जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा कृष्णानपूर तर्फे नेरड केंद्रातील बदली झालेल्या शिक्षकांचा सहृदय निरोप समारंभ
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : उत्साहाच्या मनभावन रंगांनी, ग्रिष्माच्या सौंदर्याने निरोपाचे भावूक क्षण घेऊन सेवानिवृत्त,बदली झालेले तथा प्रतिनियु्कती असलेल्या शिक्षकांना जि. प.शाळा कृष्णांनपुर तर्फे निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष.श्री संजय झाडे प्रमुख अतिथी श्री. राजेश खुसपूरे सर -केंद्रप्रमुख केंद्र नेरड श्री. निखाडे सर, श्री. मनोहर ठमके सर -मुख्याध्यापक कृष्णांनपुर सत्कारमूर्ती- श्री नवनाथ देवतळे सर माजी केंद्रप्रमुख व गशिअ, श्री.मधुकर खारकर सर यांना सेवानिवृत्ती पर भेटवस्तू तथा श्रीफळ देऊन सत्कार व निरोप देण्यात आला.
तसेच नेरड केंद्रातून बदली झालेले श्री. खोराटे सर, श्री.विनोद खारकर सर, श्री,किनाके सर, श्री.जांभूळकर सर,अनिल मडावी सर,अश्विनी गोहाकर,सरिता पिंपळकर, ठाकरे मॅडम, तसेच प्रतिनियुक्तीवर केंद्रातील शाळेवर सेवा देणारे श्री. बोरकर सर, श्री.बोबडे सर, सौ.प्रीती पोटे मॅडम,यांना भेटवस्तू तथा श्रीफळ. मा.श्री मनोहरजी ठमके सर, (मुख्याध्यापक कृष्णांनपुर) यांच्या तर्फे सर्वांना भेटवस्तू देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन रुपाली मोवाडे मॅडम यांनी प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.राजेश खुसपुरे सर यांनी व आभार प्रदर्शन श्री.प्रदिप पवार सर यांनी केले.
कार्यक्रमाला नेरड केंद्रातील सर्व शिक्षक,उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रमुख्याद्यापक,तथा कृष्णांनपुर येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा कृष्णानपूर चे वतीने पंचपक्वान्न युक्त सुग्रास सहभोजनाने व सुंदर नियोजनबद्ध व औदार्यपूर्ण अशा अविस्मरणीय अकार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जि.प.वरीष्ठ प्राथमिक शाळा कृष्णानपूर तर्फे नेरड केंद्रातील बदली झालेल्या शिक्षकांचा सहृदय निरोप समारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 03, 2023
Rating:
