जीवेत शरद शतम् उस्ताद झाकीर हुसैन यांना ७३ व्या जन्मदिनानिमित्य अभिष्टचिंतन


जीवेत शरद शतम्
उस्ताद झाकीर हुसैन यांना ७३ व्या जन्मदिनानिमित्य अभिष्टचिंतन.

पद्मश्री, पद्मभूषण,पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त. उस्ताद झाकीर हुसैन हे झाकीर भाई ह्या नावाने प्रसिद्ध असून तबल्याच्या परंपरेतील पंजाब घराण्याचे उस्ताद पद्मश्री अल्ला रक्खा खां साहेब यांचे चिरंजीव व शिष्य आहेत.

वडिल एक जागतिक ख्यातीचे तबला वादक असल्यामुळे साहजिकच त्यांना तबल्याचे शिक्षण जन्मताच किंबहुना गर्भ संस्कारच झाले.संगीत क्षेत्रात झाकीर भाई हे अत्यंत सुंदर राजबिंडी व्यक्तिमत्व कायम राहिले आहे. जणू ईश्वराने त्यांचा साचाच वेगळा बनवला की काय असं वाटतं. त्यांच्या केसांची नक्कल त्या नंतरचे सगळे तबला वादक आजतागायत करत आहेत. सर्व धर्म समभावाची भावना त्यांच्या अंगी असून ते हिंदूंच्या देव देवत्यांचा श्रद्धेने कायम सन्मान करतात. श्री गणेष ते इष्टदेव, कुलदैवत माणतात.
माँ सरस्वती म्हणून ते सरस्वती माते समोर नम्रतेने झुकतात.
 कठोर परिश्रम व साधना करून त्यांनी तबला वादनात जागतिक ख्यातीत अग्रगण्य स्थान कायम राखले. तंतुवाद्य प्रकारातील त्यांची साथ संगत अतिशय प्रभावी व संयमी राहली आहे.
साथ संगतीपेक्षा एकल तबला वादनात त्यांचा हातखंड असून प्रत्येक कार्यक्रमात त्याचा वेगळाच प्रयोग दिसतो.
त्याची तबला वादन शैली व अत्यंत तयारी पाहून अनेक संगीत क्षेत्राबाहेरील लोकांना तबला शिकण्याची आवड निर्माण झाली, त्यामुळे मी त्यांना तबला प्रसार माध्यम म्हणूनही संबोधू इच्छितो.

त्यांनी जगभरात अनेक कार्यक्रम सादर करत असतांनाच देश विदेशात हजारो तबला वादक घडवीत आहे.
अशा या महान तबला साधकास 'स्वरांगण संगीत विद्यालय' मारेगाव तर्फे लाख तोफांची सलामी.

शब्दांकन - रवि घुमे
तबला शिक्षक, मारेगाव