सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : तालुक्यापासुन काही मैलाच्या अंतरावर असलेले दोन विघानसभेच्या सीमेवर असलेले ढोकी( वाई ) या गावाला अनेक समस्येंनी ग्रासले आहे .परंतु मागील कित्येक वर्षापासुन अव्हेलना भोगत असलेल्या ढोकी (वाई) गावाला कोणीच वाली नसल्याचे निर्देशनात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असलेल्या जिवनावश्यक सुविधा रस्ते,पणी, विज या गरजांपासुन सुध्दा वंचित राहावे लागत आहे. ढोकी(वाई) गावाला जवळची बाजारपेठ म्हणुन करंजी(रोड) अवघ्या ३ कि.मी. च्या अंतरावर आहे. परंतु या ढोकी ते करंजी या बाजरपेठेला मार्गक्रमण करणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दैनिय झाली असुन जागो-जागी खड्डे पडले आहे. त्यामुळे “रस्त्यामध्ये खड्डे कि खड्डयात रस्ता” हा प्रश्न नागरीकांना पडला आहे.त्यामुळे या रस्त्यांनी ये-जा करणे कठीण झाले आहे. ढोकी गावालत असलेल्या ओढ्यानजिक अनेक तरुण, तरुणी, आबाल-वृध्द, दुचाकीस्वार पडुन अनेक अपघात झाले. आणि अनेकांचे प्राण यामधून बचावले आहे. हिच बाब ध्यानात घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांनी पुढाकार घेत, या ओढ्याजवळ मुरुम टाकण्यासंदर्भात ग्रामपंचायतसोबत पाठपुरावा केला. आणि एका दिवसात मुरुम टाकुन ढोकी (वाई) येथील नागरीकांचा मार्ग सुककर करुन खारीचा वाटा निलेश चौधरी व राऊत यांनी उचलला. त्यामुळे त्यांचे गावकऱ्यांमधुन त्यांच्यावर कौतुकास्पद ठरले आहे. यावेळी युवा ब्रिगेड मंगल राऊत, विशाल बोंडे, राम चिकनकर,कुणाल चौधरी, निखिल चिकनकर, रोशन राऊत, चेतन चिकनकर, प्रफुल ऊईकेसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.