टॉप बातम्या

शाळेवर शिक्षक द्या, महागांव पालकांची आर्तहाक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शाळा आहे, शिकायला येणारे विद्यार्थीपण आहेत. मात्र, त्यांना शिकवायला शिक्षक नाही. अशी परिस्थिती मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळावेत यासाठी अनेकदा निवेदने दिलेली आहे. तरी देखील शिक्षकांचा हा तिढा कायम तसाच असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा महागांव येथे १ ते ५ वर्ग असून विद्यार्थी संख्या ३५ आहे. सदद्यस्थीत शाळेवर एकच शिक्षक डेप्युटेशन वर आहे. त्यामुळे आणखी एका शिक्षकाची गरज असताना अजून पर्यंत दुसरा शिक्षक नियुक्त केला नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा आशयचे निवेदन (ता. ५) पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांना देण्यात आले आहेत. यासाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनीही मागणी केली आहेत. दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा ईशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

निवेदनावर अविनाश लांबट उपसरपंच, शा. व्य. स. अध्यक्ष मुरलीधर बलकी, मंगला दूधकोहळे, किरण ढोके, सुनीता येरमे, योगिता वाकडकर, रविना येरमे, हर्षा गाडगे, अंकुश पिंपळकर, दिनेश वाघाडे, दीपक वाकडकर, राजु मरस्कोल्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();