मारेगाव कोंबडा बाजारावर धाड,दोन आरोपी व तीन हजाराचे मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगावं पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकरखेडा शिवारात (ता. १)  रोजी कोंबडा बाजारावर धाड टाकली असता दोन आरोपी व तीन हजाराचे वर मुदेमाल तसेच दोन जिवंत कोंबडे जप्त करण्यात आले आहे.

शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकरखेडा शेत शिवारात काही लोकांकडून कोंबडयाची झुंज लावून खेळ खेळत असल्याची माहिती ठाणेदार खंडेराव ठाणेदार मारेगांव यांना मिळाली. त्या गोपनिय माहिती च्या आधारे ठाणेदार मारेगांव यांच्या नेतृत्वात टाकरखेडा शेतशिवार पोलीस टीम दाखल होत टाकरखेडा शेत शिवार धाड टाकली असता, खेळातील लोकांनी पोलीसांची चाहुल लागताच काही हौसी पोलीसांना पाहताच पळून गेले. दरम्यान, दाखल पथकाने त्याचा पाठलाग केला असता, घटनास्थळावरुन पोबारा करताना नांव अकुंश चितामंन कन्नाके (48) रा. प्रभाग क्र. 13 मारेगांव व त्याचा मित्र नामे अशोक कोवे रा. मारेगांव असे नमुद आरोपीची अंगडझडती दरम्यान त्याचे जवळ नगदी 1050/- तसेच कोंबड बाजारावर दोन कोंबडे, कात्या प्रत्येकी किंमत अंदाजे 1000 /- चे असा एकुण 2000/- 3050 रु. चा माल मिळुन आला.

सदरची कार्यवाही ठाणेदार जनार्धन खंडेराव मार्गदर्शनात पोहेको आनंद अचलेवार, पोहेको जुनेद, नापोकों. अफजल पठाण, नापोकों रजनीकांत पाटील पोलीस स्टेशन मारेगांव यांनी पार पाडली. 
Previous Post Next Post