जाणून घ्या आजचे रशिभाविष्य : 1 मार्च बुधवार

                   
                   राशीभविष्य : १ मार्च बुधवार..!

मेष
व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्याचे कौतुक हाईल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ
राजकीय क्षेत्रात यश येईल. पदप्राप्ती सन्मान वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. राजकीय कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. जोडीदारांकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. मन प्रसन्न राहील.

मिथुन
नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लागणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. कर्ज घेणे देणे टाळा. कायदेशीर बाबीत कठीण पेचप्रसंगात गुंतले जाल. आर्थिक नुकसान संभवते.

कर्क:
पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. लाभदायक दिवस आहे. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. लेखक साहित्य संपादन या क्षेत्रातील व्यक्तींना मानधनात वाढ होऊन आर्थिक लाभ होतील. विद्यार्थी वर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. व्यापारात जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्याकडून सहकार्य लाभेल. सामाजिक स्तरावरील परीवर्तन आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत चिंतीत रहाल.

सिंह:
कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत यश आधिक मिळेल. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन योजना प्रकल्प यांचा विस्तार वाढ होईल. कायदेशीर बाबीची प्रक्रिया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

कन्या
राजकीय कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. आळस दुर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेशभ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल. आरोग्यही उत्तम राहील.

तूळ:
मनाची उद्विग्नता वाढेल. आपण केलेल्या कार्याचा परतावा मिळणे कठीण जाईल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. नुकसानकारक योग आहेत. राग आणि उत्तेजित पणा वाढेल. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रिया अपघात भय संभवते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. मानसिकदृष्या कलेशदायक दिनमान आहे. आहारावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक:
धार्मिक प्रवृत्तीत वाढ होईल. मानअपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेमप्रकरणात कुटुंबातील विरोधाला सामोरे जावे लागेल. लेखन, कला, कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. महत्वाची कागदोपत्रे मात्र सांभाळा. गहाळ होण्याची शक्यता आहे. सुख चैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.

धनु
वारसा हक्क पेन्शन विमा या कामात यश येईल. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात वातावरण असंतोषजनक राहील. गुप्तशत्रुकडून कारवाया घडतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. मानसिक, शारिरिक थकवा जाणवेल. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. शक्यतो प्रवास टाळा. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होइल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.

मकर
रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार कारखानदार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. कला तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. अनुकुल फळ प्राप्त होईल.

कुंभ:
व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अचानक धनलाभ होईल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारीवर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. सकारात्मक परिणाम जाणवतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. भातृसौख्य उत्तम लाभेल. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. परमेश्वरा विषयी श्रद्धा वाढेल. तिर्थक्षेत्री प्रवास होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन
नोकरी रोजगारातील बदल प्रतिकुल ठरतील. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संधी मिळेल. आरोग्य प्रकृती स्थिर व उत्साहपूर्ण राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळावर प्रवास घडेल. भाऊ बहिणीकडून शुभसंदेश ऐकायला मिळतील. आज व्यापार वाढीच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस आहे. व्यवहार कुशलते मुळे आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व्यक्तींच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेशरावर विश्वास दृढ होईल. प्रकृति स्थिर व उत्साह पूर्ण राहणार आहे.

फेब्रुवारी एंडिंग'ला भीषण अपघात; 2 ठार तर 1 गंभीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला 27 आणि आज मंगळवार 28 रोजी भीषण अपघाताची नोंद झाली. काल 27 रोजी नायगाव जवळ उभ्या असलेल्या ट्रक ला दुचाकीस्वार धडकला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर, ही घटना ताजी असतांना आज 28 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर हायवे वरील सावर्ला जवळ कार आणि दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला. यात दोघे ठार तर एक गंभीर जखमी आहे. 

आकाश गाऊत्रे (28) रा.रंगारी पुरा व अमोल मडावी (29) रा जैताई नगर अशी या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर रानु तुमराम (27) रा भीम नगर, हा युवक गंभीर जखमी असून त्याचा उजवा पाय फॅक्चर झाला असल्याचे समजते. हे तीनही युवक वणी शहरातील रहिवासी आहे.

वरोरा येथून हे तिघेही काम आटोपून युवक दुचाकीने वणीकडे निघाले, वणी कडे परत येत असताना सावर्ला-नायगाव जवळ त्याच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार व दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर, एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. व एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनासथळाकडे धाव घेत जखमींना उपचारासाठी रवाना केले. तर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविला. मात्र,कार चालक व मालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. फेब्रुवारी आरंभ झाला आणि गेल्या काही दिवसापासून अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत असून फेब्रुवारी एंडिंग भीषण अपघाताने नोंद झाली.

