती मध्ये अल्पसंख्यांक या प्रवर्गातून सदस्य म्हणून अविरोध निवडून आले आहे. यांची अविरोध निवड करण्यात आली.

सचिन गाडे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद वणी, नगर पथ विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणूक २०२४ अन्वये त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, ऑगस्ट ३,२०१६/श्रवण १२, शके १९३८, महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम २०१४ अन्वये वणी नगर परिषद वणी, शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२४ अंतर्गत त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी वणी नगर परिषदचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

या निवडीने मित्र मंडळी व शहरात त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.