जीवेम शरद: शतम् :- रविकिरण घुमे


                   जीवेम शरद: शतम् 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुम्हाला लाभो
जन्मदिवसाच्या तुम्हाला अगणित खूप खूप शुभेच्छा 

या प्रगटदिनी वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर परिवार

तलावात बुडून मच्छीमाराचा मृत्यू ....सावली तालुक्यातील केरोडा येथील घटना

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील केरोडा येथील तलावात मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराचा तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना (दि १) रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव बापूजी राऊत (६४) असे मृतकाचे नाव असून.
सदर मृतक हे मच्छीमार करण्याकरिता केरोडा येथील तलावावर आपल्या संस्थेच्या सभासद यांच्या सोबत गेले होते.मच्छीमार सुरू असतांना तलावातील मोठ्या खड्यात त्यांच्या तोल गेल्याने ते खड्यात पडले.सोबत असणाऱ्या साथिदाराने वाचविण्यासाठी प्रयत्न केले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने वाचविण्यास अपयश आले.मृतकाच्या पश्चात पत्नी दोन मुले व मुलगी असा आप्त परिवार आहे सदर घटनेची माहिती सावली पोलिस स्टेशन चे निरीक्षक यांना मिळताच आपल्या चमु सह घटना स्थळ गाठून पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविण्यात आले व पुढील तपास सावलीचे पोलिस स्टेशन चे निरीक्षक व त्यांची चम्मु करीत आहेत.

पदवीधर मतदारसंघामध्ये नाव समाविष्ट करणे झाले एकदम सोप्पे तेही घरबसल्या मोबाईलवरून

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : येत्या काही दिवसात अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे.
ग्रामीण व शहरी भागामधील सर्व क्षेत्रातील पदवीधरांना नोकरी विषयक, उद्योग विषयक, शेती विषयक, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्याकरीता व सर्व पदवीधरांना दैनंदिन जिवनामध्ये येणाऱ्या समस्यांना न्याय देण्याकरीता पदवीधरांच्या सशक्तीकरणाकरिता संघठीत होणे गरजेचे आहे. त्याकरीता सर्व पदवीधरांना आव्हान करण्यात येते की, पदवीधर नोंदणीवर क्लीक करुन नोंदणी करावे.
आता शासनाची अधिकृत संकेत स्थळ उपलब्ध झाले आहे. या https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/Graduate2023.aspx संकेत स्थळावर विभागातील पदवीधरांनी आपलं नाव नोंद करून घ्यावे. काही अडचण आल्यास मी स्वतः धनंजय आसुटकर पदवीधर या नात्याने संपर्क साधावा..असे आवाहन धनंजय आसुटकर यांनी केले.

आपण पदवीधर आहात अर्थात बुद्धिजीवी वर्गात आपण मोडतो. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाहीचा सन्मान म्हणून आपण आपली पदवीधर मतदार नोंदणी करूया, एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूया असंही ते म्हणाले.
टीप - सदर मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१९ अगोदर पदवीधर असणे महत्वाचे आहे. पदवीधर मतदार नोंदणी साठी Online अर्ज भरण्यापूर्वी आपला पासपोर्ट फोटो, मूळ आधार कार्ड, आणि मूळ पदवीची गुणपत्रिका तसेच आपल्या स्वाक्षरीचा फोटो काढून ठेवावा. हे सर्व फोटो मोबाईलचे गॅलरीत थोडे क्रॉप करुन save करून ठेवावे. मग https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/Graduate2023.aspx या लिंकला touch करून एक एक माहिती भरत जावी...! शेवटी choose file करून वरील फोटो अपलोड करुन फॉर्म सबमिट करावा...!

उपरोक्त लिंक ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत लिंक असून सर्व पदवीधर मतदारांनी मनात कोणतीही शंका न ठेवता नोंदणी करावी,असे सांगितले.

 धनंजय विनोद आसुटकर 
अध्यक्ष - युवक कॉंग्रेस कमिटी, मारेगाव 
मो. नं - ९५५२९१४८८२ 

समविचारी पक्षांनी शोषणाच्या प्रतिकारार्थ एकत्र येण्याची गरज-अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकदिवसीय पक्षाची संघटनात्मक बांधणी आढावा बैठकीचे आयोजन राजीव गांधी सभागृहात कार्यकर्त्या सोबत आढावा घेतल्यानंतर विश्राम भवन येथे समविचारी पक्ष असलेला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे काही समाजबांधवांनी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन चंद्रपूर शहरात आगमानिमित्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 त्यावेळी थोडक्यात संवाद साधतेसमयी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण सर्व शोषित वंचित घटक असून आपण या देशाचे समदुःखी वर्ग आहोत ज्याप्रमाणे शोषकांची एकच जात असते त्याचप्रमाणे शोषितांची एकच जात ती शोषित वंचित होय. त्यामुळे हजारो शतकाच्या शोषणाचा पाढा वाचून आम्हाला न्याय मिळणार नाही तर त्याकरिता समविचारी पक्ष संघटनेनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची गरज आहे. आपण एकत्र आल्यास पुढचे मुख्यमंत्री आपल्यातील असणार आहे. आपण मात्र लोकशाहीची ताकद ओळखण्याची गरज नितांत आहे.असे उपस्थित विश्राम भवनातील भेटी दरम्यान संवाद साधून गोंगपाच्या कार्यकर्त्याना आशेचा मार्ग दाखविला यावेळी
गोंगपा माजी जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी,गोंगपा युवा नेते गजानन पाटील जुमनाके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा पांडुरंग जाधव, डॉ प्रकाश वट्टी, डॉ कोटनाके व संतोष कुळमथे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुसे साहेब जयदीप खोब्रागडे तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

निर्मल ते हैद्राबाद मार्गावर वाहनाला अपघात, डॉ. सुरेखा बरलोटा दगावल्या : अन्य तीन जखमी


सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैद्राबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रि व प्रसुती रोगतज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा या दगावल्या असून अन्य तीन जन गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोन वाहनातून डॉक्टर व त्यांच्या मित्रांचे कुटूंब यवतमाळकडे येत असतांना हि दुर्घटना घडली.

डॉ. बरलोटा व त्यांचे मित्राचे कुटूंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून 12 किमोमिटर अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक भ्रष्ट होऊन ते फुटले. त्यामुळे हा अपघात झाला. एमएच 29 बीपी 4200 क्रमांक असलेली हि गाडी अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर लोक धावले व त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मण येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. पुजा पियुष बरलोटा वय 16 तसेच अतिथी वय 18 आणि मिनल वय 40 असे तिघेजन निर्मल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकी इतरांना किरकोळ जखमा असल्याचे समजते. हि वार्ता यवतमाळात येताच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. बरलोटा यांचे मित्र निर्मलकडे रवाना झालेत.

हैद्राबाद येथील डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा हे पार्थिक यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.