आज वणी येथे युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई च्या विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन आज दि. ८ मे रोजी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक आ. संजिवरेड्डी बोदकुरवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जी. यु. राजुरकर जि.व्य. शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी नितीशकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, माजी कुलगुरू रा डॉ. भालचंद्र चोपणे हे लाभणार आहे.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सत्र आज सोमवार ला सकाळी ११ ते  दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार असून या शिबिरात
१) जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराची संधी.
२) दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम
३) महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया
४) व्यक्तिमत्व विकास
५) शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती 
देण्यात येणार आहे. तसेच १० वी व १२ वी नंतर विद्यार्थ्यांना करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन शिबीर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी उज्वल भविष्यासाठी सहभाग नोंदवावा. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य संजय तेलतुमडे यांनी माध्यमातून केले आहे.


मारेगाव: युवतीला छेडछाड करणाऱ्या वेगाव येथील तरुणाला केली अटक

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : आज दुपारी मारेगावात एका 22 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी वेगांव येथील एका संशयित तरुणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नुकतेच अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार मैत्रिणीचे लग्न सोहळा आटोपून मारेगावात असलेल्या मैत्रिणीकडे ती युवती पायदळ जात असतांना तो सत्तावीस वर्षीय तरुण मोटारसायकलने मागावून आला. आणि एकदम खालच्या भाषेत शिविगाळ करीत नाही ती मागणी करीत तिची छेड काढू लागला. मात्र, अचानक घडलेल्या प्रसंगाने युवती भांबावून गेली आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. आरोपी मनोज पुंडलीक माहुरे रा.वेगाव (ता. मारेगाव) या छेडकाढूची तक्रार करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला. ही घटना आज दिनांक 7 मे ला दुपारी मारेगावातील शासकीय मुलांच्या वसतिगृहामागे घडली.

महाविद्यालयीन विद्यार्थीनी मारेगाव शहरातील आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला आज ती आली होती. लग्न सोहळा आटोपून दुपारी 3 वाजताचे सुमारास वार्ड क्रमांक 16 मधून मैत्रिणीकडे जात असतांना संशयित आरोपीने तिला थांबवित एकदम खालच्या भाषेत शिविगाळ व छेडछाड करीत नको ती मागणी केली. गोंधळलेल्या युवतीने मारेगाव पोलिस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची तक्रार दाखल करून संशयित आरोपीवर कलम 354 506, 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी आरोपीला शोधण्याकरिता एक पथक नेमून रविवारला रात्री 8.30 वाजता त्याला सीताफिने अटक केली. 

  


भारत राष्ट्र समिती ची बैठक राजुरा विधानसभा क्षेत्रात संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजुरा : तेलंगाना राज्य सरकारने ज्या कल्याणकारी योजना राबवून आपलं राज्य सुजलाम सुफलाम केले. त्याच पार्श्वभूमिवर दलित,आदिवासी व शेतकरी विकाचा मॉडेल महाराष्ट्र मध्ये राबवून येथील जनतेला न्याय मिळावे ह्या उद्देशाने तेलंगाना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब ह्याचे पाऊल महाराष्ट्रात टाकताच मोठ्या संख्येने राज्यातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी हे भारत राष्ट्र समिती वर विश्वास ठेवून गेल्या सहा महिन्यांपासून पक्ष प्रवेशाचा उच्चांक गाठला आहे.
   
महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते नेते पक्ष प्रवेश करून पक्षाला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, एकत्र येऊन आज बैठक घेण्यात आली.
   
त्यात प्रामुख्याने आनंदराव अंगलवार, संतोष कुळमेथे, राकेश चिलकुलवार, बाबाराव मस्की, रेशमा चव्हाण, सुमित्रा कुचनकर, सुन्नी रेड्डी, सुभाष हजारे, आकाश गेडाम, चंद्रपूर जिल्हा समन्वयक वमशीकृष्ण अर्कीला, प्रभू तांडरा, निखिल पोचूला,आतिफ खान, शाहरुख खान, संतोष कुररा, प्रवीण अरेपली, रमेश सुंदिल्ला, विश्वास टक्कल्ला, पवन चिंतल, यांचा समावेश होता.

येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका स्वबळावर पक्ष लढणार आहे, त्यासाठी सदस्य नोंदणी गावागावात जाऊन करणार करू असे सर्वानुमते मंजूर निर्धार या बैठकीत करण्यात आला.

रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा व भद्रावती कृ.उ.बा. समितीच्या नवनिर्वाचित संचालकांची शिवसेना खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांची सदिच्छा भेट


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

 वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील वरोरा व भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक व संचालिका यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत व खा.अनिल देसाई यांची नुकतीच मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
       
याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) गटातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलचे भद्रावती कृउबा समीती नवनिर्वाचीत संचालक मोहन व्यंकटी भुक्या, ताजने भास्कर लटारी, डुकरे ज्ञानेश्वर राजाराम, आगलावे मनोहर शत्रुघ्न, घुगल विनोद बापुराव, जांभूळकर शरद महादेव, तिखट भास्कर लटारी, उताणे गजानन दीनाजी, अश्लेषा शरद जीवतोडे, शांताबाई लटारी रासेकर, ताजने परमेश्वर सदाशिव, शामदेव गणबाजी कापटे तसेच शेतकरी सहकार परीवर्तन आघाडी वरोरा कृउबा समीती नवनिर्वाचीत संचालक देवतळे डाॅ. विजय रामचंद्र, टेमुर्डे जयंत मोरेश्वर, बोरेकर दत्ता बबनराव, भोयर विठ्ठल त्र्यंबकराव, पावडे अभिजीत गिरीधर, टोंगे कल्पना ओकेश्वर, उरकांदे संगिता वासुदेव, देवतळे राजेश वामणराव, झिले विलास शालिक यांनी खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

नवनिर्वाचित संचालकांसह उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, राष्ट्रवादीचे नेते जयंत पा. टेमुर्डे, भद्रावती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, वरोरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष खेमराज कुरेकार, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी संचालक वासुदेव ठाकरे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, राजेश पा. देवतळे, अखील भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रदिप महाकुलकर, सरपंच बंडू नन्नावरे, उपसरपंच मंगेश भोयर, सुबोध तिवारी, डाॅ. नरेन्द्र दाते, वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित वरोरा व भद्रावती कृउबा समितीचे नवनिर्वाचित संचालक व संचालिका, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे खा. संजय राऊत व खा.अनिल देसाई यांनी अभिनंदन केले.

गणेशपूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गणेशपूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पालक प्रविण भाऊ खानझोडे याचे हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालक वानखेडे भाऊ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वीणा पावडे मॅडम, शिक्षिका रेखा पिदूरकर मॅडम, प्रियंका तिरपुडे मॅडम, शिक्षक प्रशांत आवारी सर उपस्थित होते.

शासन आदेशानुसार शैक्षणिक सत्राचा वर्गवार निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रगतीपत्रक पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शैक्षणिक सत्रात पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले.

शैक्षणिक सत्रात उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वीणा पावडे मॅडम यांच्या तर्फे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविधर विषय शिक्षिका प्रतिमा खडतकर मॅडम यांनी केले.