टॉप बातम्या

सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या साहित्यिका कुसुम ताई अलाम यांचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिकला सत्कार !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयात दि.४ व दि.५ डिसेंबरला संविधानाच्या सन्मानार्थ विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले.

या संमेलनात विदर्भातील अतिदुर्गम भागाच्या गडचिराेली जिल्ह्यातील आदिवासी लेखिका व कवयित्री तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंज सदस्या कुसुम ताई अलाम यांचा सत्कार करण्यात आला. याच निमित्ताने त्यांना निमंत्रितांच्या कवीसंमेलनात अध्यक्ष मंडळात स्थान देण्यात आले.आयाेजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार व शिव इतिहासकार डॉ.आनंद पाटील हाेते तर उद्घाटक म्हणून जेष्ठ शास्त्रज्ञ कवी, लेखक, माहितीपट दिग्दर्शक डॉ.गाैहर रझा उपस्थित हाेते.

या शिवाय प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा .प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, यशवंत मकरंद, प्रभु राजगडकर, शशिकांत उन्हवणे, राजु देसले सुधाकर गायकवाड व अनेक साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते या संमेलनास उपस्थित होते. शेतक-यांचे काळे कायदे विरुद्ध आंदोलन, सीएए, एनआरसीच्या विरोधी व संविधान सन्मानार्थ हे साहित्य संमेलन आयोजित करण्यांत आले हाेते. अशी माहिती खुद्द कुसुमताई अलाम यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना दिली.
 
Previous Post Next Post