घोंसा येथे तालुका स्तरीय खेळ व कला महोत्सव

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती, वणी चे विद्यमाने व समस्त ग्रामवासी घोन्सा यांचे सहकार्याने तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव कार्यक्रम आज दि.३ जानेवारी २०२३ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोन्सा येथे आयोजित केला आहे.

या चार दिवशीय होणाऱ्या मैदानी कला महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

5 जानेवारी ला सुषमा अंधारेंचा चंद्रपूरात व्याख्यान...

सह्याद्री चौफेर  | उमेश गोलेपल्लीवार

चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मां फातिमा शेख, राजमाता जिजाऊ जयंती प्रीत्यर्थ स्मृतिशेष माणिक उर्फ महाकाली जंगम जन्मदिन व माता प्रमिला माणिक जंगम स्मरणार्थ पारंपारिक तेरवी व तत्सम कार्यक्रमांना छेद देत जीवनाबद्दल वास्तववादी व सकारात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने सामाजिक प्रबोधन, व्याख्यान व सन्मान पुरस्कार समारोह गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023, सायंकाळी 5.00 वाजता चंद्रपूर येथिल प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून प्रसिद्ध प्रखर वक्ता व पुरोगामी विचारवंत तथा शिवसेना उपनेता (ठाकरे गट) सुषमा अंधारे ह्या उपस्थित राहणार आहेत. ‘महापुरुषांच्या स्वप्नातील भारत : संवैधानिक मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर त्या मार्गदर्शन करतील.

या प्रबोधन कार्यक्रमात वक्ता म्हणून प्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंके हे देखिल मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. पी. लॉ कॉलेज, चंद्रपूर चे माजी प्राचार्य डॉ. ए. पी. पिल्लई राहतील. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विजय वडेट्‌टीवार, आमदार, ब्रम्हपुरी, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, संदिप गिर्हे, जिल्हा प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट), राजीव कक्कड़, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस, रितेश तिवारी, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, भूषण फुसे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मनदिप रोडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, अजहर शेख, शहर अध्यक्ष, एआईएमआईएम, सुरज ठाकरे, जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, पप्पू देशमुख, संस्थापक अध्यक्ष, जनविकास सेना, राजू झोडे, जिल्हाध्यक्ष, उलगुलान संघटना, डॉ. सचिन भेदे, प्रसिद्ध मनोचिकित्सक, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रसिद्ध नेत्रतज्ञ, रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ता उपस्थित राहणार आहेत. 
या समारोहात सत्कार भूषण म्हणून समाजात उल्लेखनिय कार्य करणार्यांचा सत्कार व सन्मान करण्यात येईल. पत्रकारितेसाठी प्रमोद काकडे, कला क्षेत्रात शैलेश दुपारे, साहित्य क्षेत्रात प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर, सामाजिक क्षेत्रात डॉ. राकेश गावतुरे व डॉ. अभिलाषा बेहरे दंपतीचा सन्मान केल्या जाईल. आयोजक म्हणून शहरातील 32 संघठनांचा या आयोजनात सहभाग असणार आहे. ही माहिती आयोजकां तर्फे कबीरा इन्वेस्टिगेशन एंड रिसर्च प्रा. लि. ने दिली आहे.

