उभा ट्रक दिसला नसल्याने दुचाकीस्वाराची जबर धडक, जागीच ठार

नितेश वनकर | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गेल्या चार दिवसापासून राज्य मार्गांवर बिघाड असलेला उभ्या ट्रकला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला, ही घटना मार्डी-खैरगाव राज्य मार्गांवरील रस्त्यावर शनिवार (3 संप्टें.) ला रात्री 10 वाजताचे दरम्यान, घडली.
     
संजय पांडुरंग धारणे (47) रा. किन्हाळा असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. 
     
संजय हे चिंचमंडळ कडून मोटारसायकल क्रमांक एम.एच.40 डी.6382 याने तालुक्यातील किन्हाळा येथील मूळ गावी येत असतांना मार्डी-खैरगाव राज्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला ना दुरुस्त असलेल्या उभ्या ट्रक ला जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
     
मृतकाच्या पाठीमागे आई, पत्नी,1 मुलगा, 2 मुली असा बराच मोठा आप्त परीवार आहे.
      
वणी-नांदेपेरा-मार्डी- खैरी या राज्य मार्गांवर रात्री बेरात्री नको तिथे ट्रक उभे असतात, शिवाय रस्त्याच्या कडेला वाहने उभी करीत असतांना वाहन धारक दिशादर्शक संकेत लावत नसल्याने या रस्त्यावर लहान-सहान वाहन धारकांना पुढील अंदाज चुकून अपघाताला सामोरे जावं लागत असून प्रवाशीयांना जीव गमवावा लागत आहे. 

हनुमान नगर येथील सिमेंट शेड बांधकामतील गैरप्रकार व निकृष्ट बांधकामाची होणार चौकशी

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : सदस्य अनिल तेलंग यांनी येनक ग्रामपंचायत यांचे दि.27 /4/2022 रोजी घेतलेल्या ठरवानुसार हनुमान नगर येथील सामान्य फंडातून होत असलेल्या सिमेंट शेड बांधकामतील गैरप्रकार व निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत गट विकास अधिकारी पंचायत समिती वणी, यांनी चौकशीचे पत्र देत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (BLACK LIST) समाविष्ट करण्याबाबत चे आदेश जारी केले.

अनिल घनश्याम तेलंग ग्रामपंचायत सदस्य येनक यांनी दिनांक 18/8/2022 ला येनक ग्रामपंचायत यांचे दि.27 /4/2022 रोजी घेतलेल्या ठरवनुसार हनुमान नगर येथील सामान्य फंडातून होत असलेल्या सिमेंट शेड बांधकामतील गैरप्रकार व निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत नमूद केलेल्या मुद्याची चौकशी करण्याकरिता दि. 8/9/2022, वेळ 12.00 वा. ग्रामपंचायत येनक येथीलप्रकरणातील संपूर्ण दस्ताऐवज व अद्यावत माहिती सह ग्राम पंचायत येनक येथे उपस्थित राहावे. सदर दिनाकांची यांची कुठल्याही प्रकरची रजा मंजूर करण्यात येणार नाही असे, प्राप्त झालेल्या (ता.2 संप्टें.) पत्रात गट विकास अधिकारी पंचायत समिती वणी यांनी सदस्य अनिल तेलंग, येनक यांना माहितीस दिले.

आता गट विकास अधिकारी काय निर्णय घेतात येनक च्या नागरिकांचे लागले आहे. 

नृत्य स्पर्धेत पटकावले एस. पी. एम हायस्कूल ने प्रथम पारितोषिक


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : दि 3 सप्टेंबर 2022रोजी रोटरी क्लब वणी द्वारा आयोजित देशभक्ती पर नृत्य स्पर्धेत एस पी एम विद्यालय ने अ गट 5वी ते 7वी मधील विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले तर ब गट 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांनी दुसरे पारितोषिक पटकावले.

यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय अप्रतिम नृत्य सादर केले त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे पालक व शिक्षक मोठया संख्येने उपस्तित होते अ गट व ब गट मिळून जवळ जवळ 15 शाळांनी यात सहभाग घेतला होता. सौ संगीता मेश्राम मॅडम,नारलावार मॅडम, नवघरे मॅडम, देशमुख मॅडम, कचवे मॅडम, मुख्याध्यापक क्षीरसागर सर, उपमुख्याध्यापक तामगाडगे सर, यांनी विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतली.
       

अमृत महोत्सवी वर्षा निमित्य नरसाळा ग्रामपंचायती तर्फे वृक्षारोपण


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मौजा नरसाळा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य पदाधिकारी यांनी या अमृत महोत्सवी  वर्षाची समस्त गावकऱ्यांना सतत आठवण रहावी म्हणून गाव सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने गावाच्या मुख्य द्वारापासून ते हनुमान चौक पर्यंत वृक्षारोपण करण्यात आले.

सदस्य शारदा पांडे, सदस्य धनंजय तोडासे, सचिव सचिन पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला रोगे, अंगणवाडी सेविका भारती खाडे, अंगणवाडी सेविका सविता गोवर्धन, चिडे सर, डोंगरकर सर, आशा वर्कर जयश्री भुसारी, व गावातील नागरिक बाबाराव खाडे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वृक्ष मोठे होई पर्यंत सर्व जबाबदारी ही ग्रामपंचायत घेणार असून गावकऱ्यानी सुद्धा "माझं गाव माझं झाड" असा संकल्प करून वृक्षाची जोपासना करावीत अशी अपेक्षा येथील सरपंच संगीत मरस्कोल्हे यांनी व्यक्त केली. झाडे मोठी झाली तर येथील नागरिकांना सावली मिळेल त्यापासून पुढील पिढीला फायदा होईल व गावातील वातावरण नैसर्गिक वाटेल करिता सर्व नागरिकांनी लावलेल्या झाडाची जोपासना करण्यास सहकार्य करावेत तसेच या मुळे अमृत मोहत्सव वर्षाची आठवण स्मरणात राहतील.

सरपंच संगीत मरस्कोल्हे यांच्या हस्ते झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच उपसरपंच यादव पांडे यांनीही झाड लावून झाडाची जोपासना केली जातील असे मत व्यक्त केले. 

मोकाट जनावरांचा उच्छाद; वाहनचालक धोक्‍यात

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहरवासियांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. कित्येक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. मोकाट जनावरांना पकडणे, मालकांचा शोध घेण्याची मोहीम नगरपंचायतने हाती घेतलेली आठवत नाही. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे. 

दरम्यान, मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्याने पारित केलेल्या कायद्याचीही नगरपंचायतने अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामान्य माणसांची आहे. दि 2 सप्टेंबर ला सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गांवरून पश्चिमे जात असतांना संतोष भाऊराव बलकी (55) रा. मारेगाव यांच्या मुफेड गाडी च्या समोर मोकाट असलेली लंगलंग फिरणारी जनावरे एकदम आडवी आल्याने त्यांची गाडी मध्यभागातील डिव्हाडर वर आदळली. यात त्यांच्या मुफेड गाडीचे समोरचे चाकाच्या वरचे टफ्फर तुटले, सायंकाळची वेळ आणि रहदारी असल्यामुळे लोकांच्या नजरेत पडल्याने लगेच नागरिक त्यांच्या मदतीला धावले. बर झालं बलकी यांना काहीच लागले किंबहुना दुखापत झाली नाही, परंतु गाडीचे थोडक्यात नुकसान झाले.

अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना मोकाट जनावर शहराच्या मुख्य मार्गांवर हिंडत फिरत आपलं ठाण मांडून बसतात या कडे मात्र,नगर पंचायतचे लक्ष नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.