सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : आज दुपारी मारेगावात एका 22 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी वेगांव येथील एका संशयित तरुणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नुकतेच अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार मैत्रिणीचे लग्न सोहळा आटोपून मारेगावात असलेल्या मैत्रिणीकडे ती युवती पायदळ जात असतांना तो सत्तावीस वर्षीय तरुण मोटारसायकलने मागावून आला. आणि एकदम खालच्या भाषेत शिविगाळ करीत नाही ती मागणी करीत तिची छेड काढू लागला. मात्र, अचानक घडलेल्या प्रसंगाने युवती भांबावून गेली आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. आरोपी मनोज पुंडलीक माहुरे रा.वेगाव (ता. मारेगाव) या छेडकाढूची तक्रार करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला. ही घटना आज दिनांक 7 मे ला दुपारी मारेगावातील शासकीय मुलांच्या वसतिगृहामागे घडली.
महाविद्यालयीन विद्यार्थीनी मारेगाव शहरातील आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला आज ती आली होती. लग्न सोहळा आटोपून दुपारी 3 वाजताचे सुमारास वार्ड क्रमांक 16 मधून मैत्रिणीकडे जात असतांना संशयित आरोपीने तिला थांबवित एकदम खालच्या भाषेत शिविगाळ व छेडछाड करीत नको ती मागणी केली. गोंधळलेल्या युवतीने मारेगाव पोलिस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची तक्रार दाखल करून संशयित आरोपीवर कलम 354 506, 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी आरोपीला शोधण्याकरिता एक पथक नेमून रविवारला रात्री 8.30 वाजता त्याला सीताफिने अटक केली.
मारेगाव: युवतीला छेडछाड करणाऱ्या वेगाव येथील तरुणाला केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 07, 2023
Rating:
