९ ऑगस्ट: नरसाळा येथे जागतिक मुळनिवासी दिवस साजरा करण्यात आला


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे आज रोजी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा महामानव धरती आबा, जननायक बिरसा मुंडा यांच्या विचारावर कार्य करणारे तसेच गावातील तमाम आदिवासी समाज बंधू भगिनी कडून क्रांतिकारी बिरसा मुंडा व क्रांतिवीर बाबुराव पुल्लेशूर शेडमाके यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झेंडा वंदन करून जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
तसेच जागतिक आदिवासी अध्यक्ष माजी सरपंच सुधाकरजी उईके, संगीत मर्सकोले, भाविक कोयचाडे, धंनजय तोडासे,
विठ्ठल किनाके, प्रभाकरजी उईके, वसंता तोडासे,
गोपाल उईके, गोपाल येरचे, भारत सोयाम, तसेच समाजातील सर्व महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कायदे बदलत चालले असून त्या कायद्याचे पालन करणे ही काळाची गरज - गोरख दिवे


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : दिवसेंदिवस कायदे बदलत चालले असून त्या कायद्याचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे मत उदगीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी व्यक्त केले ते सराफ व सुवर्णकार असोसिएशन उदगीर च्या वतीने आयोजित केलेल्या नऊ ऑगस्ट एकता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील रवी जाधव हे उपस्थित होते शहरात चोरांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक व्यापाऱ्यांनी व सराफ दुकानदारांनी आपल्या व्यापारच्या दृष्टीने सीसीटी व्ही कॅमेरे बसवावेत असाही सल्ला दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब, सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अविनाश
रायचूरकर, उपाध्यक्ष अशोक फुलारी, सचिव शाम वट्टमवार, सहसचिव गणपतराव नखाशे, कोषाध्यक्ष भारत दीक्षित, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सुवर्ण नियंत्रण कायद्यासाठी प्राणाची अवती दिलेल्या व कोरोना काळात निधन पावलेल्या सुवर्णकार समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सुवर्णकार असोसिएशन च्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उदगीर सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश रायचूरकर वासवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल व प्रकाश तोंडारे यांची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ व्यापारी बाबुरावजी खेडकर (सुवर्णकार) यांनी 9 ऑगस्ट एकता दिन म्हणून का साजरा करतात याची भूमिका स्पष्ट केली.यावेळी इतर उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.या एकता दिनाचे प्रास्ताविक उदगीर सराफ व असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश रायचूरकर यांनी केले.आभार प्रदर्शन टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार यांनी केले.
या कार्यक्रमास सराफ सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीरित्यापार पाडण्यासाठी राजेश कदम,अनंतराव नखाते, गोविंदा सुवर्णकार, प्रभाकर सुवर्णकार, सतीश पोद्दार, लक्ष्मीकांत नखाते, आकाश बंगाली, इब्राहीम जरगरी, मिनाज दरगर, अमर हुडगे,बाळू पोतदार,लक्ष्मीकांत बारस्कर, आदींनी पुढाकार घेतला.

जीवाची बाजी लावून सुरळीत केला विद्युत पुरवठा

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : दोन दिवसापासून पाण्याचा कहर सुरु असल्याने तालुक्यातील महागाव तलाव तुडुंब भरले, सात फूट पाणी. अशातच दि. 8 ऑगस्टच्या रात्री 11 के व्ही बंद पडली आणि जवळ जवळ 15 गाव अंधारात गेली. मात्र, पावसाची पर्वा न करता जिवाजी बाजी लावून दुसऱ्या दिवशी त्या महागांव तलावतील सात फूट पाणी असलेल्या पोल वर चढून या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
मार्डी 33 के व्ही (KV) उपकेंद्र मधुन 11 के व्ही (KV) कुंभा वहिनी ही सोमवार च्या रात्री 11 वाजेपासून बंद होती.  रात्रभर धो धो असल्याने या वाहिनी वरील अंदाजे 15 गावा चा वीज पुरवठा बंद पडला होता. त्यामुळे या भागातील कर्मचारी 11 के व्ही (KV) कुंभा गावठाण फिडर कनिष्ठ अभियंता श्री पवार साहेब, कर्मचारी श्री उमेश कनाके, सुरज गमे, अंकुश माडेकर, गिरीश पाचभाई,श्री कातकडे, वैद्य, प्रफुल रासेकर प्रधान तंत्रज्ञ यांनी जीवाची बाजी लावून महागांव तलावात सात फूट पाणी असलेल्या त्या पोल वर  चढून विद्युत पुरवठा सुरू केला आहे.
एकीकडे पाऊस, सात फूट तलावात पाणी तरी सुद्धा महावितरण कंपनी चे कर्मचारी उतरले पाण्यात. दरम्यान, फिल्ड वर काम करित असतांना कर्मचाऱ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली होती. मात्र विज पुरवठा सुरळीत केला. हे विशेष...
 त्यांचे या कार्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

शेतकऱ्यांनी दत्तक योजनेचा लाभ घ्यावा : अविनाश लांबट

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मनसेच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेचा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन मनसेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.
बेंबळा प्रकल्प तथा अप्पर वर्धा प्रकल्पचे दरवाजे उघडल्या नंतर पूर परिस्थिती होऊन शेतजमिनी सह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांना त्यांना मदतीचा हात देण्यासाठी वणी विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही योजना कार्यान्वित केली आहे.
या योजने अंतर्गत पुरपीडित अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे, खत, आणि रोख रक्कम दिली जाणार आहे. ही योजना 1ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत कार्यान्वित राहणार असून विहित मुदतीत गरजू शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावे, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेती पिके पुरात वाहून गेल्याचा पुरावा, शेतजमिनीचा 7/12, आधारकार्ड झेराक्स, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषणा पत्र, इत्यादी कागदपत्रे शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय वणी येथे सादर करणे आवश्यक आहे.
ही योजना महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उबरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे या योजनेचा तालुक्यातील पुरपीडित अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे,आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.

9 ऑगस्ट: विश्व आदिवासी दिवस वांजरी येथे साजरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : अ.भा.युवा संवैधानिक हक्क परिषद शाखा वांजरी येथे आज रोजी 9 ऑगस्ट विश्व मूलनिवासी दिवस हा महामानव, धरतीआबा, जननायक बिरसा मुंडा यांच्या विचारावर कार्य करणारे तमाम समाज बंधु भगिनी कडुन क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या तैल चित्रास हार अर्पण करुन विश्व आदिवासी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. 

या जागतिक आदिवासी अध्यक्ष लक्ष्मण सिडाम, संतोष आत्राम, राजकुमार किनाके, ज्ञानदिप डोनेकर, मंगेश आत्राम, विनोद काकडे, संतोष आत्राम, डुग्गु, सोनू आदींची उपस्थिती होती.