'कोब्रामॅन' संतोष वानखडे यांचे नागाला जिवदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अत्यंत शिताफीने साप पकडण्यात ज्यांचा हातखंडा आहे, असे संतोष वानखडे कोब्रामॅन ह्या नावाने त्यांना पंचक्रोशीत विशेष ओळख आहे.

सगनापूर, ता. मारेगांव येथील नामदेव चोलू आत्राम यांचे स्वयंपाक घरात असलेल्या सहा फुटी नागाला जिवदान देण्यात यश मिळाले. आजतागायत हजाराच्या वर त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या सापांना जिवदान दिले आहे. 

निसर्गाचे संतुलन राखण्याकरिता वन्यप्राण्यांप्रती सर्वांनी दया दाखविली पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.

झाड तोडाल तर 50 हजार दंड...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

• शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार (जलसंपदा विभाग)
• आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता ( गृहनिर्माण विभाग) 
• लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार, कर्ज उभारण्यास मान्यता ( नगरविकास विभाग)
• आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ. (आदिवासी विकास विभाग)
• अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार; अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय ( आदिवासी विकास विभाग)
• विना परवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार दंड (वन विभाग) 
• महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार (उद्योग विभाग)
• कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय (वैद्यकीय शिक्षण)
• न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा (विधी व न्याय विभाग)
• सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट (महसूल विभाग)
• जुन्नरच्या श्री.कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय (सहकार विभाग)
• ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन (सांस्कृतिक कार्य विभाग)


मारेगाव भाकप च्या नेत्या सहित अनेक कार्यकर्त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी असलेली विचारसरणी व शिस्त आणि अनुशासित संघटन बांधणी आणि जिल्ह्यात झालेल्या कॉ. शंकरराव दानव यांच्या जडणघडणीत निर्माण झालेला कार्यकर्ता वर्ग त्यांच्या निधनानंतरही तेवढ्याच ताकदीने उभा राहून कष्टकरी वर्गाचा एकमेव साथी म्हणून लाल झेंडा घेऊन संघर्ष करीत वाटचाल करीत आहे. 

ज्यामुळे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जनतेचे हित नाही व जोपर्यंत देशात समाजवादाची प्रस्थापना होत नाही तोपर्यंत जनतेला खरा न्याय मिळू शकत नाही हे जो जाणतो आणि राजकारणाची खरी दिशा समजतो तोच कम्युनिस्ट पक्षातील प्रामाणिकपणाची निष्ठा जोपासत त्यामध्ये सामील होऊन एक निष्ठावंत कार्यकर्ता बनतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा देशातील प्रामाणिक राजकारणाची एक जिवंत ज्वाला असून ते सातत्याने पेटत राहणार आहे. त्यामुळेच जनहिताला सर्वोपरी मानून व्यक्तिगत हिताला दुय्यम मानत माकपच्या चळवळीत सहभागी होतो. हाच धागा पकडून मारेगाव येथील नेते व कार्यकर्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले आहेत.

मारेगाव येथील भाकपचे नेते श्रीकांत तांबेकर व पुंडलिक ढुमणे यांचे सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अ‍ॅड.कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सभासद कॉ. अ‍ॅड. दिलीप परचाके व जिल्हा उपाध्यक्ष कॉ. मनोज काळे यांचे नेतृत्वात पक्षाचा सभासद फार्म भरून सदस्यत्व स्वीकारले. यावेळेस माकपचे मारेगाव तालुका नेते कॉ. रामभाऊ जिड्डेवार, कॉ. नंदू बोबडे उपस्थित होते. 

यावेळेस कॉ. अ‍ॅड. कुमार मोहरमपुरी, कॉ. अ‍ॅड. दिलीप परचाके व कॉ. मनोज काळे यांनी माकप च्या ध्येय धोरणाची, विचारसरणीची व सध्या देशातील राजकीय परिस्थितीची माहिती देण्यात आली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सभासद फार्म भरून सामील होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पुंडलिक ढुमने, श्रीकांत तांबेकर, धनंजय भोयर, बहिनाबाई चौधरी, प्रफुल आदे, नानाजी घोटेकर, सुरेश भोयर, वासुदेव रोडे आदी व अन्य जणांच्या समावेश आहे.

