सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : दि. ८ मार्च २०२४ रोजी TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी येथे TDRF सहाय्यक संचालक सौ. रुपाली हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून वणी पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले होत्या व TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुस्कान ज. सैय्यद मंचावर उपस्थित होत्या. सर्व प्रथम मुस्कान ज. सैय्यद यांनी उपस्थितांना TDRF व TDRF च्या १९ वर्षातील कार्याची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अश्विनी रायबोले यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा व TDRF मधील महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संजीवनी खिरटकर, नुजतजी शेख, संगीता तेमुर्डे, साक्षी मुजगेवार, अंजली उगवे, हिमांशी बदकल व वेदिका उरले व TDRF मधील सानिका सोनटक्के, सृष्टी दडमल, खुशी सिडाम व टीम (भद्रावती), श्रेया बावणे व टीम (घुग्गुस), अस्मिता वाळके,संजना देवगडे, किरण आत्राम व किरण चव्हण इत्यादी महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला.
तद्नंतर कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी अश्विनी रायबोले यांनी उपस्थित महिलांना व TDRF जवानांना मार्गदर्शन केले. TDRF मध्ये मुलीसुद्धा आत्मसुरक्षेचे व नागरिसुरक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत त्याचे कौतुक आहे सोबतच TDRF जवानांनी समाजकार्यासाठी व राष्ट्र कार्यासाठी असेच अग्रेसर राहून इतरांना मदत करावी असे सांगून TDRF च्या कार्याचे कौतुक केले व महिलांनी आपली सुरक्षा कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विजया ठाकरे, सोनल बावणे,अश्विनी रामगिरवार, अर्चना मजगेवार, पिंकी अग्रवाल,दामिनी बल्की इत्यादी महिला व TDRF जवान उपस्थित होते.