असंख्य महिलांची मारेगाव पोलिस ठाण्यात धडक; अवैध विक्री बंद करण्याची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा हटवांजरी येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्यासंदर्भात येथील महिलांचे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. या अवैध दारू विक्री मुळे अनेकांच्या घरात भांडण तंटे निर्माण होत असल्याने येथील दारू बंद करण्याची मागणी महिलांनी आज दिलेल्या निवेदनातून ठाणेदार यांना केली आहे.

तालुक्यातील हटवाजरी येथील 30 ते 40 महिलांनी मारेगाव पोलिस स्टेशन गाठून गावातील अवैध दारू विक्री संदर्भात जनतेच्या रक्षण करत्याला अवगत करून दिले. तसेच गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. 

महिलांशी संवाद साधला असता हटवांजरी गावात काही गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध विक्री व्यवसाय चालवत आहेत. संबंधित लोकांचा या दारू व्यवसायिकावर आशीर्वाद असल्याचा आरोप केला आहे. महिलांना शिवीगाळ केली जाते. दबंगिरी प्रकारामुळे महिलांना जगणे कठीण होत आहे. त्यामुळे गावातील अवैध देशी दारू बंद करावी व आमचा संसार वाचवावा अशी आग्रही मागणी येथील महिलांनी मारेगाव पोलीस प्रशासनाला केली आहे. गावात दारूबंदी करण्याबाबत गावातील महिला एकजूट झाल्या असून येथील अवैध दारू बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी मारेगाव पोलिस दिलेल्या निवेदनातून केली.

 विशेष म्हणजे या अवैध दारु विक्रीमुळे गावातील तरुण नवयुवक व्यसनाधीन होत आहेत.हीच स्थिती तालुक्यातील अनेक गावातील असतील. परिणामी अनेक संसार उघड्यावर आले असून, देशाचे पुढील भविष्य अंधकारमय होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने होणारी अवैध विक्री बंद करावी अशी मागणी हटवाजरी येथील महिलांनी केली आहे. दरम्यान,पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले. परंतु आता पोलीसाकडून धडक कारवाई करण्याचे सौदार्य कधी आणि केव्हा राबविण्यात येईल, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

 

कुंभा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : कुंभा येथीलभारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्याकरिता कायदेविषयक मार्गदर्शन व प्रबोधन शिबिर घेण्यात आले. यात विविध कायद्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.
    
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य संजय देवाळकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयचे न्यायाधिश मा.निलेश वासाडे, अ‍ॅड. मेहमूद पठाण, अ‍ॅड.रामटेके, सकाळचे बातमीदार कैलास ठेंगणे, अ‍ॅड. मेघा कोडापे, अ‍ॅड. मृणाली गाणार मंचावर उपस्थित होते.
 
याप्रसंगी न्यायाधिश निलेश वासाडे यानी मोटार ॲक्ट सह ॲट्रॉसिटी ॲक्ट, पोस्को कायद्याचे तर अ‍ॅड.मेहमूद पठाण यांनी न्यायलयीन कामकाजा कसे चालते तर, अ‍ॅड. प्रयाग रामटेके यांनी ज्येष्ठ नागरिकाचे हक्क व कायदा तर अ‍ॅड.मेघा कोडापे यांनी सायबर ग्रामीण क्राईम बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी न्यायाधिश यांनी परिसरातील प्रसिद्ध स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शेखर सोयाम यांनी केले.सूत्रसंचालन अशोक फुलमाळी यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज ठेपाले यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृपाल खचकड, अरविंद खोके, प्रशांत तांमगाडगे, प्रवीण बारशेट्टीवार, प्रकाश खुटेमाटे, विलास बर्डे सह शाळेचे कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

"जिल्हास्तरीय जलतरण चॅम्पियनशिप" स्पर्धेत चैतन्य चंद्रशेखर झाडे याने जलतरणात प्रथम क्रमांकाची तीन बक्षिसे जिंकली

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जाजू इंग्लिश मिडियम स्कूल व ॲमॅचर असोसिएशनच्या एकत्रित सहयोगाने "जिल्हास्तरीय जलतरण चॅम्पियनशिप" २४ सप्टेंबर २०२२ रोजी जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या मिनी ऑलिंपिक लेवल स्विमिंग पूल येथे घेण्यात आली. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सर्वच इंग्रजी, मराठी, हिंदी, सेमी इंग्रजी शाळेतील मुलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला.

