टॉप बातम्या

शेतकऱ्यांनी दत्तक योजनेचा लाभ घ्यावा : अविनाश लांबट

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मनसेच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेचा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन मनसेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.
बेंबळा प्रकल्प तथा अप्पर वर्धा प्रकल्पचे दरवाजे उघडल्या नंतर पूर परिस्थिती होऊन शेतजमिनी सह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांना त्यांना मदतीचा हात देण्यासाठी वणी विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही योजना कार्यान्वित केली आहे.
या योजने अंतर्गत पुरपीडित अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे, खत, आणि रोख रक्कम दिली जाणार आहे. ही योजना 1ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत कार्यान्वित राहणार असून विहित मुदतीत गरजू शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावे, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेती पिके पुरात वाहून गेल्याचा पुरावा, शेतजमिनीचा 7/12, आधारकार्ड झेराक्स, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषणा पत्र, इत्यादी कागदपत्रे शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय वणी येथे सादर करणे आवश्यक आहे.
ही योजना महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उबरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे या योजनेचा तालुक्यातील पुरपीडित अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे,आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();