हिरापूर ग्रामपंचायतीने केले पाणी समस्येबाबत चर्चेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील हिरापूर,केशरवाही, राजोली, चक.न.१, राजोली फाल, बोथली, चकपिरंजी, मालपिरंजी, चिंचबोडी या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवल्या जाते मात्र गेल्या अनेक दिवसापासून नागरिकाना पिण्याचे पाणी पुरेश्या प्रमाणात मिळत नव्हते. गावागावातील सदर प्रश्नानंमुळे नागरिकामध्ये प्रचंड असंतोष होता त्यामुळे हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीती गोहणे यांनी वरील गावातील लोकप्रतिनिधींची बैठक ग्रामपंचायत कार्यालय हिरापूर येथे बोलवली व चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले.
          याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजने अंतर्गत राजोली चक.१ येथे पाण्याची मुख्य टाकी आहे.सदर पाण्याच्या टाकीला बेळगाव नदी घाटावरून पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र बऱ्याच ठिकाणी लिकेज गळती होती.त्यामुळे हिरापूर येथील मुख्य टाकीवर पाणी येत नव्हते.त्यामुळे नागरिकांना पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते.सदर बाब ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य अभियंता कुणाल येनगंदेवार यांच्या लक्षात हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीती गोहने यांनी आणून दिली.त्यासोबतच या कामावरील ठेकेदार मिलिंद राऊत व राकेश पराडकर यांना सुद्धा सदर बाब लक्ष्यात आणून दिली. दरम्यान केवळ चर्चकरून मार्ग निघणार नाही हे लक्ष्यात आल्यावरून उपस्थित लोकप्रतिनिधींनी कुठे कुठे लिकेज ( गळती) आहे. याची प्रत्त्यक्ष बेलगाव घाटपर्यंत पैदल फिरून पाहणी केली. यावेळी ग्रामीण पूर पाणी पुरवठा विभाग सिंदेवाही येथील अभियंता कुणाल येनगंदेवार यांनी ठेकेदार मिलिंद राऊत व राकेश पराडकर यांना त्वरित ज्या ज्या ठिकाणी गळती होते. त्या सर्व ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी याचे आदेश दिलेत. दरम्यान या क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नवीन पाईक लाईनसाठी ७.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सदर कामाचे टेंडर विलास सोनटक्के यांना झाले असल्याने समजते. सदर गळतीचे काम त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चर्चेकरिता हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीती गोहने, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, चकपिरंजी येथील सरपंच उषा गेडाम, केशरवाही येथील वामन भोपये, बोथलि ग्राम.प चे सदस्य नरेश गड्डमवार व अमोल मुप्पावार, ग्रा.प सदस्य अरविंद भैसारे, नानाजी तावाडे भीमनगर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंदेवाही तालुका अभियंता कुणाल येनगंदेवार, ठेकेदार मिलिंद राऊत, व राकेश गड्डमवार व पाणी पुरवठा कर्मचारी मोतीराम कपाटे, दिलीप भोपये, हिवराज बोलसरे, सोमेश्वर मडावी, राजू बोलसरे, वैभव झरकर उपस्थित होते.

अपंग,गरजुंना ब्लॅंकेट वाटप करुन साजरा केला अभिष्टचिंतन सोहळा


 सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : आज 1 जानेवारी  2023 ला आयु केशवराव व्येकुजी लाटेलवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांकडून अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शोभाताई फडणवीस माजी कॅबिनेट मंत्री उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राजाबाळ पाटील संगीडवार, सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली. प्रा. डॉ इसादास भडके साहित्यिक, प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड साहित्यिक, प्रल्हाद कावळे सर, विश्वशांती विद्यालय सावलीचे माजी सेवा निवृत्त शिक्षक, ए. आर. दुधे सर रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे माजी प्राचार्य, सावली शहराच्या नगराध्यक्ष लताताई लाकडे, के. एन. बोरकर सर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, राजुरा शहरातून आलेले बराच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. लाटेलवार परिवाराचे बरेचशे नातेवाईक आणि पूर्ण लाटेलवार परिवार उपस्थित होता.

अपंग आणि गरजू व्यक्तींना ब्लॉकेटचे वितरण करण्यात आले. सावली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या विचारसरनीवर चालणारा एक आदर्श परिवार आहे असा उल्लेख नगराध्यक्ष लताताई लाकडे यांनी केला, प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड सरांनी लाटेलवार परिवारातील तीन मुलांनी आपल्या वडिलाचा 80 वा वाढदिवस साजरा समाजासमोर एक नवीन पायंडा घालून दिला असे म्हणाले. केशवराव लाटेलवार यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत तीनही मुलांना शिकवून तीनही आज चांगल्या स्टेटस मध्ये याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आपल्या मुलाचा आणि स्वताचा वाढदिवस साजरे करणारे या जगात अनेक लोक आहेत परंतु आपल्या म्हाताऱ्या वडिलाचा वाढदिवस साजरे फार दुर्मिळ आहेत असा उल्लेख प्रा. डॉ इसादास भडके यांनी केला. या कार्यक्रमाची सुरवात प्रस्ताविकेनी प्रा. डॉ संजय केशवराव लाटेलवार यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ अरुण लाडे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन रुपचंद लाटेलवार यांनी केले.

यावेळी, अविनाश पाल, सतीश बोम्मावार, लोकमत दुधे , अशोक आकुलवार, बाबा मेश्राम,सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

युवतीची गळफास घेवून आत्महत्या; हिवरा (मजरा) येथील घटना

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर 

मारेगाव : तालुक्यातील हिवरा (मजरा) येथील एका युवतीने गळाफास घेतल्याची घटना आज सोमवारी तीन वाजता उघडकीस आली.

तालुक्यातील जुनिअर कॉलेजला बारावी इयत्ता मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींने आपल्या शेतात गळाफस घेवून जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली. कु. प्रांजली राजू बोढे (18) असे गळाफस घेतलेल्या युवतीचे नाव आहे.

प्रांजली च्या पश्चात आई वडील एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे.

वृत्त लिहिपर्यत पंचनामा चालू असल्याची माहिती मिळाली... तूर्तास घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.