चंद्रपूरात पाेहचली पेंशन संघर्ष यात्रा; हजारों कर्मचाऱ्यांनी केले संघर्ष यात्रेचे स्वागत !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे  

चंद्रपूर : फॅमिली पेंशन, ग्रॅज्युईटी आणि जुणी पेंशन योजना या प्रमुख मागण्यांसाठी आज सोमवार दि.६ डिसेंबरला दुपारी शहरातील चंद्रपूर-नागपूर या मुख्य मार्गावर असलेल्या न्यू इंग्लिश हायस्कुलच्या मैदानावर पेंशन संघर्ष यात्रा पाेहचली.

चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज एका सभेचे आयोजन करण्यात आले हाेते. यात अनेक पदाधिका-यांनी सभेला संबाेधित केले. दरम्यान दि.२२ नाेव्हेंबर राेजी पेंशन संघर्ष यात्रेचा प्रारंभ मुंबई आझाद मैदान वरुन झाला. ती संघर्ष यात्रा आज साेमवारला चंद्रपूरात सकाळी पाेहचली.

या वेळी अनेक कर्मचारी बांधवानी या पेंशन संघर्ष यात्रेचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारों कर्मचारी बांधव आजच्या सभेला उपस्थित झाले हाेते. दुपारी ४ वाजता एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले. या कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असून त्याकडे शासनाने लक्ष पुरवून त्याची परीपुर्तता करायला हवी अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया सर्व स्तरावरुन उमटल्या हाेत्या.

पार पडलेल्या सभेला राज्य सरकारी,निम शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ व अन्य संघटनाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते. न्यू इंग्लिश हायस्कुलचे प्रांगण अक्षरश: कर्मचा-यांच्या उपस्थितीने फुलून गेले हाेते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त करण्यात आले अभिवादन

सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे 

वणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिना निमित्त शहरात ठिकठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. त्यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. अनेक नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त आदरांजली वाहिली. रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळही महापरिनिर्वाणदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी व मध्यरेल्वे कर्मचारी रेल्वे स्टेशन वणी यांच्या विद्यमाने आयोजित या अभिवादन सोहळ्याला रेल्वे कॉलनी, विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी येथील रहिवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. 

विषमतेच्या अंधकारातून समानतेच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रज्ञासुर्याचा ६ डिसेंबर १९५६ ला अस्त झाला असला तरी त्यांनी पेरलेल्या विचारांचा कधीच अंत होऊ शकणार नाही. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य व समाजाला आधुनिकतेचा दाखविलेला मार्ग प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देणारा ठरला. त्यांचे उच्चकोटीचे विचार समाजासाठी नेहमी प्रेरणादायक ठरले आहेत. त्यांनी देशात लोकतंत्र निर्माणाची संकल्पना मांडून देशासाठी लिहिलेली राज्यघटना विश्व उल्लेखनीय ठरली. देशाला एकसंघ ठेवण्याकरिता राज्यघटना बहाल करून देश प्रजासत्ताक केला. विद्येचा तो महासागर होता. आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी अनिष्ट विचारसरणीवर प्रखर प्रहार केला. मानवी समानतेचा विडा उचलून माणसाला माणसाच्याच गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता समानतेची चळवळ उभारणाऱ्या क्रांतिसूर्याची थोरवी सांगतांना शब्दही कमी पडतात, असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन सोहळ्यातून व्यक्त केले. असा हा अथांगज्ञानाचा सागर असून त्यातून कितीही ज्ञान घेतले तरी हा सागर आटणार नाही, असे मौलिक विचार प्रमुख पाहुण्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत चंदनखेडे यांनी तर आभार प्रदर्शन आकाश बोरकर यांनी केले. 