ढोकी (वाई) येथील नागरिकांचा मार्ग झाला सुककर


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : तालुक्यापासुन काही मैलाच्या अंतरावर असलेले दोन विघानसभेच्या सीमेवर असलेले ढोकी( वाई ) या गावाला अनेक समस्येंनी ग्रासले आहे .परंतु मागील कित्येक वर्षापासुन अव्हेलना भोगत असलेल्या ढोकी (वाई) गावाला कोणीच वाली नसल्याचे निर्देशनात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या जिवनावश्यक सुविधा रस्ते,पणी, विज या गरजांपासुन सुध्दा वंचित राहावे लागत आहे. ढोकी(वाई) गावाला जवळची बाजारपेठ म्हणुन करंजी(रोड) अवघ्या ३ कि.मी. च्या अंतरावर आहे. परंतु या ढोकी ते करंजी या बाजरपेठेला मार्गक्रमण करणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दैनिय झाली असुन जागो-जागी खड्डे पडले आहे. त्यामुळे “रस्त्यामध्ये खड्डे कि खड्डयात रस्ता” हा प्रश्न नागरीकांना पडला आहे.त्यामुळे या रस्त्यांनी ये-जा करणे कठीण झाले आहे. ढोकी गावालत असलेल्या ओढ्यानजिक अनेक तरुण, तरुणी, आबाल-वृध्द, दुचाकीस्वार पडुन अनेक अपघात झाले. आणि अनेकांचे प्राण यामधून बचावले आहे. हिच बाब ध्यानात घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांनी पुढाकार घेत, या ओढ्याजवळ मुरुम टाकण्यासंदर्भात ग्रामपंचायतसोबत पाठपुरावा केला. आणि एका दिवसात मुरुम टाकुन ढोकी (वाई) येथील नागरीकांचा मार्ग सुककर करुन खारीचा वाटा निलेश चौधरी व राऊत यांनी उचलला. त्यामुळे त्यांचे गावकऱ्यांमधुन त्यांच्यावर कौतुकास्पद ठरले आहे. यावेळी युवा ब्रिगेड मंगल राऊत, विशाल बोंडे, राम चिकनकर,कुणाल चौधरी, निखिल चिकनकर, रोशन राऊत, चेतन चिकनकर, प्रफुल ऊईकेसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

उमेदवार कोणीही असुद्या, त्याच्या पाठीशी खंबीर राहून आपल्याला काम करायचं आहे - संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : माझा जन्म कोकण, मात्र माझी कर्मभूमी मुंबई आहे.गेल्या चार वर्षांपासून आपल्या वणी चा संपर्क प्रमुख म्हणून करतो. त्यावेळी गट बाजी असतील, आजही असतील. आम्ही गट बाजी मानत नाही, आजही इमाने इतबारे पक्षासाठी काम करतोय, स्वतःची व्यक्ति हवी असेल तर उमेदवार कोणीही असुद्या त्याच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहून काम करायचं आहे,असे प्रतिपादन वणी विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर यांनी केले. ते विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणी विधानसभा मतदार संघात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने 'भगवा सप्ताह' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिकांच्या सत्कार प्रसंगी ते शिवसेना जनसंपर्क कार्यालयात बोलत होते. 

यावेळी विधानसभा प्रमुख संजय देरकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, उपजिल्हा महिला संघटिका डिमन टोंगे, माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, आदीं प्रामुख्याने उपस्थित होते. 

या सप्ताहात त्यांच्या हस्ते काही जेष्ठ शिवसैनिक यांचा सत्कार करण्यात आला. संपर्क प्रमुख श्री.पेडणेकर म्हणाले की, गेल्या तीस वर्षांपासून आपण काम करत आहात त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु,आपली जबाबदारी काय आहे ते सर्वांनी समजून घेऊन एकत्र येणं आणि काम करणं,तेव्हाच आपला विजय होणार आहे.
संजय देरकर यांनी पुन्हा शिवसेनेला प्रवाहात आणू, असे सांगत आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी विधानसभा मतदार संघामध्ये भगवा सप्ताह च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, यात नव्याने सदस्य नोंदणी याबाबत मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिका विषद केले. त्यानंतर इतरही मान्यवरांनी आपली मते मांडली.

या प्रसंगी जेष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेला वणी विधानसभेत मनासारखे नेतृत्व लाभल्याने जेष्ठ शिवसैनीकांनी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांची कास धरत आगामी विधानसभा निवडणुकीत संजय देरकर यांना साथ देणार असे,अनेकांनी यावेळी मत व्यक्त केली.  
कार्यक्रमात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, निकेश चव्हाण, वसंतराव डुकरे, चंदू हस्तक, रमेश शर्मा, गोवर्धन टोंगे, विलास भट, दिवाकर वनकर, खुशाल शेंडे, मंगेश मत्ते, विलास वांढरे, विनोद बलकी, राजू मोहितकर, रामकृष्ण राजूरकर, अजय चन्ने, श्रीरंग दुरतकर, खंडू वरारकर, शामराव मडावी, दिलीप खंडाळकर, महादेव बावणे, सुभाष भोगेकर, दिनेश भोसकर, बंडू बोथले, नितीन शिरभाते, विठ्ठल घाटे, मारोती नगराळे, सुनील ढुमणे, रामचंद्र वाभिटकर, खंडूभाऊ वरारकर, संकेत मोहिते, अर्जुन निखाडे, सुरेश देशकर, चंदाताई मुन, किर्ती देशकर, प्रमोद मुन, सुमंता उपरे, अनिल राजगडकर, गजानन आसुटकार, मंगेश करंडे, हरिदास केळझरकर यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होती.