तलावाच्या पाण्यामुळे महिला शेतकरी संकटात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गेल्या आठ दहा दिवसापासुन सतत पाऊस पडत असल्यामुळे अनेक शेतक-याच्या शेतात पाणी साचले आहे. खरीप पिके संकटात सापडली आहे. अशातच तलावाच्या पाण्यामुळे सराटी येथील महिला शेतकरी शेवंताबाई रामा टेकाम (55) हवालदिल झाल्या आहे. मारेगाव तालुक्यात मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पाऊस झाला, तलावाच्या पाण्याने शेतकऱ्याच्या शेतामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे पीकांचे नुकसान होऊन सर्व पिवळे पडत आहे. 

पावसामुळे शेतातील निंदन तसेच डवरणी करणे ठप्प पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर तन वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये काही ठिकाणी शेतजमिनी मधील पिकाचे लहान लहान रोपटे खरडुन गेले आहे. त्या मध्ये सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मारेगाव तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीनच्या व कापसाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भिती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात अहे. सततच्या पावसाने स्वचछ सुर्य प्रकाश मिळाला नाही. महागामोलाच्या बियाण्याची वाढ खुंटली असून अशा नाजूक परिस्थतीत महिला शेतकऱ्याला मदतीची नितांत गरज आहे. यासाठी त्यांनी पाठबंधारे बांधकाम उपविभाग पांढरकवडा यांना सुद्धा लेखी दिली आहे.