राळेगाव : रास्त भाव दुकानदारांनी यांच्याकडील 4g ई-पास मशीन तहसीलदार यांच्याकडे केल्या जमा

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
 
राळेगाव : तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना, राळेगाव यांना धान्य वाटप करण्याकरीता 4g ई-पास मशीन 1 जुलैला देण्यात आल्या आहे. मात्र, या 4g ई-पास मशीनचे सर्वरच राहत नसल्याने धान्य वितरण करण्यात रास्त भाव दुकानदारांना खुप त्रास होत असल्यामुळे दिनांक 2/8/2024 रोजी राळेगाव रा.भा.धा.दुकानदार संघटना त्यामध्ये सहभागी होऊन तहसीलदार यांना निवेदन दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सर्व रा.भा.धा.दुकानदार संघटना राळेगाव यांनी त्यांच्याकडील 4g ई-पास मशीन तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन जमा करण्यात आल्या आहे.
तालुक्यातील रा.भा.धा.दुकानदार यांना मिळणारे तुटपुंजे कमिशन असल्याने आमच्या परीवारिचा उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने ते मिळणारे कमिशन वाढवून देण्यात यावे, याकरिता तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी रमेश लढे अध्यक्ष राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना, सुरेश पेंद्राम उपाध्यक्ष रा.भा.धा.दुकानदार संघटना, दिलीप निखाडे सचिव रा.भा.धा.दुकानदार संघटना, यांच्यासह राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटनेतील शेकडो रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.