हिरापूर ग्रामपंचायतीने केले पाणी समस्येबाबत चर्चेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

सावली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील हिरापूर,केशरवाही, राजोली, चक.न.१, राजोली फाल, बोथली, चकपिरंजी, मालपिरंजी, चिंचबोडी या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवल्या जाते मात्र गेल्या अनेक दिवसापासून नागरिकाना पिण्याचे पाणी पुरेश्या प्रमाणात मिळत नव्हते. गावागावातील सदर प्रश्नानंमुळे नागरिकामध्ये प्रचंड असंतोष होता त्यामुळे हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीती गोहणे यांनी वरील गावातील लोकप्रतिनिधींची बैठक ग्रामपंचायत कार्यालय हिरापूर येथे बोलवली व चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले.
          याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजने अंतर्गत राजोली चक.१ येथे पाण्याची मुख्य टाकी आहे.सदर पाण्याच्या टाकीला बेळगाव नदी घाटावरून पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र बऱ्याच ठिकाणी लिकेज गळती होती.त्यामुळे हिरापूर येथील मुख्य टाकीवर पाणी येत नव्हते.त्यामुळे नागरिकांना पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते.सदर बाब ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य अभियंता कुणाल येनगंदेवार यांच्या लक्षात हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीती गोहने यांनी आणून दिली.त्यासोबतच या कामावरील ठेकेदार मिलिंद राऊत व राकेश पराडकर यांना सुद्धा सदर बाब लक्ष्यात आणून दिली. दरम्यान केवळ चर्चकरून मार्ग निघणार नाही हे लक्ष्यात आल्यावरून उपस्थित लोकप्रतिनिधींनी कुठे कुठे लिकेज ( गळती) आहे. याची प्रत्त्यक्ष बेलगाव घाटपर्यंत पैदल फिरून पाहणी केली. यावेळी ग्रामीण पूर पाणी पुरवठा विभाग सिंदेवाही येथील अभियंता कुणाल येनगंदेवार यांनी ठेकेदार मिलिंद राऊत व राकेश पराडकर यांना त्वरित ज्या ज्या ठिकाणी गळती होते. त्या सर्व ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी याचे आदेश दिलेत. दरम्यान या क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नवीन पाईक लाईनसाठी ७.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सदर कामाचे टेंडर विलास सोनटक्के यांना झाले असल्याने समजते. सदर गळतीचे काम त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चर्चेकरिता हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीती गोहने, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, चकपिरंजी येथील सरपंच उषा गेडाम, केशरवाही येथील वामन भोपये, बोथलि ग्राम.प चे सदस्य नरेश गड्डमवार व अमोल मुप्पावार, ग्रा.प सदस्य अरविंद भैसारे, नानाजी तावाडे भीमनगर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंदेवाही तालुका अभियंता कुणाल येनगंदेवार, ठेकेदार मिलिंद राऊत, व राकेश गड्डमवार व पाणी पुरवठा कर्मचारी मोतीराम कपाटे, दिलीप भोपये, हिवराज बोलसरे, सोमेश्वर मडावी, राजू बोलसरे, वैभव झरकर उपस्थित होते.