बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : दिवसेंदिवस कायदे बदलत चालले असून त्या कायद्याचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे मत उदगीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी व्यक्त केले ते सराफ व सुवर्णकार असोसिएशन उदगीर च्या वतीने आयोजित केलेल्या नऊ ऑगस्ट एकता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील रवी जाधव हे उपस्थित होते शहरात चोरांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक व्यापाऱ्यांनी व सराफ दुकानदारांनी आपल्या व्यापारच्या दृष्टीने सीसीटी व्ही कॅमेरे बसवावेत असाही सल्ला दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब, सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अविनाश
रायचूरकर, उपाध्यक्ष अशोक फुलारी, सचिव शाम वट्टमवार, सहसचिव गणपतराव नखाशे, कोषाध्यक्ष भारत दीक्षित, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सुवर्ण नियंत्रण कायद्यासाठी प्राणाची अवती दिलेल्या व कोरोना काळात निधन पावलेल्या सुवर्णकार समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सुवर्णकार असोसिएशन च्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उदगीर सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश रायचूरकर वासवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल व प्रकाश तोंडारे यांची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ व्यापारी बाबुरावजी खेडकर (सुवर्णकार) यांनी 9 ऑगस्ट एकता दिन म्हणून का साजरा करतात याची भूमिका स्पष्ट केली.यावेळी इतर उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.या एकता दिनाचे प्रास्ताविक उदगीर सराफ व असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश रायचूरकर यांनी केले.आभार प्रदर्शन टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार यांनी केले.
या कार्यक्रमास सराफ सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीरित्यापार पाडण्यासाठी राजेश कदम,अनंतराव नखाते, गोविंदा सुवर्णकार, प्रभाकर सुवर्णकार, सतीश पोद्दार, लक्ष्मीकांत नखाते, आकाश बंगाली, इब्राहीम जरगरी, मिनाज दरगर, अमर हुडगे,बाळू पोतदार,लक्ष्मीकांत बारस्कर, आदींनी पुढाकार घेतला.