असंख्य महिलांची मारेगाव पोलिस ठाण्यात धडक; अवैध विक्री बंद करण्याची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा हटवांजरी येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्यासंदर्भात येथील महिलांचे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. या अवैध दारू विक्री मुळे अनेकांच्या घरात भांडण तंटे निर्माण होत असल्याने येथील दारू बंद करण्याची मागणी महिलांनी आज दिलेल्या निवेदनातून ठाणेदार यांना केली आहे.

तालुक्यातील हटवाजरी येथील 30 ते 40 महिलांनी मारेगाव पोलिस स्टेशन गाठून गावातील अवैध दारू विक्री संदर्भात जनतेच्या रक्षण करत्याला अवगत करून दिले. तसेच गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. 

महिलांशी संवाद साधला असता हटवांजरी गावात काही गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध विक्री व्यवसाय चालवत आहेत. संबंधित लोकांचा या दारू व्यवसायिकावर आशीर्वाद असल्याचा आरोप केला आहे. महिलांना शिवीगाळ केली जाते. दबंगिरी प्रकारामुळे महिलांना जगणे कठीण होत आहे. त्यामुळे गावातील अवैध देशी दारू बंद करावी व आमचा संसार वाचवावा अशी आग्रही मागणी येथील महिलांनी मारेगाव पोलीस प्रशासनाला केली आहे. गावात दारूबंदी करण्याबाबत गावातील महिला एकजूट झाल्या असून येथील अवैध दारू बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी मारेगाव पोलिस दिलेल्या निवेदनातून केली.

 विशेष म्हणजे या अवैध दारु विक्रीमुळे गावातील तरुण नवयुवक व्यसनाधीन होत आहेत.हीच स्थिती तालुक्यातील अनेक गावातील असतील. परिणामी अनेक संसार उघड्यावर आले असून, देशाचे पुढील भविष्य अंधकारमय होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने होणारी अवैध विक्री बंद करावी अशी मागणी हटवाजरी येथील महिलांनी केली आहे. दरम्यान,पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले. परंतु आता पोलीसाकडून धडक कारवाई करण्याचे सौदार्य कधी आणि केव्हा राबविण्यात येईल, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.