भारत राष्ट्र समिती ची बैठक राजुरा विधानसभा क्षेत्रात संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजुरा : तेलंगाना राज्य सरकारने ज्या कल्याणकारी योजना राबवून आपलं राज्य सुजलाम सुफलाम केले. त्याच पार्श्वभूमिवर दलित,आदिवासी व शेतकरी विकाचा मॉडेल महाराष्ट्र मध्ये राबवून येथील जनतेला न्याय मिळावे ह्या उद्देशाने तेलंगाना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब ह्याचे पाऊल महाराष्ट्रात टाकताच मोठ्या संख्येने राज्यातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी हे भारत राष्ट्र समिती वर विश्वास ठेवून गेल्या सहा महिन्यांपासून पक्ष प्रवेशाचा उच्चांक गाठला आहे.
   
महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते नेते पक्ष प्रवेश करून पक्षाला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, एकत्र येऊन आज बैठक घेण्यात आली.
   
त्यात प्रामुख्याने आनंदराव अंगलवार, संतोष कुळमेथे, राकेश चिलकुलवार, बाबाराव मस्की, रेशमा चव्हाण, सुमित्रा कुचनकर, सुन्नी रेड्डी, सुभाष हजारे, आकाश गेडाम, चंद्रपूर जिल्हा समन्वयक वमशीकृष्ण अर्कीला, प्रभू तांडरा, निखिल पोचूला,आतिफ खान, शाहरुख खान, संतोष कुररा, प्रवीण अरेपली, रमेश सुंदिल्ला, विश्वास टक्कल्ला, पवन चिंतल, यांचा समावेश होता.

येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका स्वबळावर पक्ष लढणार आहे, त्यासाठी सदस्य नोंदणी गावागावात जाऊन करणार करू असे सर्वानुमते मंजूर निर्धार या बैठकीत करण्यात आला.
भारत राष्ट्र समिती ची बैठक राजुरा विधानसभा क्षेत्रात संपन्न भारत राष्ट्र समिती ची बैठक राजुरा विधानसभा क्षेत्रात संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on May 07, 2023 Rating: 5
Powered by Blogger.