सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : काल मध्यरात्री दिड वाजता च्या दरम्यान, हायवा विना परवाना रेती भरून जात असताना महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला असून ही कारवाई मार्डी-खैरी रोडवरील दापोरा फाट्याजवळ करण्यात आली. मारेगाव तहसीलदार ऍक्शन मोडवर आल्याने रेती तस्करांचे धाबे दनाणले आहे.
मारेगाव तालुक्यातील शेवट च्या टोकाला असलेल्या वर्धा नदी पत्रातून रेती विना परवाना रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, तहसीलदार निलावाड हे आल्यापासून कारवाई चा धडाका कायम ठेवत आजतागायत अनेक रेती तस्करांवर "बुरे दीन" आले आहे.
काल मध्यरात्री दोन वाजता च्या दरम्यान विना परवाना असलेला हायवा वाहन क्र. (एम एच 04 एफ यु 4468) हे रेती भरून जात असताना मारेगावसह वणी पथकाने दापोरा फाट्या जवळ जप्तीची कारवाई करून तहसील कार्यालयाला जमा करण्यात आले.
सदरची कारवाई वणी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, वणी तहसीलदार निखिल धुरधर, मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पार पाडली अशी माहिती आहे.