जाणून घ्या आजचा आपला दिवस, 4 मे गुरुवार 2023


                        राशीभविष्य : ४ मे गुरुवार..!

मेष-
नोकरी निमित्त दुरवरचे प्रवास घडतील. प्रवासातुन लाभ होईल.अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील. संत दर्शन घडेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. ईश्वराची आराधना याकडे कल राहिल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. व्यापार उद्योगात वाढ होईल. परदेश भ्रमणात लाभ होईल. मोठे आर्थिक लाभ होतील.

वृषभ-
आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळून येतील. संततीकडून शुभवार्ता समजतील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात संबंधात स्नेह निर्माण होईल.

मिथुन-
शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. आज दैवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान संभवते. प्रकृती आस्थिर राहणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क-
मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल.नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत. काहीना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धि होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही या विषयी काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून फायदा होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

सिंह-
दिनमान समिश्र फलदायी ठरणारआहे. नोकरीतील वातावरण गैरसमजाचे राहिल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही. याकडे लक्ष द्यावे. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवाया वाढतील. त्यामुळे ताणतणाव वाढण्याचे योग आहेत. शत्रुपक्ष वरचढ होण्याची शक्यता आहे.

कन्या-
आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्यार्थी विद्याभ्यासात प्रगती करतील. संशोधनपर केलेल्या कामास मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

तूळ-
दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरीत बढतीची शक्यता राहिल. राजकिय सामाजिक आपली प्रतिष्ठा ढासळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यावर खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक-
मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गोठाभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहिल. संतती सौख्य उत्तम राहिल. शेअर्स मधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कर्जाची मागणी मंजुर होईल.मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

धनु-
पती पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खुप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याविरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची संभावना आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल. आर्थिक प्रकरणे काळजी पूर्वक हाताळा.

मकर-
विरोधकावर मात करू शकाल. आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल.आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील. मनाजोग्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन सावकाश चालवा. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल.

कुंभ-
बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल.दुर्व्यसनांपासून सावध राहा. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. अधात्मशास्त्राकडे कल राहिल. वैवाहिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पत्नी जोडिदारासोबत सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीन-
आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळावेत. शक्यतो दुरवरचे प्रवास नुकसानकारक ठरणार आहेत. प्रवास टाळावेत.


एस.पी.एम विद्यालय येथील बाल संस्कार शिबिराचा समारोप

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : एस. पी एम विद्यालय येथील दि.26 एप्रिल ते दि 3 मे 2023 पर्यंत आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराचा आज समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापकांनी व उपमुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचे महत्त्व सांगून बालकाचा शारीरिक बौद्धिक व मानसिक विकास कसा होतो तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात शिबिरातून शिकलेल्या गोष्टीचे व मूल्यांचा कशाप्रकारे अंगीकार करावा हे पटवून सांगितले यानंतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या शिबिराबद्दलचे अनुभव सांगितले, यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला व शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

केंद्र नेरड अंतर्गत विद्यार्थ्यांना भेट वस्तू सन्मानपूर्वक प्रदान करून गौरविण्यात येणार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : केंद्र नेरड अंतर्गत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक,पालक यांचे उपस्थितित आपण जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे.या दृष्टिकोनातून सदैव प्रयत्नशिल असतो. शाळापूर्व तयारी मेळावे आयोजित करून आपण दाखल विद्यार्थ्यांना सन्मानित करून दाखल सुद्धा केले आहेत. 
याच प्रमाणे या जि.प.शाळांमधून इयत्ता १ ली पासून आजपर्यंत त्याच शाळेतून इयत्ता ४/ ५/ ७/८ पर्यंत शिक्षण पूर्ण करून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना या शैक्षणिक प्रवाहात पहिलेच पदार्पण करणाऱ्या वयापासून गुंतलेल्या असतात. 
         
त्याच प्रमाणे आपल्या शाळेतच पूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडणारे हे विद्यार्थी आपले दैवत, कृपावंतच आहेत. 
याच भावनेतून या विद्यार्थ्यांचा निरोप फुल ना फुलाची पाकळी भेट देऊन सत्कार करण्यात यावा म्हणून केंद्र नेरड चे केंद्रप्रमुख श्री राजेश खुसपूरे सर यांनी संकल्पना ठेवून ती पूर्ण करण्याकरीता भेट वस्तू केंद्रांतर्गत जि.प.शाळांमधे पोहोचत्या केलेल्या आहेत.
याकरीता श्री नवनाथ देवतळे सर यांचेही सहकार्य लाभले आहेत. आणि या केंद्रातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व पालक वर्गांचे, शाळा व्यवस्थापन समीती यांचे सहकार्यातून व उपस्थितित दि. ६ मे २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना भेट वस्तू सन्मानपूर्वक प्रदान करून गौरविण्यात येऊन निरोप दिला जाणार आहे.

जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा कृष्णानपूर तर्फे नेरड केंद्रातील बदली झालेल्या शिक्षकांचा सहृदय निरोप समारंभ

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : उत्साहाच्या मनभावन रंगांनी, ग्रिष्माच्या सौंदर्याने निरोपाचे भावूक क्षण घेऊन सेवानिवृत्त,बदली झालेले तथा प्रतिनियु्कती असलेल्या शिक्षकांना जि. प.शाळा कृष्णांनपुर तर्फे निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष.श्री संजय झाडे प्रमुख अतिथी श्री. राजेश खुसपूरे सर -केंद्रप्रमुख केंद्र नेरड श्री. निखाडे सर, श्री. मनोहर ठमके सर -मुख्याध्यापक कृष्णांनपुर  सत्कारमूर्ती- श्री नवनाथ देवतळे सर माजी केंद्रप्रमुख व गशिअ, श्री.मधुकर खारकर सर यांना सेवानिवृत्ती पर भेटवस्तू तथा श्रीफळ देऊन सत्कार व निरोप देण्यात आला.
तसेच नेरड केंद्रातून बदली झालेले श्री. खोराटे सर, श्री.विनोद खारकर सर, श्री,किनाके सर, श्री.जांभूळकर सर,अनिल मडावी सर,अश्विनी गोहाकर,सरिता पिंपळकर, ठाकरे मॅडम, तसेच प्रतिनियुक्तीवर केंद्रातील शाळेवर सेवा देणारे श्री. बोरकर सर, श्री.बोबडे सर, सौ.प्रीती पोटे मॅडम,यांना भेटवस्तू तथा श्रीफळ. मा.श्री मनोहरजी ठमके सर, (मुख्याध्यापक कृष्णांनपुर) यांच्या तर्फे सर्वांना भेटवस्तू देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन रुपाली मोवाडे मॅडम यांनी प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.राजेश खुसपुरे सर यांनी व आभार प्रदर्शन श्री.प्रदिप पवार सर यांनी केले.

कार्यक्रमाला नेरड केंद्रातील सर्व शिक्षक,उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रमुख्याद्यापक,तथा कृष्णांनपुर येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
 जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा कृष्णानपूर चे वतीने पंचपक्वान्न युक्त सुग्रास सहभोजनाने व सुंदर नियोजनबद्ध व औदार्यपूर्ण अशा अविस्मरणीय अकार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १२ ठिकाणी सुरु; मोफत उपचार व तपासणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन रहावे लागते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशाच नागरिकांसाठी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरु राहाणार असून कामगार, मजूर अशांसाठी हा दवाखाना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे काल कामगार दिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन भोसा येथे करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, उपवनसंरक्षक श्री धनंजय , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड उपस्थित होते.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यांची कामावर जाण्याची वेळ सकाळची असल्यामुळे या लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत आपला दवाखान्याचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले. त्याचवेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला दवाखाना सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर आज आपला दवाखाना जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आज त्याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद झाल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण ३७ दवाखाने उघडणार असून पैकी बारा आज सुरू झालेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा सुविधा आणि औषधे मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना आरोग्य विभागाने प्रत्यक्षात पुढे न्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गरीब लोकांना साध्या बाह्य रुग्ण सेवेसाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते. तिथे तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नसते तरीही त्याचा आर्थिक भार शहरी भागातील गरीब लोकांना बसतो. आपला दावाखान्याच्या माध्यमातून ही व्यवस्था आता बदलता येईल. लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणीच आपला दवाखाना सुरू होणार आहे. त्यामुळे गरीब लोकांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्यासाठी होणारा खर्च आपल्याला आपल्या उत्तम आणि चांगले सेवेच्या माध्यमातून टाळता येईल. आपली सेवा चांगली राहील याचा आपण कसोशीने प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

सुरुवातीलाच योग्य निदान व उपचार मिळाल्यास अनेक आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापासून वाचू शकतात. आपल्याकडे आरोग्य क्षेत्रातील या मिसिंग लिंक आपला दवाखानाच्या माध्यमातून दूर होतील अशी आशा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केली. महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्या देशात मोठे आहे आणि यामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. जर ह्या कर्करोगाचे प्रारंभीच योग्य निदान होऊन उपचार मिळाले तर कर्करोग गंभीर स्वरूप घेण्यापासून टाळता येऊ शकतो. त्यामुळे ह्या मिसिंग लिंक या दवाखान्यामुळे पूर्ण होतील. तसेच कामगारांना आपला दवाखाना उपयुक्त राहील. सर्व सेवा सुविधा या दवाखान्यात नि:शुल्क आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तन्वीर शेख, डॉ. प्रीति दुधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतिकुमार नावंदीकर,डॉ. संजना लाल वैद्यकीय अधिकारी, डॉ.नाझिया काझी वैद्यकीय अधिकारी, लव जेठवा, डॉ. प्रमोद लोणारे, व नागरी आरोग्य केंद्र 1,2,3, येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत पांटील यांनी केले.

काय असणार आपला दवाखान्यात

बाह्य रुग्ण सेवा, मोफत उपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चसािवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण इत्यादी.

गरजेनुसार ७ तज्ञ सेवा

फिजिशियन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ.

उपलब्ध अधिकारी/ कर्मचारी

वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी आणि मदतनीस एवढे केंद्रात सेवा देण्यासाठी नियुक्त राहतील.