कर्यक्रमाला किसनराव भगत, रमेश पाटील, कैलास बोरकर, अरुण चंदनखेडे, अनिल भगत, राहुल चंदनखेडे, वैभव गजभिये, रंजना चंदनखेडे, कांताबाई गजभिये, मीराबाई धवन, शशिकला बोरकर, लताबाई आवळे, सुरेखा गजभिये, प्रिया भगत, इंदू पळवेकर, ज्योती नगराळे, नीता नगराळे, ज्योती गरपाळ यांच्यासह रेल्वे कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अग्रगण्य भारतीय कवी,संशोधक,समीक्षक,अनुवादक आणि बाललेखक श्री खान हसनैन आकिब यांचे हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण्यात आले स्वागत

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख 

यवतमाळ : रविवार, 5 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी आठ वाजता भारतातील प्रसिद्ध कवी,संशोधक,समीक्षक,अनुवादक आणि बाललेखक,गुलाम नबी आझाद डी-एड कॉलेज,पुसद जिल्हा यवतमाळचे व्याख्याते श्री.खान हसनैन आकिब एका शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यवतमाळ येथे आले होते. या संधीचा फायदा घेत यवतमाळ येथील भोसा रोडवर स्थित हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल आणि वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष श्री मिर्झा अतवार बेग आणि यवतमाळ जिल्ह्यातील आघाडीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक सचिव श्री वासिक जुबेर शेख यांनी खान हसनैन आकिब साहेब यांना शाळेच्या कार्यालयात आमंत्रित करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

लक्षात असू द्या श्री खान हसनैन आकिब साहिब मुख्यतः उर्दू आणि इंग्रजीमध्ये लिहितात परंतु अधूनमधून फारसी,हिंदी आणि मराठी भाषेत गद्य आणि काव्याचा आस्वाद घेतात ते 17 पुस्तकांचे लेखक आहेत. आणि तो एक शिक्षक आणि अध्यापनशास्त्री देखील आहे. देशभरातून साहित्यिक आणि शैक्षणिक व्याख्यानात त्यांना आमंत्रित केली जातात. ते अनेक सार्वजनिक आणि खाजगी संस्था आणि संघटनांचे सदस्य देखील आहेत. त्यांनी पदवीसाठी पाठ्यपुस्तकेही लिहिली आहेत.ते साहित्याबरोबरच बालसाहित्यातही खूप सक्रिय आहेत.

या स्वागत समारंभात यवतमाळ येथील प्रसिद्ध कवी आणि लेखक डॉ. रिझवान कश्फी साहेब,अनुकरणीय शिक्षक,कवी आणि साहित्यिक श्री. मुझफ्फर हुसैन नादीम साहेब,जे अध्यापनासह समाजासाठी अमूल्य सेवा करीत आहे असे नामवंत श्री. समीउल्ला खान साहेब,खिदमत ए ख़ल्क़ तंज़ीमचे मुख्य सूत्रधार,युवा उद्योजक (कास्तकार ऍग्रो इंडस्ट्रीज) श्री.अमिन जोया हे प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी खान हसनैन आकिब साहेब यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.आणि त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे हा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगिकारला पाहिजे - प्राचार्य हेमंत चौधरी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव इथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना प्राचार्य हेमंत चौधरी म्हणाले की, बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगिकारला पाहिजे असे मत व्यक्त केलं.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या साहित्यिका कुसुम ताई अलाम यांचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिकला सत्कार !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयात दि.४ व दि.५ डिसेंबरला संविधानाच्या सन्मानार्थ विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले.

या संमेलनात विदर्भातील अतिदुर्गम भागाच्या गडचिराेली जिल्ह्यातील आदिवासी लेखिका व कवयित्री तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंज सदस्या कुसुम ताई अलाम यांचा सत्कार करण्यात आला. याच निमित्ताने त्यांना निमंत्रितांच्या कवीसंमेलनात अध्यक्ष मंडळात स्थान देण्यात आले.आयाेजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार व शिव इतिहासकार डॉ.आनंद पाटील हाेते तर उद्घाटक म्हणून जेष्ठ शास्त्रज्ञ कवी, लेखक, माहितीपट दिग्दर्शक डॉ.गाैहर रझा उपस्थित हाेते.

या शिवाय प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा .प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, यशवंत मकरंद, प्रभु राजगडकर, शशिकांत उन्हवणे, राजु देसले सुधाकर गायकवाड व अनेक साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते या संमेलनास उपस्थित होते. शेतक-यांचे काळे कायदे विरुद्ध आंदोलन, सीएए, एनआरसीच्या विरोधी व संविधान सन्मानार्थ हे साहित्य संमेलन आयोजित करण्यांत आले हाेते. अशी माहिती खुद्द कुसुमताई अलाम यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना दिली.