मारेगाव कोंबडा बाजारावर धाड,दोन आरोपी व तीन हजाराचे मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगावं पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकरखेडा शिवारात (ता. १)  रोजी कोंबडा बाजारावर धाड टाकली असता दोन आरोपी व तीन हजाराचे वर मुदेमाल तसेच दोन जिवंत कोंबडे जप्त करण्यात आले आहे.

शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकरखेडा शेत शिवारात काही लोकांकडून कोंबडयाची झुंज लावून खेळ खेळत असल्याची माहिती ठाणेदार खंडेराव ठाणेदार मारेगांव यांना मिळाली. त्या गोपनिय माहिती च्या आधारे ठाणेदार मारेगांव यांच्या नेतृत्वात टाकरखेडा शेतशिवार पोलीस टीम दाखल होत टाकरखेडा शेत शिवार धाड टाकली असता, खेळातील लोकांनी पोलीसांची चाहुल लागताच काही हौसी पोलीसांना पाहताच पळून गेले. दरम्यान, दाखल पथकाने त्याचा पाठलाग केला असता, घटनास्थळावरुन पोबारा करताना नांव अकुंश चितामंन कन्नाके (48) रा. प्रभाग क्र. 13 मारेगांव व त्याचा मित्र नामे अशोक कोवे रा. मारेगांव असे नमुद आरोपीची अंगडझडती दरम्यान त्याचे जवळ नगदी 1050/- तसेच कोंबड बाजारावर दोन कोंबडे, कात्या प्रत्येकी किंमत अंदाजे 1000 /- चे असा एकुण 2000/- 3050 रु. चा माल मिळुन आला.

सदरची कार्यवाही ठाणेदार जनार्धन खंडेराव मार्गदर्शनात पोहेको आनंद अचलेवार, पोहेको जुनेद, नापोकों. अफजल पठाण, नापोकों रजनीकांत पाटील पोलीस स्टेशन मारेगांव यांनी पार पाडली. 

उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरट्यांनी लांबवली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या  कुंभा, मार्डी बिट मध्ये बॅटरी चोरटे सक्रिय झाले असून पहापळ येथील एका टॅक्टर मालकाच्या उभ्या असलेल्या टॅक्टरची बॅटरीची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

भैय्याजी अंबादास कनाके रा.पहापळ असे बॅटरीची चोरी झालेल्या टॅक्टर मालकाचे नाव आहे. दि.3 डिसेंबर च्या मध्यरात्री 2 वाजता दरम्यान बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या टॅक्टरची बॅटरी लांबवली आहे. घटनेची तक्रार मारेगाव पोलिसात करण्यात आली आहे. सन 13/12/2021 मध्ये भैय्याजी कनाके यांनी ही बॅटरी खरेदी केली होती. मात्र,गॅरंटी पिरेड मध्ये असलेल्या या बॅटरीवर हात साफ करण्यात चोरट्याना यश आले आहे.

यापूर्वी सुध्दा मार्डी तथा परिसरातील टॅक्टर मालकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या टॅक्टरच्या बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या. मात्र, अजूनही बॅटरी चोरटे मारेगाव पोलिसाच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे या चोरट्याची हिम्मत आणखी वाढली असून रविवार च्या पहाटे 2 वाजता किनाके याची बॅटरी लंपास केली आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात शेती पिकाच्या संरक्षणासाठी वापरलेल्या कंपाडच्या झटका बॅटऱ्या चोरूनं नेल्या होत्या. ते चोरटे अजूनही हाती लागलेले नाही. पोलिसांचा वाचक संपल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. भैय्याजी कनाके यांचे शेतातील इंजिन चोरून नेले होते. आता पुन्हा त्यांच्याच बॅटरीवर हात मारल्याने वस्तूच्या पळतीवर अज्ञात व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बॅटरी चोरट्याच्या शोध मारेगाव पोलीस करीत आहे.

बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे झंझावती संपर्क अभियान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे झंझावती संपर्क अभियान सुरु केले आहे. बोर्डा पासून शेगाव जि. प क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्ते, मित्र पक्षातील कार्यकर्ते सह-क्षेत्रातील जनतेसोबत संपर्क अभियान सुरु केले असल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 संपूर्ण बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात तुलसी अलाम यांचे नावाची चर्चा सुरु असल्यामुळे इतर पक्षातील संभाव्य उमेदवाराचे धाबे दणानले आहे. तुलसी अलाम याची उमेदवारी इतर पक्षातील उमेदवारापेक्षा सरस ठरणार असून तुलसी अलाम यांचे संपर्क अभियान जोरात सुरु असल्याने त्यांनी संपूर्ण बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद क्षेत्र पिजून काढत आहे..

ग्रामपंचायत मधील सर्व योजनांची माहिती अशा प्रकारे घरबसल्या पाहा तुमच्या मोबाईलवर!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात योजना दिल्या जातात. परंतु काही ग्रामपंचायतींकडून या योजनांचा प्रचार-प्रसार केला जात नाही. यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात.

पण आता आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये असलेल्या सर्व योजनांची माहिती आणि कोणी या योजनेचा लाभ घेतला आहे ते आपल्या मोबाईल वरुन ऑनलाईन घेऊ शकणार आहात. 

योजनांचा लाभ कोणी घेतला हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा :

◆ गुगलमध्ये MGNREGA असे सर्च करा किंवा डायरेक्ट लिंक – https://nrega.nic.in/HomeGP_new.aspx
◆ सर्च केल्यानंतर Grampanchayat Report वरती क्लिक करा.
◆ तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट पेज ओपन होईल. Data Entry, Generate Reports इतर पर्याय दिसतील त्यामधून Generate Reports हा पर्याय निवडा.
◆ संपूर्ण राज्याची लिस्ट ओपन होईल त्यामधून आपले राज्य निवडा.
◆ Grampanchayat Report Module Log in page ओपन होईल.-
◆ प्रथम ज्या वर्षाची लाभार्थी यादी पाहायची आहे, ते वर्ष / Financial Year निवडा,
◆ आपला जिल्हा, तालुका, गाव / पंचायत निवडा आणि
◆ यानंतर आपल्यासमोर R1 R2 R3 R4 R5 R6 इ. पर्याय दिसतील. वरील पर्यायापैकी तुम्हाला R6 मध्ये Work Register वरती क्लिक करा.
◆ तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी /माहिती पाहायला मिळेल. तसेच कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे हे सुद्धा पाहता येईल


आज वणीत मनसेचा रोजगार महोत्सव

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : सुशिक्षित आणि कुशल युवक- युवतींना उत्तम करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार महोत्सवाचे आयोजन आज रविवार ला करण्यात आले आहे.
विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी मतदारसंघात 18 पेक्षा जास्त कोळसा खानी आहेत, तर त्यावर आधारित अनेक कंपन्या व उद्योग आहेत. तरी सुद्धा अनेक सुशिक्षित युवक रोजगारापासून वंचित आहेत.

मनसे अंतर्गत मागील 2 महिन्यांपासून पक्षाकडून वणी उपविभागीय क्षेत्रात या रोजगार महोत्सवासंदर्भात प्रचार प्रसार करण्यात आला. तसेच अधिकाधिक बेरोजगारांच्या नोंदण्या यामध्ये करण्यात आल्या. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात विविध ठिकाणी मार्गदर्शकाकडून मुलाखत पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. आता या महोत्सवाचा अंतिम टप्पा म्हणून आज रविवार 3 डिसेंबरला वणी येथील एसपीएम हायस्कूलच्या प्रांगणात या अर्जदारांची सहभागी कंपन्यांकडून मुलाखत घेतल्या जाणार आहे. देशातील 70 पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि खासगी क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. सकाळी 8.00 वाजतापासून मुलाखती घेण्यात येणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना येथे प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या रोजगार महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.