टॉप बातम्या

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आज वणी मारेगाव झरी तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. 

सन 1994 संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशान्वये भारत सरकारने "जागतिक आदिवासी दिवस" उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. त्या प्रमाणे दरवर्षी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे. महाराष्ट्रातील आदिवासीं मोठ्या संख्येने एकत्र येऊन भारतीय संविधान पवित्र ग्रंथ मानून, त्या दिवशी संविधानाचे वाचन करतात. तसेच आदिवासी संस्कृती जतनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकाराचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करतात. हा दिवस आदिवासींच्या अस्तित्व, अस्मितेचा, असल्याने, 9 ऑगस्ट आदिवासीं दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी,असे निवेदन वणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. 

यावेळी प्रा. शैलेश आत्राम, गीत घोष, बंडू सिडाम, रमेश कुळमेथे, मीनाराम तलांडे, बाबाराव पुसाम, अरुण टेकाम, गोपाल तुमराम, मधुकर कोडापे, आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();