उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरट्यांनी लांबवली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या  कुंभा, मार्डी बिट मध्ये बॅटरी चोरटे सक्रिय झाले असून पहापळ येथील एका टॅक्टर मालकाच्या उभ्या असलेल्या टॅक्टरची बॅटरीची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

भैय्याजी अंबादास कनाके रा.पहापळ असे बॅटरीची चोरी झालेल्या टॅक्टर मालकाचे नाव आहे. दि.3 डिसेंबर च्या मध्यरात्री 2 वाजता दरम्यान बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या टॅक्टरची बॅटरी लांबवली आहे. घटनेची तक्रार मारेगाव पोलिसात करण्यात आली आहे. सन 13/12/2021 मध्ये भैय्याजी कनाके यांनी ही बॅटरी खरेदी केली होती. मात्र,गॅरंटी पिरेड मध्ये असलेल्या या बॅटरीवर हात साफ करण्यात चोरट्याना यश आले आहे.

यापूर्वी सुध्दा मार्डी तथा परिसरातील टॅक्टर मालकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या टॅक्टरच्या बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या. मात्र, अजूनही बॅटरी चोरटे मारेगाव पोलिसाच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे या चोरट्याची हिम्मत आणखी वाढली असून रविवार च्या पहाटे 2 वाजता किनाके याची बॅटरी लंपास केली आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात शेती पिकाच्या संरक्षणासाठी वापरलेल्या कंपाडच्या झटका बॅटऱ्या चोरूनं नेल्या होत्या. ते चोरटे अजूनही हाती लागलेले नाही. पोलिसांचा वाचक संपल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. भैय्याजी कनाके यांचे शेतातील इंजिन चोरून नेले होते. आता पुन्हा त्यांच्याच बॅटरीवर हात मारल्याने वस्तूच्या पळतीवर अज्ञात व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बॅटरी चोरट्याच्या शोध मारेगाव पोलीस करीत आहे.