या चॅम्पियनशिपचे उद्घाटन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे, पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप भुजबळ, बांधकाम विभाग सब डिव्हिजनल ऑफिसर माननीय प्रवीण कुलकर्णी आणि यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय नंदा खुरपडे मॅडम यांच्या शुभहस्ते पार पडले.

ही स्पर्धा पाच गटांत घेण्यात आली होती. यात गट इ ५० मीटर फ्री स्टाईल मुलांमधून चैतन्य झाडे (गोल्ड मेडल), गट इ २०० मीटर फ्री स्टाईल मुलांमधून चैतन्य झाडे (गोल्ड मेडल) गट इ २५ मीटर बटरफ्लाय स्ट्रोक मुलांमधून चैतन्य झाडे (गोल्ड मेडल) प्राप्त केले.

माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अनेक आशीर्वाद दिले. सोबतच विद्यार्थ्यांच्या शारिरीक, बौद्धिक व शैक्षणिक प्रगतीस अशाप्रकारचे उपक्रम नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत पात्र ठरेल. तसेच कोरोणाच्या कालानंतर प्रथमच शाळेने आपल्या जिल्ह्यात अशाप्रकारचा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले.

उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच उपप्राचार्य अश्विन जगताप, समन्वयक साबेरा बाटावाला यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक तसेच अभिनंदन करीत अनेक आशीर्वाद दिले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.



पोलीस ठाण्यात "राडा" करणे भोवले; दोघांनाही केले निलंबित

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, पोना धिरज चव्हाण यांना पोलीस अधिक्षक यांनी या दोघांना निलंबित केले आहे.

सविस्तर असे की, टिपूर्णे व चव्हाण यांचा 29 गुरुवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीt झाले. चक्क! पोलीस स्टेशन च्या आवारात दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली. या प्रकरणाची गावभर चर्च रंगत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना अहवाल पाठवला होता.

कायद्याचे रक्षक व लोकसेवक या पदाला न शोभणारे कृत्य व पोलीस अधिकारी व अंमलदार या पदाला अशोभनीय गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ यांनी त्या दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून वणी पोलीस स्टेशन वादग्रस्त राहिले आहे. मोठमोठ्या गुन्ह्यात अनेकांनी आपले हात पिवळे केले आहे. कित्येक गुन्ह्याचा तपास प्रलंबित आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक काय ठोस पाऊल उचलतात का? हेही वास्तव बघणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ वणीत होणार दाखल?

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथील ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकांनी जमादारच्या कानखाली आवाज काढला असल्याची माहिती समोर आली असतांना वावड्या उठल्या होत्या. हे प्रकरण अधिक्षक यांच्या दारापर्यंत पोहचल्याने वणी ठाण्याचा गलथान कारभार पाहून थेट जिल्हा पोलीस अधिक्षक वणीत दाखल होत आहेत. कोण निलंबित होणार आणि उचलबांगडी कोणाची होणार? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून वणी पोलीस ठाणे वादग्रस्त राहिले आहे. मोठमोठ्या गुन्ह्यात अनेकांनी आपले हात पिवळे केले आहे. कित्येक गुन्ह्याचा तपास प्रलंबित आहे. मात्र, पोलिसी खाक्या दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांनी उतमाज केला आहे. चक्क! गुरुवारी रात्री एका पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याने अमलदारच्या कानशिलात लावली आहे. म्हणजेच पोलीस जनतेच्या सेवेसाठी की,स्वतःच्या स्वार्थासाठी हे कोडेच आहे. तूर्तास याच पार्श्वभूमीवर वणीत जिल्हा पोलीस अधिक्षक येत असल्याची माहिती आहे. आता जिल्हा पोलीस अधिक्षक काय करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.