सदरील घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे राज्‍यस्‍तरीय अधिवेशन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वन खात्‍याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्‍यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्‍यास मदत होते, असे प्रतिपादन वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

फॉरेस्‍ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्‍ट्र द्वारे आयोजित राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात बोलताना श्री.मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला फॉरेस्‍ट रेंजर असोसिएशनचे महाराष्‍ट्र अध्‍यक्ष कांतेश्‍वर बोलके, अरुण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस नीलेश गावंडे, नागपूरचे मुख्‍य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनोद देशमुख, संस्‍थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते.
श्री.मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक आर.एफ.ओ. कडे वन विभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभिर्याने प्रत्‍येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे. फॉरेस्‍ट सर्व्‍हे ऑफ इंडिया यांच्‍या एका अहवालानुसार महाराष्‍ट्राचे हरित क्षेत्र 2550 स्‍वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोजचे क्षेत्र सुद्धा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्‍या गोष्‍टी चांगल्‍या होत आहेत. त्‍यामध्‍ये तुमचा तसेच वनविभागाच्‍या सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्‍या काही वर्षात विदर्भात वाघांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. त्‍यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुद्धा तुम्‍ही सर्वजण उत्‍तम पद्धतीने करता ही आनंदाची गोष्‍ट आहे. वनविभागाच्‍या संवर्धनामध्‍ये तुमच्‍यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्‍ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावा, असे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले. या कार्यक्रमात आपण अनेक विषय मांडले आहेत. यात बऱ्याच मागण्‍या सुद्धा आहेत, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.

प्रास्‍ताविकात असोसिएशनचे सरचिटणीस श्री. गावंडे यांनी आर.एफ.ओ. चे विविध अधिकार व समस्‍यांवर सादरीकरण केले.

विदर्भ निर्माण यात्रेच्या समारोपाला वणी उपविभागातील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रु ते 5 मार्च 2023 पर्यँत पूर्व विदर्भातून कालेश्वर सिरोंचा गडचिरोली ते नागपूर व पश्चिम विदर्भातून सिंदखेडराजा जिजाऊ माहेरघर बुलढाणा ते नागपूर या दोन्ही यात्रा निघालेल्या असुन त्या नागपुरच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. विदर्भातील ११ जिल्हे व ७० पेक्षा ज्यास्त तालुके आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा व भेटीच्या माध्यमातून विदर्भ निर्माणा बाबत जनजागरण होत आहे. या यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत होत असुन लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
विदर्भातील विविध समस्या जसे शेतकरी आत्महत्या, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, बेरोजगारी, सिंचन,व इतर क्षेत्रातील अनुशेष, कुपोषण,प्रदुर्षण,व इतरही समस्येचे एकमेव उत्तर म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य ! विदर्भचे स्वतंत्र राज्य निर्माणा शिवाय या समस्येची सोडवणूक नाही.
म्हणुनच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची गरज करीत या दोन्ही यात्रेचा समारोप 5 मार्च 2023 ला नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे.पुढील तिव्र आंदोलनाची दिशा याच ठिकाणी जाहीर होणार आहे.
वणी,मारेगाव,झरी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विदर्भ प्रेमी जनतेनी व कार्यकर्त्यांनी या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील, विदर्भ प्रदेश युवक सचिव राहुल खारकर प्रा. बाळासाहेब राजूरकर, रफिक रंगरेज,देवराव धांडे,जिल्हा संघटक राजु पिंपळकर,शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर, तालुका अध्यक्ष नामदेव जेणेकर, दशरथ बोबडे,होमदेव कनाके,देवा बोबडे,अमित उपाध्ये, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई आगबत्तलवार, सुरेखा वडीचार, कलावती शिरसागर, अलका मोवाडे, धीरज भोयर, पुंडलिक पथाडे, मुक्तानंद भोंगळे, राकेश वराटे,संदीप गोहोकार, राहुल झट्टे, यांनी केले आहे.

गजानन कासावार यांची अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील उच्च श्रेणी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन तुकाराम कासावार यांची अमरावती विद्यापीठावर मा. राज्यपालांनी सिनेट सदस्य म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
    गजानन कासावार हे विद्यार्थी जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते एक उत्कृष्ठ अध्यापक म्हणून ओळखले जातात. ते विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनामध्ये सक्रिय सहभागी आहेत. सावित्रीबाई फुले दत्तक पालक समितीच्या माध्यमातून सन 2001 पासून आर्थिक दृष्टीने मागास 300 ते 325 मुलींना शैक्षणिक दृष्ट्या समाज सहभागातून दत्तक घेऊन दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे पालकांच्या हस्ते वाटप करीत असतात. ते विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक उपाध्यक्ष आहेत. भारतीय शिक्षण मंडळात विदर्भ प्रांताचे प्रकाशन सह प्रमुख आहेत. विदर्भ नगर परिषद शिक्षक संघटनेचे ते केंद्रीय कार्याध्यक्ष आहेत. येथील नगर वाचनालायत सचिव या नात्याने मागील 15 वर्षांपासून विविध उपक्रम राबवित असतात. 2001 मध्ये त्यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ते विविध वृत्तपत्रातून लिखाण करीत असतात. वणी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनानिमित्त निघालेली स्मरणिकेचे त्यांनी संपादन केले आहे. 
      त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.