मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त केळापूर तालुक्यातील नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांचा मनविसेत पक्षप्रवेश


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : मनसे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षनेते मा.श्री.राजुभाऊ उंबरकर यांच्या आदेशानुसार दि.०९ मार्च २०२४ शनिवार रोजी विश्राम गृह पांढरकवडा येथे संध्याकाळी ०६ वा.नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांचे प्रथम आगमनात जल्लोषात स्वागत करण्यात आले,त्यावेळीस मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार,मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजाननराव पोटे,मनविसे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांच्या नेतृत्वात केळापूर तालुक्यातील पांढरकवडा शहरासह ग्रामीण भागातील असंख्य युवकांनी मनविसेत पक्षप्रवेश केला.त्यावेळी मनसैनिक रविभाऊ वल्लमवार शहर अध्यक्ष राकेश श्रीमनवार,तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे,तालुका उपाध्यक्ष अक्षय लक्षट्टीवार,तालुका उपाध्यक्ष वैभव मत्त्ते,विभाग अध्यक्ष अमोल जाधव,विभाग अध्यक्ष अमित भगत यांच्या उपस्थितीत केळापूर तालुक्यातील पांढरकवडा शहरात महाविद्यालय,शाळा,कॅलेज येथे आपल्या भाषणातून शाखा फलक अनावरण येत असुन विद्यार्थीनी एक पाऊल पुढे टाकत मनविसेत पक्षप्रवेश करा,विद्यार्थीना असलेले प्रश्न मनविसे च्या माध्यमातून सोडवु मनविसे विद्यार्थीच्या पाठिशी खंबीर पणे उभी आहे.असे विविध प्रश्नांवर नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर बोलले,त्यावेळीस वैभव गोडे,प्रज्योत कडू,साहिल खांडरे,शिवम मत्ते,योगेश मत्ते,सागर कुमरे,दर्शन धानोरकर,प्रज्योत रोंघे,कार्तिक दोडावार,सोहन कोरचे,तेजस पुसनाके,रोहित नैताम,रितेश सुरपाम,साहिल कोरेकर,राहुल वाघाडे,राहुल कासार,सक्षम मिसाळ,हर्षदीप कांबळे,सार्थक धानोरकर,ऐफाझ सय्यद,समीर मलनास,सुमित वाघमारे,शिवम गेडाम,हेमंत गोयर,पियूष आडे गणेश गेडाम असे आदी युवकांनी मनविसेत पक्षप्रवेश केला,नवनियुक्त मनविसे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी असंख्य युवकांनी मनविसेत पक्षप्रवेश केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले.